Sunday, June 29, 2008

आधुरी एक प्रेम कहाणी....!

आधुरी एक प्रेम कहाणी....!
एका सिनेमाच्या स्टोरी सारखी ही प्रेम कहाणी आहे ...एक होता राजा..देखणा ...सुंदर..रुबाबदार माणूस...त्याच प्रेम बसते एका सुंदर तरुणी वर...अबोल नाते पुढे प्रेमातुन बहरत जाते मग ह्ळुच लग्नगाठीही बांधल्या जातात..सुखी संसार गुण्या गोंविदांने बहरलेला असतो...दोघे ही कलेचे उपासक..मग काय नाटकाच्या रंगमचांवर सुध्दा यांची वर्णी लागते...
कुणीही रत्यावरचे या जोडीला पाहुन दृष्ट लावतील...इतकी छान जोडी...बस्स..ती आणि तो गोव्याला हनिमुनला जातात...व्वा काय आहे तो फ़ोटो अल्बम... कुणी ही पाहिल्या बरोबर म्हणेल सुंदर ह...! पुढे कहाणी सरकते...जीवनाच्या ख-या रंगमंचावर प्रवेश होतो...राणी आनंदी असते..राजा ही बुध्दिवान...उमदा ..देखणा...! राणीला दिवस जातात..एक छोट मुल या गोजिरवाण्या घरात येत...काही वर्ष आनंदात निघुन जातात ......राजाला याच रंगमंचावर दारुच व्यसन लागत...!कहाणीला इथे कलाटणी मिळते....राणी राजाच्या या व्यसनाला कंटाळुन जाते....अन राजाच्या
रोजच्या मारण्याला कंटाळुन राणी एकदाची घरा बाहेर पडते ...ती कायमची....परत न येण्यासाठी....बरेच दिवस निघुन जातात...इकडे राजा राणीच्या या आधु-या प्रेम कहाणीत राजा तिच्या साठी खुप झुरतो...अगदी वेडा होतो...पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरतात....राजा दारुच्याच नव्हे...तर पारुच्या म्हणजे राणीच्या वेडात आपले अस्तित्वच घालावुन बसतो...राजा बँकेतले
काम सोडतो....राजा तर नेहमीच तर्र असल्याने तो कुठे असतो याचा पत्ता कुणालाच माहित नसतो ..एखादा अनोळखी दयाळु राजाला दारुत तर्र असतांना रिक्षात टाकुन घेउन येतो ..असे नेहमीच होऊ लागले....बस्स राजाची ही प्रेमाची कहाणीतले प्रेम-धागे तुटून जातात... राजाची पहिली राणी एका अपत्या सह त्याला घटस्फ़ोट देते.!पुन्हा ...राजा एकाकी पडतो...राजाला
सावरण्यासाठी राजाचे पुन्हा दुसरे लग्न होते...सनई-चौघडे..वांजत्री वाजते...घरच्यानां तसेच जवळच्याला वाटते की आता तर पुन्हा एकदा राजाचे जीवन बहरले...जीवनात ही घडी अशीच राहु दे....पण राजाच्या दुस-या संसाराला आग लागते...ईथेही अल्प विराम मिळतो....ही जोडी तुटुन जाते... राजा मात्र आता तर पुर्ण पणे खचुन जातो.अन व्यसनाच्या आहारी जाऊन तो एक दिवस आयूष्याचाच पुर्ण रंगमंच सोडुन निघुन जातो....कहाणीला आता पुर्ण विराम मिळतो.राजाची आई माझ्या कडे येते आणि विचारते की राजा तर सोडुन गेला पण राजाच आयुष्यात अस का व्हाव..माझ्या लाडक्या राजाच सार आयुष्य प्रेमात ऊधळुन गेल? मग मी पाहिले राजाचा प्रेम विवाह होण्याचा योग असा की ज्यावेळला सप्तमाचा उप-नक्षत्र स्वामी हा पंचमाचा कार्येश असतो आणि पंचमाचा उप-नक्षत्र स्वामी हा सप्तमाचा कार्येश असतो तरच प्रेम विवाह होतो त्याच प्रमाणे महादशा स्वामी पंचमाचा कार्येश असतो.वरील राजाच्या कुडंलीत सप्तमाचा उप-नक्षत्र स्वामी बुध असुन तो पंचमात आहे व सप्तमेष मंगळाच्या युती मध्ये आहे त्यामुळे पाचव्या व सातव्या स्थानाचा संबध प्रस्थापित झाला आहे तसेच पंचमाचा सबलाँर्ड गुरु असुन तो सप्तमेष मंगळाच्या युती मध्ये आहे अशा प्रकारे पाच व सात स्थानाचा एकाच वेळेस कार्येश झालेला आहे त्यामुळे प्रेम प्रकरण होऊन त्याच रुपांतर विवाहात झालेले आहे.तसेच सप्तमाचा सबलाँर्ड जर ६-८-१२ स्थानाचा कार्येश असला तर वैवाहिक जीवनात भांडण,ताटातुट होत असते.या कुंडलीत सप्तमाचा सबलाँर्ड बुध असुन तो व्ययेश आहे.त्यामुळे ताटातुट होऊन त्याच रुपांतर घटस्फ़ोटात झाले आहे.आता दुसरा विवाहाचा योग हा द्वितीय स्थाना वरुन पहातात कारण द्वितीय स्थान हे सप्तमा पासून आठवे स्थान आहे म्हणजे पहिल्या विवाहाच मृत्यू स्थान आहे.दुस-या विवाहाच्या वेळेस ते माझ्या कडे आले होते .मी त्यांना सांगितले होते की दुसरा विवाह करु नये अयशस्वी होऊन त्यात भानगडी होतील त्यांनी माझे ऎकण्या पेक्षा मुलाच्या परिस्थिला अधिन राहुन दुसरे लग्न केलेच होते पण शेवटी तसेच झाले दुसरा विवाह अयशस्वी होऊन त्यांचा घटस्फ़ोट झाला.

एका जातकाची कुंडली -




भाव राशी अंश नक्षत्र स्वामी. उप-नक्षत्र स्वामी.
लग्न तुळ २५-४०-२८ गुरु बुध.
५वे स्थान कुंभ २९-५५-०२ गुरु चंद्र
७वे स्थान मेष २५-४०-२८ शुक्र बुध.

Saturday, June 28, 2008

हरवलेल्या व्यक्ति संबधी एक गोष्ट!

संध्याकाळची वेळ होती.एक साठीतले गृहस्थ माझ्या कडे आले ! तसे ते भविष्या बद्दल काही अडचणी असल्यास माझ्या कडे मधून मधून येतात पण आज ते फ़ार दम हाकत माझ्या कडे एवढ्या रात्री आले .मलाही थोडे आँड्च वाटले होते ...कारण फ़ोन न लावता ते आले होते.आल्या आल्या त्यांनी सांगितले की मला एक चिंता लागली आहे ..आत्ताच मी आणि माझी मुलगी ,नातु हे तीघेही रेल्वे स्टेशनला गेलो होतो. स्टेशन वर मुंबई कडे जाणा-या अपच्या दोन गाड्या ऊभ्या होत्या त्यानंतर त्यांची मोठी मुलगी (जी नोकरी करते व टीचर आहे) ही अचानक त्या गर्दीत गायब झाली.गाडी निघायची वेळ आली होती पण त्यांची मुलगी तर त्यांना काही दिसेना ? सर्वीकडे पाहीले पण प्रयत्न व्यर्थ गेले!शेवटी ते घरी परतले त्यानंतर परत पावली ते माझ्याकडे आले. त्यांनी वरील किस्सा सांगितला...अन मला पट्कन प्रश्न केला, की आपण मला सांगा माझी मुलगी सुखरुप असेल का नाही..? अचानक ती कोठे ?कशी ? निघुन गेली....मी पटकन त्या दिवसाची (म्हणजे तो दिवस होता १६ मार्च २००८ वेळ सांयकाळ: ०८:४६ मिनीटांची) कुंडली मांडली.
कुडंली स्पष्टपणे पाहण्यासाठी तिच्यावर क्लिक करा
हरवलेली व्यक्ति सुखरुप आहे की नाही या विषयी सुरक्षितता दर्शविणारा गुरु हा ग्रह आहे त्याच्या खालोखाल भाग्येश हा ग्रह असतो. प्रश्न कुंडलीत चंद्र हा ग्रह हरवलेल्या व्यक्तिचे प्रतिनिधीत्व करतो म्हणून गुरुची किंवा भाग्येशाची दॄष्टी चंद्रावर किंवा हरवलेल्या व्यक्तिच्या संबधीत स्थाना वर किंवा त्या स्थानाच्या अधिपती वर असेल तर हरवलेली व्यक्ति सुखरुप असते.वरील प्रश्न कुंडली मध्ये हे अपत्य तिसरे असल्यामुळे प्रश्न कुंडलीतले नवम स्थान हे हरवलेल्या व्यक्तिच्या संबधीत स्थान दाखवते आणि नवम स्थानावर तॄतीय स्थानातील धनु राशीतील गुरु ची दॄष्टी असल्यामुळे आपली मुलगी सुखरुप आहे असे सांगितले.वरील प्रमाणे गुरु चा किंवा भाग्येशाचा संबध लागत नसता आणि चंद्र जर ६-८-१२ या स्थान असता तर षष्ठ स्थानातील चंद्रा मुळे आजार किंवा दुखापत झाली असते असे सांगितले असते .तसेच अष्टमात जर चंद्र असता तर अपघात झाला असावा असे सांगितले असते.चंद्र जर १२ व्या स्थाना त असता तर मुलगी ही हाँस्पिटल किंवा लाँक-अप मध्ये असल्याचे सांगितले असते. अष्ट्मात चंद्र जर मंगळाच्या युतित किंवा दॄष्टीत अथवा पापग्रहाच्या युतीत असता तर मुलीला कुणी तरी जबरदस्तीने डांबुन ठेवलेले असते किंवा ती व्यक्ति गुंडाच्या ताब्यात असते.परंतु वरील प्रश्न कुंडलीत असे कुठलेच योग आढळुन आले नाही त्यामुळे वरील शक्यता फ़ेटाळुन लावल्या. वरील प्रश्न कुंडलीत चंद्र हा दशम या केंद्र स्थानात होता त्यामुळे ती व्यक्ति राहत्या गावात किंवा शहरात असली पाहिजे असे ठामपणे मी सांगितले म्हणजे आपली मुलगी चाळीसगावला आपल्या घरी सुखरुप पोहचलेली आहे असे सांगितले.तेव्हा आपण चिंतामुक्त रहावे असे मी त्या गृहस्थांना सांगितले.काही वेळातच त्या मुलीचा फ़ोन आला ,मी सुखरुप असुन आता मी घरी पोहोचली आहे. त्यांना मी अगोदरच सर्व सांगुन टाकले होते त्यामुळे त्याच्या नातवाच्या डोळ्यातले अश्रु ही तात्काळ बंद झाले होते.संकटाच्या वेळी ज्योतिष्यशास्त्राचा किती मार्गदर्शनपर ऊपयोग होतो हे सांगण्यासाठी त्यांच्याजवळ मात्र शब्दच नव्हते.....!



Bookmark and Share

Friday, June 27, 2008

कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट


१कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट म्हणजे त्यावेळी त्याठीकाणी उदित असलेला लग्नाचा स्वामी.
२.चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचा अधिपति.
३.चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी.
४.जो वार असेल त्या वाराचा मालक.
अशा प्रकारे हे चार ग्रह त्या विशिष्ट वेळेचे रुलिंग प्लँनेट असतात.वरील चार ग्रहा पैकी जे ग्रह वक्री ग्रहाच्या नक्षत्रात किंवा उप-नक्षत्रात असतात ते सोडुन द्यावे कारण ते परिणाम देत नसतात .वरील ग्रहांच्या अंशात्मक युती मधील ग्रह रुलिंग प्लँनेट म्हणुन स्विकारता येतात.वरील ग्रहांच्या राशी मध्ये जर राहू-केतू असतील तर त्यांना रुलिंग प्लँनेट म्हणुन घ्यावे.रुलिंग प्लँनेट मध्ये लग्न स्वामी अत्यंत महत्वाचा असतो नंतर त्याच्या खालोखाल नक्षत्र स्वामीचे महत्व असते. नंतर पुढच्यांचा क्रमांक लागतो.वरील चार ग्रहांपैकी वक्री असलेल्या ग्रहाला रुलिंग मध्ये घ्यावे.तो मार्गी झाल्यावर फ़ळ देतो.परंतु दिवसात घडणा-या घटनांचा विचार केल्यास असा ग्रह सोडुन देणे योग्य होते.या कॄष्णमुर्ती पध्दतिच्या रुलिंग प्लँनेट नुसार कुठली घटना केव्हा घडेल याचा कालावधी सांगता येतो.या कॄष्णमुर्ती पध्दतिच्या रुलिंग प्लँनेट च्या अभ्यास करतांना मला याचा आँफ़िसात प्रत्यय आला होता. एकदा बाँसला त्याची आई सिरियस असल्याचा फ़ोन आला परंतु आई त्या ठिकाणाहुन लांब दुस-या गावाला त्यांच्या भावा कडे रहात होती त्यात आँफ़िसात मार्च एंडिग असल्यामुळे त्यांनी मला बोलावले व विचारले की माझ्या आईची तब्येत कशी असेल ...मला तिला भेटायला जायचे आहे.आपण मला कुडंली मांडून सांगावे ..मी पंचाग पाहुन कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट म्हणजे LSRD पाहीले.रुलिंग प्लँनेट मध्ये शनि हा रुलिंग मध्ये आलेला होता त्यामुळे त्यांना मी सांगितले की आपण आत्ताच्या आत्ताच निघायला हवे कारण शनि हा आजारी माणसाला जिंवत राहु देत नाही.त्यानुसार मी म्हटले की आपल्याला आईंची भेट होणे फ़ार अशक्य आहे त्यांनी मलाही सोबत नेले. आम्ही दारात येऊन पाहिले तर काय त्यांच्या आई तर निर्वतल्या होत्या.तसेच एकदा पिकनिकला असतांना माझ्या आँफ़िसातले मित्र हे अचानक पाण्याच्या तलावात पाय घसरुन पडले होते. त्यांचा पाय प्रचंड प्रमाणात सुजलेला होता त्या निसर्ग रम्य स्थळी ऎन रान कोकण ठाणात कुठलीही वैद्यकिय मदत मिळणे दुरापास्त होते .मला ही घटना जेव्हा कळली तेव्हा माझ्या हातात पंचाग होते त्यामुळे मला त्यावेळेचे रुलिंग प्लँनेट माहित होते.मी सहजच पाहिले तर रुलिंग मध्ये शनि-मंगळ होते म्हणजे त्या व्यक्तिला फ़ँक्चर झाले असावे असे स्पष्ट दिसत होते .मी त्यांच्या मुला बरोबर धावत जाऊन म्हटले आपण कृपया आपल्या पायावर ऊठून ऊभे राहू नका आपल्या पायाचे हाड मोडले गेले असावे. त्यां वर ते म्हटले छे..छे..मी तर साध सरकुन पडलो..थोडीफ़ार सुज आहे ..बाकी काही नाही...पण ते शनि-मंगळ का असे पटकन सोडणार? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी जवळच असलेली खाट घेऊन त्याचा वापर स्ट्रेचर सारखा करण्यास सांगितला त्यांना त्यांच्या पुत्राच्या व पत्नी व काही जणांच्या मदतीने कार मध्ये सिटावर बसवले जसे अंतर गेले तसा त्यांचा त्रास वाढु लागला होता ..बस्स आता काही अंतरावर दवाखाना होता. डाँक्टरांनी टेबलावर घेतले पटकन पायाचा एक्स रे काढला ...१५ मिनिटांत तो वाळलेला एक्स-रे डाँक्टरांनी पाहीला तसेच ते गृहस्त जे अगोदर मला म्हटले होते छे हो मला काही झाले नाही त्यांचा चेहरा मात्र बघण्या सारखा झाला होता.केवळ योग्य प्रथमोपचार मिळाल्याने ते लवकरात लवकर बरे झाले..ते माझ्या कडे काही दिवसांनी आले ..स्वतःच्या पायाने चालत..आभार मानायला...तेव्हा मी माझ्या कॄष्णमुर्ती गुरुजींकडे पाहुन नमस्कार केला.त्यांनी जे ४० वर्ष अथक परिश्रम घेऊन ज्योतिष्याशात्रातली कॄष्णमुर्ती पध्दत उदयाला आणली ती किती तंतोतंत आहे याची पावती मला या ऊदाहरणा मधुनच मिळाली होती असे म्हणायला हरकत नाही.
कॄष्णमुर्ती पध्दतिचा अभ्यास असणा-या ज्योतिष मंडळीना कॄष्णमुर्ती पध्दतिचे महत्व पटवून देण्याची गरज नसते पण ज्योतिष्याशास्त्राच्या अभ्यासू वाचकांसांठी कॄष्णमुर्ती पध्दतित रुलिंगचे प्लँनेट महत्व कसे? किती आहे ? हे समजवून देण्याचा प्रयत्न केला आहे.


Bookmark and Share

Thursday, June 26, 2008

वास्तु सुख कसे असेल?



दुपारची वेळ होती माझे कुडंल्याचे रिडींग चालु होते.त्याच वेळी एक जातक आला आणि म्हणाला की माझी कुंडली पाहुन मला भविष्य सांगा .जेव्हा प्रश्न कर्ता परिक्षा घेण्याच्या उद्देशाने आपल्याला प्रश्न विचारतो त्यावेळी अभ्यासू ज्योतिष्याला सर्व बाबी तपासुन योग्य ऊत्तर द्यावे लागते.खर तर कुडंली पाहुन मी त्याला पटकन सांगितले की आपल्या कुडंली नुसार आपल्याला वास्तू सुख मिळत नसावे?तो हे ऎकून चकित झाला...! त्याला म्ह्टले की ज्योतिष्याशास्त्र एक गहन शास्त्र आहे. त्यामुळे अभ्यासू ज्योतिष्याला रिडींग देतांना वास्तु पासुन सुख लाभेल का नाही हे सुध्दा समजू शकते..!त्याला सांगितले की आपण अनेक घर बदलवले असतील! तसेच आपणाला घर सुध्दा लाभदायक ठरत नसावेत असे वाटते.वास्तुशास्त्राचा अभ्यास असल्याने त्याने मला त्याच्या घरी येण्यास विनंति केली.त्यानंतर ठरवलेल्या दिवशी त्याच्या सोबत मी त्याच्या घरी गेलो. घरा समोर तुळशी वृदांवन होते पण त्यातली तुळशी पुर्ण वाळून गेलेली होती. आपल्या ऋषी-मुनींनी सांगितल्या प्रमाणे आपणाला हे सुक्ष्म पणे जाणवू शकते की वास्तुतले स्पंदन कशी असतात? त्या वास्तुत प्रवेश केल्या बरोबर मला अस्वस्थ वाटले.त्या जातकाची कुडंली पाहिल्यावर असे आढळून आले की त्याचा चतुर्थ स्थानातील चंद्र राहुच्या युतीत होता आणि हा चंद्र हा अष्ट्मेश होता.त्यामुळे त्याला वास्तु पासुन सुख लाभत नव्हते त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटायचे.माझ्या अभ्यासा प्रमाणे ज्या कुणी जातकाला वास्तु सुख लाभत नाही त्यांच्या कुडंलीत चतुर्थ स्थानातील चंद्र हा शनि,राहू,केतूच्या युती मध्ये असतो.कारण चतुर्थ स्थानावरुन,वास्तु सुख ,मातृसुख,वाहन सुख पाहीले जाते.या बाबतीत वास्तुशात्रा प्रमाणे वास्तुचा उतार हा पुर्वे कडे किंवा ऊत्तरे कडेच असला पाहिजे नाही तर वास्तु ज्या जागेवर बांधली असेल त्या जागेचा ऊतार तसा करुन घ्यावा.माझ्या अभ्यासा प्रमाणे ब-याच कारखान्यांचा उतार हा चुकिचा म्हणजे दक्षिण दिशेकडे असल्यामुळे ते कारखाने बंद पडलेले आढळले.त्याच प्रमाणे घराच्या वास्तु मध्ये अग्नेय दिशेकडे किचन आणि ईशान्य दिशेला पाण्याची टाकी जमिनी खाली बांधलेली नसते त्यामुळे मोठा वास्तु दोष निर्माण होतो.कारण येणारी वैश्विक शक्ति ही सुर्य किरणां मार्फ़त पुर्वे कडुन आणि ऊत्तरे कडुन चुंबकिय शक्ति मिळते त्यामुळे पुर्वे कडे आणि उत्तरे कडे घराला जास्तीत जास्त दार व खिड्क्या (दक्षिण दिशा सोडुन) ठेवाव्यात तसेच वायव्य दिशेला toilet बांधावा.वास्तुचा मध्य भागाला ब्रम्ह स्थान म्हणतात त्या जागी कुठलीही वस्तु ठेवु नये ती जागा मोकळी ठेवावी.पुर्वे कडे व उत्तरे कडे जास्तीत जास्त जागा सोडावी तसेच दक्षिण दिशा जड करावी (राँक गार्डन तयार करावे) अशी रचना असल्यास वास्तुत चैतन्य निर्माण होते.

Tuesday, June 24, 2008

चंद्र ग्रहण योगात असलेल्या कुंडल्या


माझ्या कडे आलेल्या एका जातकाचा अनुभव असा होता की त्याला सतत काहीतरी भास व्हायचे.त्याच्या सोबत आलेल्या पालकाने सांगितले की ही व्यक्ति काही वर्ष आधी खूप चांगली वागायची पण तो आता ४-५ वर्षा पासुन वेगळाच वागु लागला आहे.तो एकाकी विचार करायचा...मध्येच कुणाशीही बोलत नसे.काम तर मूळीच करीत नव्हता.शिक्षणातही खंड पडला होता.त्याच्या मनावर परिणाम झाला की काय ? किंवा त्याच्या आयूष्यात अशी कुठली एखादी घटना घडली होती ? याचे उत्तर त्या व्यक्ति कडुन मिळत नव्हते..शेवटी त्या जातकाच्या नातेवाईकाला मी त्याची कुंडली मागितली...!
मला जी ऊत्सुकत्ता होती ती खरी ठरली.त्या जातकाची कुंडली अशी होती . त्याच्या कुंडलीत अष्ट्मस्थाना मध्ये चंद्र केतू यांची युती कन्या राशीत होती. चंद्र केतू ग्रहण युतीचे परिणाम वरील प्रमाणे दिसतात.त्यामुळे बुध हा उच्चिचा असुन सुध्दा हा जातक कुठल्याही परिक्षेत पास होऊ शकत नव्हता.कारण चंद्र हा कुडंलीत अत्यंत महत्वाचा ग्रह आहे.अनेक पूर्व जन्मांच्या कर्माचे गाठोडे व अनेक जन्मांचे संस्कार घेऊन हा जातक आलेला असतो.त्यामुळे ही व्यक्ति अशी अचानक वागत असते. तसेच चंद्र ग्रहणात अशा व्यक्तिंची सहन शक्ति कमी असते.बुध ,शुक्र हे ग्रह शनि,मंगळ हर्षल ,नेपचून या पैकी कुणाच्या युति किंवा केंद्र प्रतियोगात असता काही मनोविकृति येऊ शकतात.ज्यावेळा अशुभ ग्रहांची महादशा जर चालू असेल तर कुठल्याही शांती,ऊपासना,अंगठ्या यांचा परिणाम होत नसतो.शेवटी अशा व्यक्तिंना राहू-केतू संबधी महादशा आल्यास जास्तीत जास्त त्रास होतो.त्यामुळे ह्या व्यक्तिंना कौंटूबिंक प्रेम ,जिव्हाळा याची आवश्यकता जास्त असते.संत पुरुषच अशा व्यक्तिंना अध्यात्मिक शक्तिने बरे करु शकतात.पण तसे महात्मे आजच्या कलियुगात मिळणे कठीण आहे.असे योग कुडंलीत असलेल्या व्यक्तिंना अमावस्या तसेच पौरर्णिमेला वेडाचे झटके जास्त येतात .

Monday, June 23, 2008

कर्ज मुक्तिचे काही ऊपाय !


एक अनोळखी चाळीशीत पर्दापण केलेला गृहस्त घराचा पत्ता शोधत अगदी सकाळी सकाळी माझ्या घरी येऊन बसला .त्यांचा चेहरा हा खुप चिंतातूर दिसत होता.त्याने माझ्या समोर त्याची कुंडली पुढे केली असता माझ्या अभ्यासा नुसार मला एक लक्षात
आले की त्याचे कुंडलीतील ग्रहयोग पाहीले असता तो खूप कर्जबाजारी असावा असे वाटले.मी त्याला स्पष्टपणे सांगितले की आपण खूप कर्जबाजारी आहात असे आपली ग्रहस्थिती कुंडलीत दर्शवित आहे. तो अनोळखी गृहस्थ हे ऎकून फ़ारच चकित झाला !तो म्हणाला आपणास काही सिध्दि वगैरे प्राप्त आहेत का? आपण हारोस्कोप चार्ट पाहुन इतक्या
सहज पणे बोललात!
मी म्हटले..छे हो..कुंडलीचा चांगला रिडर अशा काही गोष्टी सहज सांगु शकतो..!
त्यावर ते हळूचकन म्हटले सर ! आपण एक अभ्यासू ज्योतिषी आहात ..तर मला एक सांगा की मी या कर्जबाजाराच्या संकटातुन कसा मुक्त होईल.?
तो म्हणाला आपण मला याबद्द्ल मार्गदर्शन करा तसेच मी आपला अत्यंत आभारी असेल
त्यानंतर मी त्याला काही उपाय सांगितले..अन त्याने ते चिकाटीने केलेत ...त्यानंतर तो दिड
वर्षांनी कर्जमुक्त होऊन माझ्या कडे आला...त्यावेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले होते..
त्याला कर्जमुक्त होण्यासाठी मी गेल्या वेळी काही तारखा कर्जफ़ेडी साठी काढुन दिल्या होत्या.त्या म्हणजे ज्या वेळेला अश्विनी नक्षत्रातुन चंद्राचे भ्रमण होते व मेष लग्न उदित होते तसेच अनुराधा नक्षत्रात चंद्र होता व वृश्चिक लग्न ऊदित होते. अशा मुहुर्तावर जर कर्जफ़ेड केल्यास पैसे कुठूना कुठून ...कोणत्याही मार्गाने पैशांची जुळवा जुळव लवकर होऊन कर्ज पटकन फ़िटले जाते..मी सुध्दा कार साठी कर्ज घेतले होते आणि वरील योगांवर कर्जफ़ॆड केली तर मला सुध्दा याचा अनुभव आलेला आहे आपण ही याचा अनुभव घ्यावा.

Sunday, June 22, 2008

एका स्नेहयाच्या जीवनातली एक सत्य घटना...!







१२ जुलै २००६ सांयकाळची वेळ होती....सर्वे जण टीव्ही वर न्युज चँनल वर ताज्या घडामोडी पहात होते...
घटना तशी भंयकरच होती? टी.व्ही वर मुंबई बाँम्ब स्फ़ोटाची न्युज झळकली...मुबंई तशी शांत होती पण आज काय झाले??
मुंबईच्या लोकल मध्ये बाँम्ब स्फ़ोट झाल्याची न्युज झळकली ...माझे स्नेही तसे ताडकन जागे झाले..करण त्यांचा मुलगा व सूनबाई ह्या मुंबईला राहणारे...शिवाय बाँम्ब स्फ़ोटाची घटना घडली ती वेळ त्या स्नेहयांच्या मुलाची आँफ़िस डयूटी वरुन घरी परतण्याची होती...सारे प्रश्न चिन्ह...सा-यांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला होता.मोबाईलने संपर्क करण्याचा प्रयत्न केला...फ़ोन तर खणखणत होता पण ऊत्तर कुणी देत नव्हते...पुन्हा इकडून १५-२० वेळा वेड्या सारखा प्रयत्न वडीलांनी केला ...झाल कुणी तरी अज्ञात व्यक्तिने फ़ोन ऊचलला...
हँलो हँलो...कोण बोलतंय...???
हं बोला ना !!!
तिकडुन आवाज आला... अन तिथे मुंबईला काय झाले आहे याच वर्णन त्या व्यक्तिने फ़ोनवर केले..
हो...इथे एक माणूस बेशुध्द पडला आहे...फ़ेकला जाऊन...! हा मोबाईल त्याचा तर नाही ना...मी जमा करतो आहे..
फ़ोन कट झाला ..या सा-या गोधंळात सर्वांचे होश उडाले होते..काहीच सुचत नव्हते...त्यानंतर तर मोबाईलचे नेटवर्क एखाद्या ट्रँफ़िक प्रमाणे जाम झाले होते...??
दैवाचा खेळ काहीसा निराळाच होता..!
स्नेहयाने प्राव्हेट गाडीने पटकन मुंबई गाठली... सर्व ठीकाणी आक्रोश ..दुःखाने वातावरण सारे थिजलेले होते..क्षण ही मुलाच्या आठवणींनी गोठून गेले होते....आता काय होईल?...स्नेहयांच्या पायाचा थरकाप ऊडाला...तपास चालू होता..नाव दिले गेले ..फ़क्त मॄतांची ओळख पटवायची ..बस्स...ह्रद्य पिळवटुन टाकणारी घटना घडली...व्हायचे तेच झाले...समोर चित्र विचित्र विखुरलेली बाँडी आली...ही बाँडी आपल्या नातेवाईकाची आहे का ? समोरुन विचारणा झाली..
पण तो मृतदेह ओळखीचा वाटला नाही...??
पुन्हा एक बाँडी आली...पायात घातलेल्या बुटावरुन ती व्यक्ति लांबुनच ओळ्खु आली...!
हो..हाच माझा मुलगा आहे डाँक्टर हा जिवंत आहेना..?..याला वाचवा ना?? ..गयावया करत आमच्या स्नेह्यांच्या अश्रुंचा बांध फ़ुटला......
सार संपल होत ..एक संसार आता उध्वस्त झाला होता...त्यानंतर घरी आणुन मृतदेहावर सर्व सोपस्कार आटोपले गेले..

एक महिन्या नंतर मी त्या स्नेह्यांच्या घरी गेलो...खरतर ते त्या दुखाःतुन कसेबसे सावरले असावे...त्यांचे सात्वंन केले..
त्यानंतर ते म्हटले आपण एक अभ्यासू ज्योतिषी आहात ..मला एक विचारावेसे वाटते की..माझ्या मुलाच्या कुडंलीत असे कोणते योग होते की त्याला असा अपघाती मृत्यू यावा ?खरतर मी त्या मुड मध्ये नव्हतो पण मला एक जाणीव झाली की अशा अपघाती मृत्यूच्या कुडंलींचा अभ्यास करुन पुढे जर आपण त्या व्यक्तिला अगोदर थोडीफ़ार काळजी घ्यायला सांगितल्यास ती व्यक्ति अपघातातुन वाचू शकते काय..तसेच यामुळे आपल्याला पुढे खबरदारीचे ऊपाय मिळू शकतील...कारण ज्योतिष्यशात्र एक मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे ...!माझ्या समोर त्या बाँम्ब स्फ़ोट अपघातात ठार झालेल्या स्नेह्याच्या मुलाची कुंडली आली.
जन्म तारीख होती ..०४-०५-१९६८ जन्म वेळ रात्री ०९:०५लग्नेश आणि अष्टमेश यांची युती सप्तमात असल्यामुळे प्रथम दर्शनी पारंपारिक ज्योतिष पध्दति प्रमाणे यांच्या मृत्यूला कारण कोणीतरी दुसरे दिसत होते. कारण लग्नेश आणि अष्टमेश यांची (exact conjuction ) युती प्रथम दर्शनी काहीतरी वाईट घडणार असे दर्शविते.
कृष्णमुर्ती पध्दती नुसार माझा अभ्यास.

[[ निरयन स्पष्ट ग्रह ]]

ग्रह राशी अंश नक्षत्र राशीश नक्षत्र स्वामी उप-नक्षत्र स्वामी
लग्न वॄश्चिक २०-३१-२५ जेष्टा मंगळ बुध शुक्र
रवि मेष २०-५४-४३ भरणी मंगळ शुक्र गुरु
चंद्र कर्क ०८-०५-४४ पुष्य चंद्र शनि केतू
मंगळ वृषभ ०३-५३-५९ कृतिका शुक्र रवि शनि
बुध वृषभ ०२-०५-१५ कृतिका शुक्र रवि गुरु
गुरु सिंह ०२-४६-०८ मघा रवि केतू शुक्र
शुक्र मेष ०८-२१-४८ अश्विनी मंगळ केतू गुरु
शनि मीन २५-४१-४९ रेवती गुरु बुध राहू
राहू मीन २४-०५-०७ रेवती गुरु बुध मंगळ
केतू कन्या २४-०५-०७ चित्रा बुध मंगळ मंगळ
हर्षल कन्या ०२-०३-१३ उत्तरा बुध रवि गुरु
नेपचून वॄश्चिक ०२-०९-१४ विशाखा मंगळ गुरु राहू
प्लूटो सिंह २७-०२-३८ उत्तरा रवि रवि रवि
....................................................................................

कॄष्णमुर्ती स्पष्टभाव पध्दति


भाव राशी अंश नक्षत्र नक्षत्र स्वामी उप-नक्षत्र स्वामी

१ वॄश्चिक २०-३१-२५ जेष्टा बुध शुक्र
२ धनू २०-५४-२९ पुर्वाषाढा शुक्र गुरु
३ मकर २३-४६-०९ धनिष्ठा मंगळ मंगळ
४ कुंभ २७-३२-४४ पुर्व भाद्रपदा गुरु शुक्र
५ मीन २८-५०-४७ रेवती बुध शनि
६ मेष २६-०४-५१ भरणी शुक्र केतू
७ वृषभ २०-३१-२५ रोहिणी चंद्र शुक्र
८ मिथुन २०-५४-२९ पुर्नवसु गुरु गुरु

९ कर्क २३-४६-०९ आष्लेषा बुध मंगळ
१० सिंह २७-३२-४४ उत्तरा रवि चंद्र
११ कन्या २८-५०-४७ चित्रा मंगळ शनि
१२ तूळ २६-०४-५१ विशाखा गुरु केतू

कृष्णमुर्ती पध्दती नुसार ८ व्या स्थानाच्या(अष्ट्म)उप-नक्षत्र स्वामीची परिपुर्ण अभ्यास केल्या नंतर मृत्यू हा शांततेत किंवा अपघाती (voilent death) होईल वगैरे इत्यादी समजते परंतु कृष्णमुर्ती पध्दती नुसार अष्ट्म स्थान हे मृत्यू क्लेशामुळे किंवा voilence मुळे होतो असे दर्शविते . म्हणून कृष्णमुर्तींच्या नियमानुसार मृत्यू हा जर आत्महत्येनुसार किवां दुस-याने केलेल्या विश्वासघाताने(assassination) जर घडणार असेल तर..! अष्टमस्थानाचा उप-नक्षत्र स्वामी हा मारक स्थान किंवा बाधक स्थान या दोघा पैकी एकाच्या कार्येशाच्या नक्षत्रामध्ये असला पाहिजे आणि अष्टमस्थानाच्या कार्येशाच्या नक्षत्रा मध्ये सुध्दा असला पाहिजे व उपनक्षत्र स्वामी किंवा उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी यांचा संबध मंगळाशी असला पाहिजे.कारण मंगळ हा मृत्यूचा(voilent death) कारक आहे.आमच्या प्रत्यक्ष अनुभवा नुसार मंगळा ऎवजी हर्षल चा सुध्दा तोच परिणाम होतो.वरील नियंमाची मिमांसा केल्यावर मला असे लक्षात आले की ही कुंडली तर अगदी स्पष्ट पणे (voilent death) दिसत होती.
voilent death च्या प्रकारात सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीने वरील k.p (कृष्णमुर्ती) नियमांची परीपुर्ती केली पाहीजे कारण सप्तम स्थान हे आपल्या प्रतिस्पर्ध्याचे स्थान आहे.
अशा प्रकारात विश्वासघाताने मारणा-याचे रुलिंग प्लँनेट हे सप्तम स्थानाचे व त्याचे स्वतःचे रुलिंग प्लँनेट मधले सामाईक असतात.वरील हे नियम त्या जातकाच्या कुंडलीली लावले तर असे दिसून येते की अष्टम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा गुरु असुन तो केतूच्या नक्षत्रात आहे.हा केतू हर्षल बरोबर असुन तो बुधाच्या राशी मध्ये असल्यामुळे तो अष्टमेषाचे काम करतो. उपनक्षत्र स्वामी गुरु हा भावचलित कुंडलीत नवम या बाधक स्थाना मध्ये आहे आणि बुध मंगळाची युती असल्यामुळे मंगळाशी
संबधीत आहे (voilent death कारकाशी) त्यानुसार आठव्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा८ आणि ९(बाधक स्थान) या स्थानाशी व हर्षल ,मंगळाशी संबधीत असल्याने voilent death झालेला आहे.सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी हा सुध्दा केतू च्याच नक्षत्रात असल्याने ह्या कुडंलीत वरील सर्व नियम सप्तम स्थानाला लागु होत असल्यामुळे वरील जातकाचा रेल्वेच्या फ़र्स्टक्लास बोगीतुन बाहेर पडल्याने मृत्यू झाला आहे.ही घटना शुक्र महादशा आणि शुक्र अंतर्दशे झाली आहे कारण महादशा स्वामी हे मारक स्थान,बाधक स्थान व मंगळ ,हर्षलशी संबधीत आहे कारण शुक्र हा केतू च्या नक्षत्रात व गुरुच्या उपनक्षत्रात असल्यामुळे ही घटना घडलेली आहे.मी सर्व चर्चा त्या स्नेह्याशी केली. त्यांनी मला एक विचारले की पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये
ही व्यक्ति बाँम्ब स्फ़ोटाच्या तीव्रतेने फ़ेकली गेल्याने प्रथम दर्शनी मृत्यू झाल्याचे दाखवले आहे.पण त्यांना या बाबतीत शंका होती की अगांवर लागल्याच्या कुठल्याही खूणा नसतांना व अंगाला रक्ताचा एक टीपूस डाग नसतांना या व्यक्तिचा मृत्यू कसा व्हावा यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी मला विचारले की याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला असावा?
मी कुडंली परत पाहिली कुडंलीत अष्टमाचा उपनक्षत्र स्वामी हा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला असावा हे दर्शवितो .
अष्टमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु हा सिहं राशीत असल्यामुळे व मंगळाची गुरु वर दृष्टि असल्याने गुरु(रेल्वेच्या ड्ब्यातून बाहेर फ़ेकल्या गेल्याने ) तसेच हा गुरु सिंह राशीत असल्यामुळे ह्रद्य क्रिया बंद पडणे दाखवत होता त्यामुळे कारण सरळपणे हेच होते ही ह्रद्य क्रिया(मंगळामूळे चोकअप) बंद पडल्याने मृत्यू झाला असावा असे मी सांगितले .तसेच गुरु हा केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे व केतू हा हर्षल बरोबर असल्याने मृत्यू हा अकस्मात आणि modern equipementमुळे झालेला आहे.मृत्यू नंतर देहाची विल्हेवाट ही गुरु हा सिहं या अग्निराशीत असल्याने प्रेताचा अंतिम संस्कार हा अग्निडाग देउनच होतो आणि तसेच झाले आहे .गुरु हा नवम स्थानात असल्याने dead body ही लांब ठिकाणाहुन आणली गेली असे कृष्णमुर्ती नियमां प्रमाणे मी स्पष्टपणे त्यांना हे सर्व सांगु शकलो.माझे ज्योतिषशात्रातले गुरु श्री कृष्णमुर्तीजी असल्यामुळे त्यांच्या मुळेच एवढे स्पष्ट पणे मी हे सांगु शकलो त्यांचा मी सदैव ऋणी आणि आभारी आहे.

Saturday, June 21, 2008

२१ जून २००८ ’ आज वर्षातला सर्वात मोठ्ठा दिवस






२१ जून २००८ म्हणजे आजचा शनिवार हा वर्षातला सर्वात मोठ्ठा दिवस आहे आणि २२ डिसेंबरला २००८ वर्षातला सर्वात लहान दिवस असेल याला कारण म्हणजे पॄथ्वीची सुर्याभोवती परिभ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने ती जून महिन्याच्या २१ तारखेला सुर्यापासुन जास्तीत जास्त दूर असते आणी २२ डिसेंबरला तीची अशीच स्थिती पहायला मिळते फ़क्त हा दिवस लहान का असतो याचे कारण म्हणजे पॄथ्वीचा आस २३.५* अंश कललेला असल्याने दिवस लहान असतो. आजपासुन उत्तरायण सुरु झाले आहे .

माहिती वाचा:
पॄथ्वीचे एकूण वजन ५.९७६ x १० चा २४ वा घात kg.ईतके आहे.
पॄथ्वीचे सुर्यापासुन चे सरासरी अंतर १.४९६ x १० चा ११ वा घात m, a distance known as the astronomical unit.

Friday, June 20, 2008

गोचर भ्रमण म्हणजे काय?

गो म्हणजे ग्रह चर म्हणजे चालणे.भविष्य सांगण्यासाठी व भविष्याचा कालावधी सांगण्या साठी याचा उपयोग होतो.कृष्णमुर्ती पध्दती नुसार रविचे भ्रमण संबधीत महादशा स्वामीच्या राशीतुन व अतर्दंशा स्वामीच्या नक्षत्रातुन व विदशा स्वामीच्या उप-नक्षत्रातुन होतांना घटना होत असतात.
पारंपारिक पध्दति नुसार चंद्राचे भ्रमण कुंडलीतुन पाहिले जाते.
असे भ्रमण चंद्रा पासुन पाहिले जाते.
रविचे भ्रमण जन्म चंद्रापासुन ३-६-१० या स्थानी शुभ फ़ल मिळते चंद्र जन्म राशी पासुन १-३-६-७-१० स्थानी शुभ फ़ल देतो.
मंगळ चंद्रा पासुन३-६ स्थानी शुभ फ़ल देतो.
गुरु मुळ कुंडलीतील चंद्रा पासुन २-५-७-९ ,शुक्र १-२-३-४-५-८-९-११-१२ ह्या स्थानी , शनि ३-६ स्थानी,तसेच राहू-केतू चंद्रापासुन ३-६-१० या स्थानी असता शुभ फ़ले मिळतात.
आमच्या अनुभवा प्रमाणे कुठल्याही ग्रहाची गोचर भ्रमणे ही जन्मलग्ना पासुनच पहावी.
चंद्राचे भ्रमण महादशा स्वामीच्या राशीतुन व अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातुन किंवा अंतर्दशा स्वामीच्या राशीतुन व महादशा स्वामीच्या नक्षत्रातुन होत असल्यास शुभ फ़लदायी होते व असे दिवस लाभदायी ठरतात

Thursday, June 19, 2008

गोचर शनि ग्रहाचा होणारा परिणाम.






सध्या गोचर शनि हा ग्रह सिंह या स्थिर राशीतून भ्रमण करीत असून त्याचे परिणाम म्हणजे (ज्या जातकाचा चंद्र किंवा रवि जन्मकुंडलीत सिंह राशी मध्ये असेल किंवा सिंह राशी ६,८,१२ यास्थानां मध्ये असेल अशा जातकांनी आपल्या ह्रद्यासंबंधी (Heart diesease) किंवा रक्त वाहिन्यात ब्लाँकेज होण्याची शक्यता असल्याने हार्ट संबधी आजार असलेल्या व्यक्तिंनी या भ्रमणा दरम्यान विषेश काळजी घ्यावी तसेच काळजी म्हणून हाँस्पिटल मध्ये जाऊन आपले चेक अप करुन घ्यावे.
मेदनिय ज्योतिषा प्रमाणे पृथ्वीला मेदिनी असे म्हणतात.तरी मेदनिय ज्योतिषा प्रमाणे भारताच्या मकर कुडंली मध्ये आँगष्ट ,सप्टेंबर या कालावधीत शनि मंगळाची युती अष्ट्म स्थानात होत आहे त्याचे परिणाम स्वरुप भारतात जास्त प्रमाणात अपघात (Accident) होतील.

Wednesday, June 18, 2008

रत्ने gems अणि त्यांचे परिणाम...!




धन्यवाद वाचक वर्ग हो...!आपण माझ्या ब्लाँगला जो भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आपल्या मुळे या ब्लाँगची वाचकांची संख्या तर आजवर फ़क्त काही दिवसात ३००८ वर पोहोचली आहे अन ती वाढतेच आहे .पुनश्च मी आपले आभार मानतो....सादर आहे एक नवीन विषय....वाचा तर मग....>


मानवी जीवन हे अनेक दुःखाने भरलेले आहे .प्रसिध्द साहित्यिक गदिमांनी म्हटलेच आहे की पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा....दोष न कुणाचा..!
मानवाच्या पाठी तीन भव रोग लागले आहेत ते म्हणजे आधी...व्याधी...नि ऊपाधी...! आधी म्हणजे मनाचा रोग...व्याधी म्हणजे शारीरिक रोग...ऊपाधी म्हणजे धनाचा रोग त्यासाठी उपाय म्हणुन ॠषी-मुनी हे
अत्यंत दयाळू असल्याने त्यांनी ह्या परिहारा साठी मानव जातीवर अनंत उपकार करुन ठेवले आहेत.त्यांनी मणि..मंत्र..औषधी हे त्यावर तिन उपाय सुचवले आहेत. मणी म्हणजे रत्न(gems) हे आहेत.
कृष्णमुर्तीच्यां theory प्रमाणे सर्वांनांच रत्नांचा लाभ होत नाही.जातकाच्या जन्मकुंडली नुसार जी महादशा चालु असेल त्यावर गुरु चा लाभ योग किंवा नवपंचम योग असेल किंवा दॄष्टीयोग असेल तरच रत्नांचा फ़ायदा आपणास
अनुकुल होऊ शकतो.
काही ज्योतिषी अभ्यास नसल्यामुळे चुकिचे रत्ने वापरावयास सांगतात.
माझ्या कडे एक जातक घाई घाईत आला. त्याचा चेहरा भयभीत होता पण त्याचा हाताला फ़ँक्चर झाले होते. प्रथम त्याला पाणी प्यायला देउन शांत केले आणि मग त्यांना विचारले की आपण या अगोदर कुठल्या तरी ज्योतिषा कडे गेला होता का?
त्यावर ते पटकन मला म्हटले की आपण कस बरोबर ओळखल...! ते म्हटले आपण कसे काय ओळखले..?
मी म्हटलो..ते जाऊ द्या ..पण तुमच्या हातात जो निलमचा खडा(रत्न) आहे ते आपल्या कुंडली नुसार योग्य नसल्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे..तरी आपण तो आत्ताच्या आत्ता काढुन फ़ेकावा..
हे एकून तो जातक फ़ार चकित नि गंभीर झाला...त्याला मी सांगीतले की आपण या पुढे योग्य ज्योतिषा कडुनच रत्ने घ्यावीत नाही तर ‘निम हकिम खतरे जान’ या म्हणी प्रमाणे आपले आता तसेच झाले आहे..
त्यावर ते म्हटले‘ मी आपला अत्यंत आभारी आहे..तरी आता आपण मला आधी हे सांगा की मी आता रत्न वापरु की नको..?
ते म्हटले .... आणि वापरायचे असल्यास मला कोणती रत्ने लाभकारक ठरतील?
त्यावर मी त्याला सर्व कुडंली पाहुन सांगितले की आपल्या कुडंलीप्रमाणे निलम हे शनिच रत्न आपणाला सुटच होत नाही.
त्यामुळे आपण कुठलेही रत्ने तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच वापरावे; अन्यथा कुणी तरी सहज सांगितले, ‘आणि आम्ही घेतले’..! असे म्हणणारे मात्र ऊगाचच दुष्परिणांमाना सामोरे गेली्त अन आज जे घडले ते अनेक जण सांगत असतात तेव्हा ज्योतिषांने सुध्दा खडे सांगतांना या बाबतीत काळजी घेणे महत्वाचे आहे.

ग्रहांचे रत्ने आणि त्या पासुन मिळणा-या वैश्विक किरणे इत्यादी माहिती खाली दिली आहे.
ग्रह प्रमुख रत्न इंग्रजी नावे वैश्विक किरणांचा रंग
रवि माणिक Ruby तांबडा
मंगळ पोवळे Coral पिवळा
बुध पाचू Emerald हिरवा
शुक्र हिरा Diamond पारवा
चंद्र मोती Pearl नारिंगी
शनि नीलमणी Blue sapphire जाभंळा
गुरु पुष्कराज yellow sapphire निळा
राहू गोमेद agate अतिनील (Ultraviolet)
केतू लसण्या cat`s eye अतितांबडा (Infrared)

रत्ने हे किमान किती कँरेट्चे वापरणे आवश्यक आहे?
साधारणतः रत्ने ही अडीच ते तीन कँरेट असावीत .माझ्या मते आपण केवळ रत्नांच्या किमंती म्हाग आहे म्हणुन कमी वजनाची घेउन वापरु नये त्याचा फ़ायदा होत नाही.हिरा याला अपवाद आहे हे रत्न खुप महाग आहे ते

आपण १० सेंट ते ३० सेंट पर्यंत घेऊ शकतात.

किती मिली ग्रँम म्हणजे १ एक कँरेट होईल?२०० मिलीग्रँम = १ एक कँरेट हे लक्षात घ्यावे.
१ एक कँरेट = १०० सेंट.
रत्ने हे कुठल्या हातात वापरावे?
रत्न ही ऊजव्या हाताच्या बोटां मध्ये वापरावीत.

अगंठी घालण्या अगोदर काय करावे?अगंठी तयार झाल्यावर त्यात बनवणा-या कारागिराचे अशुध्द कंपन त्या अगंठीत ऊतरलेले असतात म्हणुन अगंठीला शुध्द करणे आवश्यक आहे.

अगंठीला शुध्द कसे करावे?अगंठीला शुध्द करण्यासाठी आपण त्याग्रहाचे मंत्र कमीत कमी ११ वेळेस म्हणावे तत्पुर्वी अंगठी ही शुध्द गाईच्या दुधात रात्र भर ठेवुन हा विधी करावा आणि समजा रविची अंगठी असेल तर रविवारी सुर्योदया नंतर एक तासाच्या आत ती बोटात घालावी.त्याप्रमाणे चंद्राचा मोती सोमवारी घालावा तसेच ईतर ग्रहांचे नाव व वार लक्षात ठेवा व त्यावारी्च ते हाताच्या बोटात घालावे.

Monday, June 16, 2008

नववांश कुडंली कशी पहावी?





दिसत नसल्यास वरील कुडंलीवर क्लिक करावे

नवमांश कुडंली काढतांना राशीतत्वे विचारात घ्यावी लागतात ऊदा. १-मेष,५-सिहं-९-धनू या अग्नि राशी असून त्यांचा नवमांश मेष राशी पासून सुरु होतो.
२वृषभ-६कन्या-१०मकर या पॄथ्वीतत्वाच्या राशी असुन त्यांचा नवमांश १०-मकर राशी पासून सुरु होतो.

३मिथुन-७तुळ-११कुभं या वाय़ुराशी असुन त्यांचा नवमांश ७तुळ राशी पासून सुरु होतो.

४कर्क-८वॄश्चिक-१२मीन या जलराशी असुन त्यांचा नवमांश ४कर्क राशी पासून सुरु होतो.

वरील नियमा नुसार आपण दिलेल्या वरील जन्म कुडंलीत वॄश्चिक लग्न आहे व ते पहिल्या चरणा मध्ये असल्यामुळे ते कर्क नवामांशा पासुन सुरु होईल त्या प्रमाणे उदारहरण कुडंलीत कर्क नवामांश लग्न दाखवुन त्या नुसार नवामांश कुडंली काढली आहे .
नवामांश कुडंलीला फ़ार महत्व असते.नवामांश कुडंली वरुन ग्रहांचे बल व वैवाहिक जीवना विषयी माहिती कळते.

Sunday, June 15, 2008

कुडंली वरुन नातेसंबध कसे काय ओळखावे.?



कुडंलीला अधिक स्पष्ट्पणे पहाण्या करीता त्यावर क्लिक करा.
सामान्यतः कुडंली वरुन नातेसंबध कसे काय ओळखावे यासाठी सोबतच्या कुंडलीतील भाव पाहुन आपण परस्परांमध्ये संबध कसे असतिल ते समजू शकता.

Friday, June 13, 2008

प्रश्न वाचकांचे-उत्तर आमची.

अभिजित
धन्यवाद .
आपल्या विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देत आहोत.
प्रश्न १)गुणमेलन कोष्टकावरुन मृत्यूषडाष्टक योग कसा काय समजतो?
अभिजित आपण दाते (मोठे चालू वर्षाचे) पंचागांत पान नं. १० वर सद्सत्कूटकोष्टकानि या कोष्टकात अथ प्रितिषडष्टकं व अथ मॄत्युषडष्टकं ह्या उप-मथळ्या खाली ही सर्व माहिती दिलेली आहे तत्पर्वी आम्हीही pictorial graphicalव कुडंली काढुन ही माहिती अगोदर सोदाहरणासह स्पष्ट केलीली आहे.दाते (मोठे चालू वर्षाचे) पंचागांत पान नं. १० वर एकुण आठ कुटे दिलेली आहेत आणि प्रत्येक कुटानुसार त्याच्यात गुण दिलेले आहेत.वधु-वरांच्या जन्म राशी नक्षत्रानुसार किती गुण जमतात याचे घटीत गुण-मेलन कोष्टक प्रत्येक पंचांगात दिलेलेच असते कॄपया त्याचे अवलोकन व्हावे.त्या साठी कुंडली पहायलाच हवी पण कुडंली नसल्यास वधु-वरांचे जन्म राशी नक्षत्र माहिती असावे लागते त्यासाठी स्पष्ट चंद्र किती अंशा मध्ये आहे याची माहिती लागते आणि पंचांगाच्या अवकहडा चक्रा मध्ये स्पष्ट चंद्रावरुन ह्या गोष्टी कळतात त्यामुळे आम्ही या प्राथमिक गोष्टी लिहीणे अगत्याचे समजले नाही.परंतु नुसत्या गुणमेलन कोष्टकावरुन विवाह जुळविणे धोक्याचे आहे असे आमचे मत आहे. यासाठी आणखीन कृष्णमुर्ति पध्दति प्रमाणे सुक्ष्म नियम लावुन योग्य निर्णय देता येतो. तसेच ग्रह मेलनही तितकेच महत्वाचे आहे त्यासाठी आपण कुणाचे वैयक्तिक प्रश्न असल्यास तसा ई-मेल करावा या संदर्भात आपणास हवे असल्यास सशुल्क मार्गदर्शन ऊपलब्ध होईल.
प्रश्न २ मुलाचे नक्षत्र चरण आणि वधुचे नक्षत्र चरण इतक्याच माहीती वरुन हा योग आहे की नाही हे कसे समजते? आपणास नक्षत्र चरणावरुन वधु वरांच्या चंद्र राशी समजतील आणि चंद्र राशी वरुन आपणास आम्ही आमच्या ब्लाँगवर explain केलेल्या प्रमाणे मृत्यूषडाष्टक योग कसा होतो ते सोप्या पध्द्तीने जास्त कळेल.
तज्ञ,अनुभवी ज्योतिष्यांना ही बाब तात्काळ समजुन येते.ऊदा. मघा नक्षत्र दिले असेल तर त्याची सिंह राशी असेल असे समजु शकेल.

Thursday, June 12, 2008

नोकरी किंवा व्यवसाय ?

कुडंलीत प्रामुख्याने दशमस्थाना मध्ये असलेल्या ग्रहानुसार जातकाला संपत्तिचा लाभ होतो.दशमा मध्ये रवि असला तर त्या जातकाला पित्या कडुन संपत्ती प्राप्त होते.चंद्र असल्यास आई कडुन जातकाला लाभ होतो.
मंगळ असलातर शत्रु पासुन लाभ होतो.
बुध असला तर मित्रांकडुन .
गुरु असला तर भाऊ.शुक्र असेल बायको पासुन.
शनि असेल नोकर वर्गांकडुन लाभ होतो.इतरांच्या मतानुसार लग्न,चंद्र,रवि यांच्या पासुन जो दशमस्थानाचा जो बलवान स्वामी असेल तर तो ज्या नवमांशात असेल त्या स्वामी नुसार धंदा असतो.
१)जर नवमांशाचा स्वामी जर रवि असेल तर जातक औषधी,गवत,लोकर,पाणी,धान्य,मोती,सरकारी नोकरी किंवा सरकार मध्ये मंत्री.
२)जर नवमांशाचा स्वामी जर चंद्र असेल तर जातक पाण्यापासुन ऊपन्न होणा-या वस्तुंचा वापर करतो.शेती,कपडे वगैरे.
३)जर नवमांशाचा स्वामी जर मंगळ असेल तर जातक ओतकाम, फ़ोर्जींग,युध्द,शिपाई इत्यादी धंदा करतो.
४)जर नवमांशाचा स्वामी जर बुध असेल तर जातक कला,काव्य,जोतिष्य,वेध, दुस-यासाठी मंत्र म्हणतो तसेच पुजारी होतात.
५)जर नवमांशाचा स्वामी जर गुरु असेल तर जातक टीचर,पुरोहित,कायदेतज्ञ ,वकिल होतो.
६)जर नवमांशाचा स्वामी जर शुक्र असेल तर जातक हत्ती,पाळीव जनावरे,गुळ,इत्यादींचा धंदा करतो.
७)जर नवमांशाचा स्वामी जर शनि असेल तर जातक वखार,सुतार काम,नोकर ऊद्योग,मजुर होतो.
८)कुडंलीतील दशमास्थानातील दशमेशाचा नवमांश स्वामी जर शुभ ग्रह असेल तर तो जातक दुस-याला फ़ायदेशीर ठरतो.कुडंलीतील दशमास्थानातील दशमेशाचा नवमांश स्वामी जर अशुभ ग्रह असेल तर तो जातक दुस-याला नुकसानकारक ठरतो.आमच्या अनुभवा प्रमाणे जातकाच्या नवमांश जन्म लग्न कुडंली काढावी आणि त्या नवमांश कुडंलीचा दशमेश जन्म कुडंली(ठोकळा) मध्ये ज्या राशीचा व स्थाना मध्ये असेल त्या प्रमाणे नोकरी, व्यवसाय असतो.कृष्णमुर्ती पध्दती नुसार जन्मलग्न कुडंलीच्या दशमस्थानाच्या उप-नक्षत्र स्वामी नुसार जातक नोकरी किंवा व्यवसाय करेल हे समजते आणि दशमस्थानाचा स्वामी आणि दशम स्थानातील नक्षत्र स्वामी नुसार व त्याच्या कार्यकत्वा नुसार नोकरी किंवा व्यवसाय समजतो.

Wednesday, June 11, 2008

वाचकांच्या काही महत्वाच्या प्रश्नांना दिलेली ही उत्तर






वाचता येत नसल्यास वरील कुडंली वर क्लिक करा व मोठी करुन पहा.


भविष्याचि गुरुकिल्ली या मराठी भविष्याच्या ब्लाँगला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे .माझ्या भविष्याच्या ब्लाँगला वाचकांनी काही प्रश्न विचारले आहेत.वाचकांच्या काही महत्वाच्या प्रश्नांना दिलेली ही ऊत्तर

वाचकांचे प्रश्न :
धन्यवाद अभिजीत ! आपण विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देत आहोत.
आपण विचारले आहे.
मृत्यूषडाष्टक म्हणजे नक्की काय असतं? जन्मलग्न कुडंलीत चंद्र व जन्मलग्न यांच्या परस्पर कुडंल्या मध्ये वरील आकृतित दाखविल्या प्रमाणे षडाष्टक
योग झाले असल्यास अशा योगांना मृत्यूषडाष्टक योग म्हणतात.

या योगात लग्न केले असता नेमका काय दुष्परिणाम होतो.?
पति -पत्नी यांच्यांत आपसात भाडंण होतात,एकमेकांना पटत नाही.भाडंण होतात .जीवन सुसह्य होत नाही. आयूष्यभर भाडंण होतात.

या योगा मुळे कोणाचा मृत्य़ू संभवतो की काय?या योगा मुळे कोणाचाही मृत्य़ू होत नाही.कुडंलीत केवळ या योगा मुळे कोणाचा तरी मृत्य़ू होतो ही एक भ्रामक कल्पना आहे.
फ़ार तर पति -पत्नी यांच्यांत आपसात बेबनाम होते.पति -पत्नी यांच्यात दुरावा निर्माण होऊन याची परीणति म्हणजे शेवटी घटस्फ़ोट होतो.

Tuesday, June 10, 2008

वैवाहिक जीवनातील गुण मेलन !





वरील कुडंलीवर क्लिक करुन मोठी करुन वाचा.


इंग्रजीत एक अशी सुप्रसिध्द म्हण आहे की Marriages are made in Heaven असे असले तरी सुध्दा लग्न ही पत्रिकेनुसारच जूळवले जातात म्हणुन ज्योतिषाने चांगल्या प्रकारे वधु-वराची पत्रिका मेलन करुनच विवाह जुळ्वणे योग्य होईल. वधु-वर गुण मेलन व वधु-वर पत्रिका मेलन यात फ़ार फ़रक आहे. दोन पत्रिकांमध्ये चांगले गुण मिळालेले असतांना सुध्दा काहींचे घटस्फ़ोट झालेले असतात कारण नुसते ठोकळा कुंडली वरुन गुणमेलन केलेले असते.पत्रिकेमधील ग्रहांचे योग पाहीलेले नसतात.आपल्याकडे परंपरागत गुणमेलन पध्द्त स्विकारली गेली आहे.वधु-वरांच्या जन्म राशी व जन्म राशी नुसार आठ कूटे पाहुन त्यांना गुण दिले जातात.त्यानुसार १८ च्या वर गुण मिळाल्यास पत्रिका विवाहयोग्य ठरविली जाते.परंतु ग्रहमेलना नुसार वधु-वरांच्या जन्मलग्न राशी ह्या परस्परांपासुन २,६,८,१२ या स्थानात नसाव्यात म्हणजेच षडाष्टक किंवा द्विर्द्वादश योग नसावा.
दोघांच्या चंन्द्र राशी सुध्दा एकमेकांपासुन २,६,८,१२ स्थानी नसाव्यात.
वरील बाबतीत लग्नराशी मैत्री व चंद्र राशी मैत्री याला अपवाद आहेत. एकाच ग्रहांच्या राशी षडाष्ट्क योगात किंवा द्विर्द्वादश योगात असतील तर त्यांचे राशी स्वामी एकच असल्यामुळे त्यांच्या स्वभावात व मतात विचार भिन्नता नसते तेव्हा अशा पत्रिका सुध्दा जुळवाव्यात.त्याच प्रमाणे एक नाडी दोष सुध्दा वधु वरांच्या पत्रिके मध्ये असला तर सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
वैवाहिक सौख्य ,संतति सौख्य, कामजीवन ,आरोग्य ,आयूष्य या गोष्टींचा सुध्दा पत्रिकेमध्ये सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

Monday, June 9, 2008

साडेसाती म्हणजे काय?





वरील कुडलीं मोठी करुन पहाण्यासाठी तिच्यावर क्लिक करावे

साडेसाती म्हणजे काय?
कुंडलीत साडेसाती किती वर्ष असते?
२००८ मध्ये कोण-कोणत्या राशींना साडेसाती आहे?
साडेसातीत काय वर्ज करायला सांगीतले जाते?
साडेसातीत कोणत्या देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे?
कुंडलीत साडेसाती असतांना आपण कसे रहावे?

चंन्द्र हा मनाचा कारक असल्यामुळे शनि या पापग्रहामुळे साडेसाती असलेल्या जातकाची मानसिक स्थिती खराब होते.मनावर नियंत्रण राहत नाही.
चंन्द्राच्या ४ थ्या आणि ८ व्या स्थानामध्ये शनि असल्यास त्याला अर्ध साडेसाती किंवा पणौति असे म्हणतात.
या कालात जातकाला आर्थिक ,मानसिक आणि अपघात होणे अशा स्वरुपाचा खुप त्रास होतो.

कोणत्या राशींना साडेसातीचा त्रास जास्त होतो?
सर्व साधारणपणे मेष,सिह,धनु या अग्निराशींना व कर्क,वॄश्चिक,मीन या जलराशीं मध्ये चंन्द्र असलेल्या जातकांना जास्त त्रास होतो.

साडेसातीत काय वर्ज करायला सांगीतले जाते?
साडेसातीत शनि या देवतेचे दर्शन घेऊ नये. कारण पौराणिक वाल्मिकी रामायणात केलेल्या ऊल्लेखा प्रमाणे रावणाच्या पायाखाली असलेल्या नऊ ग्रहां पैकी शनि या ग्रहाची दॄष्टी रावणावर पडल्याने बलाढ्य रावणावर अनेक संकटे येऊन त्याचा सर्वनाश झाला.

शनि साडेसाती मध्ये माणसाचे गर्वहरण,अहंकार नष्ट करुन त्याला वठणीवर आणायचे काम करतो.म्हणुन शनिला फ़ौजदार म्हटले जाते.

साडेसातीत कोणत्या देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे?
साडेसातीत हनुमान या वायु देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे. कारण हनुमान हा शनिच्या
डोक्यावर बसला होता अशी कथा आहे म्हणुन हनुमानाची भक्ति ,ऊपासना साडेसातीत केली जाते.
साडेसातीत हनुमान चालिसा वाचावी. मारुति हा रुद्राचा अवतार आहे आणि सप्तचिरंजीवां पैकी एक आहे.साडेसातीत शिव शंकर महादेवाची ऊपासनाही केलेली चालते.

कुंडलीत साडेसाती असतांना आपण कसे रहावे?
साडेसातीत सत्य बोलावे कुठलेही वाईट काम करु नये.भ्रष्टाचार करु नये नाहीतर त्रास संभवतो.


..........................................
वाचा आगामी आर्टिकल ...वैवाहिक जीवनातील गुण मेलन !

Sunday, June 8, 2008

कालसर्प योग विधी

कालसर्प योगाच्या परिहारा साठी पवित्र नदीच्या संगमावर किंवा नाशिक जिल्हातील त्रंबकेश्वर या ठिकाणी
नारायण नागबली विधी करावा.
त्रिपींडी हा विधी पुर्वजांच्या शाप निवारणार्थ केला जातो.

Saturday, June 7, 2008

कालसर्प योग



सुर्य आणि चंन्द्र भ्रमणाच्या कक्षावृत्ताच्या अवती भवती जे दोन संपात बिंन्दू होतात त्या दोन्ही बिदूंना ज्योतिष्यशास्त्रात ग्रहांचे स्थान देण्यात आले आहे उर्ध्वबिदूंला राहू आणि अधःबिदूंला केतू अशी संज्ञा देण्यात आली आहे.
मेदनिय ज्योतिष्यशास्त्रा प्रमाणे कालसर्प योगामुळे जगामध्ये भुंकप,बाँम्ब स्फ़ोट, राजकिय उलथापालथ होत असते.
कालसर्प योग हा राहू केतू च्या मध्ये एकाच बाजुला सर्व ग्रह असता त्यास कालसर्प योग म्हणतात.
कालसर्प योगाची कुंडली धारकाला जीवनात अनेक चढऊतार संभवतात,भाग्योदयात अडथळे येतात आयूष्यभर त्या व्यक्तिला संघर्ष करावे लागतात.
कालसर्प योगाचे दोन प्रकार आहेत १) कालसर्प योग म्हणतात २) अर्धचंन्द्र योग.
कालसर्प योगामुळे प्रगतित अडथळे येतात परंतु अर्धचंन्द्र योगामुळे सुखात व समृध्दित वाढ होते.
कुडंलीत २,६,८,१२ स्थाना मध्ये राहू किवां केतू असतील त्याच्या एकाच बाजुला व एकाच गोलार्धात जर सर्व ग्रह असतील (अपवाद हर्षल नेपच्यून सोडुन) आणि जन्मतः राहू वक्र गतिने सर्व ग्रहांना गिळंकॄत करीत असेल
तरच कालसर्प योग होतो. आणि याच्या उलट अशी परीस्थीती असेल तर कालसर्प योग न होता अर्धचंन्द्र होतो व हा शुभ फ़ले देतो.

Thursday, June 5, 2008

ग्रहांचा दॄष्टियोग आणि प्रत्येक ग्रहांना दिलेल्या राशी




कुडंली वर क्लिक करावे.
ग्रहांचा दॄष्टियोग: कुठला ग्रह कुठल्या स्थानावर बघतो. ( लक्षात ठेवावे )

मंगळ (ज्या स्थानात असतो त्या स्थानावरुन ) ४,७,८ या स्थानावर पहातो.
गुरु (ज्या स्थानात असतो त्या स्थानावरुन ) ५,७,९ या स्थानावर पहातो.
शनि (ज्या स्थानात असतो त्या स्थानावरुन ) ३,७,१० या स्थानावर पहातो.
रवि,चंन्द्र,शुक्र,बुध हे ग्रह स्वस्थानापासुन फ़क्त (ज्या स्थानात असतो त्या स्थानावरुन ) ७ या स्थानावर पहातो.

प्रत्येक ग्रहांना दिलेल्या राशी पहा: मंगळ १,८ (म्हणजे मेष, वॄश्चिक )
चंन्द्र ४ (म्हणजे कर्क )
बुध ३, ६ (मिथुन ,कन्या)
गुरु ९,१२ (धनु, मीन)
शुक्र २,७ ( वृषभ,तुळ)
शनि १०,११ ( मकर,कुंभ)
रवि ५ ( सिंह )

Tuesday, June 3, 2008

कुंडलीतील त्रिकस्थान ६,८,१२




वरील कुंडली स्पष्ट दिसत नसल्यास त्यावर क्लिक करावे.

कुंडलीतील त्रिकस्थान ६,८,१२ ही स्थान मानवी जीवनामध्ये दुःख निर्माण करणारे स्थान आहेत.
६ व्या स्थानावरुन कुठला आजार होणार आहे हे समजते.
८ व्या स्थानावरुन घात-अपघात (danger) ,कुठल्या प्रकारे मरण येईल ईत्यादी गोष्टींचे स्वरुप कळते.
१२ व्या स्थानामध्ये हाँस्पिटल मध्ये जाण्याची पाळी केव्हा येईल हे कळते.

Monday, June 2, 2008

मोक्ष त्रिकोण



वरील कुंडली दिसत नसल्यास तिच्यावर क्लिक करावे.

मोक्ष त्रिकोणात शुभग्रह असल्यास जातकाची प्रगती ,आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल होते.

Sunday, June 1, 2008

काम त्रिकोण



सूचना: वरील कुंडलीवर दिसत नसल्यास क्लिक करावे.

काम त्रिकोणात ग्रह असल्यास जातकाची वॄत्ती कामप्रवॄत्तीप्रद असते किंवा यांचे मालक ३,७,११ या स्थानात असले तर तोच परीणाम होतो.