Saturday, May 31, 2008

अर्थ त्रिकोण




अर्थ त्रिकोणात शुभ ग्रह असल्यास जातकाची आर्थिक स्थीति चांगली असते.किंवा यांचे मालक २,६,१० या स्थानात असले तर तोच परीणाम होतो.

Friday, May 30, 2008

धर्म त्रिकोण

धर्म त्रिकोणात शुभ ग्रह असल्यास जातक धार्मिक वॄत्तीचा असतो किंवा यांचे मालक १,५,९ या स्थानात असले तर तोच परीणाम होतो.




वरील कुंडली वाचता येत नसल्यास तिच्यावर क्लिक करावे.

Thursday, May 29, 2008

पणफ़र आणि आपोक्लिन स्थान



पणफ़र स्थानात अशुभ ग्रह असल्यास तरुण वयात जीवनात त्रास होतो.
द्वितिय स्थान (धन स्थान) ,पंचम स्थान हे शेअर्स,संतत्ती वगैरेचा लाभ दाखवतो,अष्टमस्थान हे इन्शुरन्स ,लाच-लुचपत वगैरे पासुन लाभ दाखवतो.मॄत्युचे स्वरुप कळते. अकरावे स्थान हे उद्योग धंद्यापासुन लाभ दाखवतो.

आपोक्लिन(३,६,९,१२) स्थानात मध्ये अशुभ ग्रह शनि,मंगळ ,राहु ,केतू असले तर म्हातारपण कष्ट्प्रद जाते.

Wednesday, May 28, 2008

पंचमहापुरुष योग

केन्द्रं स्थानात शुभ ग्रह (उदा.बुध,गुरु,शुक्र,चंन्द्र ,गुरु ) व अशुभ ग्रह (उदा.शनि, मंगळ) उच्चीचे असल्यास किंवा स्वराशीचे असल्यास पंचमहापुरुष योग होतो.त्यामुळे जातकाला जीवनामध्ये उच्च अधिकार योग व संपत्ती प्राप्त होते.



वरील कुडंली वाचता येत नसल्यास कुडंलीवर क्लिक करावे

Monday, May 26, 2008

कुडंली रेखाटण्याच्या च्या दोन भारतीय विविध पध्दति



कुडंली वाचता येत नसेल तर तिच्यावर क्लिक करा.




कुडंली वाचता येत नसेल तर तिच्यावर क्लिक करा. कुडंली रेखाटण्याच्या च्या या दोन भारतीय विविध पध्दति आहेत.

Thursday, May 22, 2008

मंगळ प्रधान व्यक्तिची कुंडली


(वरील कुंडली वाचता येत नसल्यास तिच्या वर क्लिक करावे.)
मंगळ प्रधान व्यक्तिची कुंडली (माझ्या ब्लाँगवर मला वाचकांनी विचारले की मंगळ प्रधान व्यक्तिविषयी आपण माहिती सांगावी त्यासाठी आपण खालील उदा.पहावे.)

जन्म कुंडलीमध्ये 1,4,7,8,12 स्थानी मंगळ असल्यास त्या कुंडलीला मंगळाची कुंडली म्हणतात.
मंगळाच्या दोषाला कुज दोष किंवा भौम दोष म्हणतात.एखाद्याच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास जोडीदाराच्या कुडंलीत सुध्दा मंगळ दोष असायला पाहिजे असा एक समज आहे अन्यथा वैवाहिक सौख्य बिघडते असा एक समज आहे त्यात फ़ारसे तथ्य नाही.तसेच 1,5,7,10 या स्थानी शनि असल्यास मंगळाचा दोष नाहीसा होतो असा गैरसमज रुढ आहे.
माझ्या मते मंगळ 1,4,7,8,12 या स्थानात स्वराशीत किंवा उच्च राशीत असल्यास मंगळाचा दोष अशुभ फ़ळे देत नाही.अन्य राशीत पाप ग्रहांनी युक्त किंवा पाप ग्रहांनी दृष्ट मंगळ असल्यास वाईट फ़ळे मिळतीलच.
तसेच मंगळ 1,4,12 या स्थानात असेल व सप्तमात देखील एखादा पाप ग्रह असेल तरच वैवाहिक सौख्य बिघडेल.
लग्न स्थानातील मंगळ व्यक्तिला तापट ,अविचारी बनवतो.अशा व्यक्तिला जोडीदार शांत व नमते घेणारा मिळाला तर लग्न स्थानातील मंगळ फ़ारसा ताप दायक होणार नाही त्यामुळे जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ नसला तरी चालेल.
चतुर्थ स्थानात मंगळ असल्यास घरात भांडण होतात. सासु-सुन ,नंणद भाउजयी यांच्यात भांडण होतात.
एकत्र कुंटुंब पध्दतीत यांचे कुणाशीही पटत नाही.दोघं पती-पत्नीने वेगळे घर थाटल्यास मंगळ दोष त्रासदायक ठरणार नाही.
व्यय स्थानातील मंगळ कामवासना प्रबळ करतो आणि खर्चीक वृत्ती दर्शवितो.मात्र व्ययात मंगळ असणारी स्त्री पतीला सुख देणार नाही तसेच तिच्या लहरी प्रमाणे ती पतीला सुख देईल.
व्यय स्थानातील शुक्र,मंगळ असलेले स्त्री-पुरुष नीतीने वागत नाही.
ज्या स्त्रींयांच्या कुंडलींत मंगळ शुक्राच्या किंवा बुधाच्या राशीत असेल आणि त्यावर बुध ,शुक्र ,शनि,राहू, नेपच्यूनचा युति योग किंवा दॄष्टीयोग असल्यास अशा स्त्रीया वाममार्गाला जाऊ शकतात.

Wednesday, May 21, 2008

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव ?भाग २


( कुडंली दिसत नसल्यास वरील कुडंलीवर क्लिक करावे.)
आज पाहुया उर्वरीत भागातला- जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव ?
कन्या राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव चिकित्सक असुन कुठल्याही गोष्टीतील गुढ तत्व जाणुन घेण्याची तीव्र ईच्छा त्या लोकांना असते.
तुळ राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव चांगले मिष्टांन खावेसे वाटते.चवदार भोजन व ऊत्कॄष्ट दर्जाचे भोजन आवडते.

वॄश्चिक राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव कामप्रधान(विषयी) असतो.ह्या जातकात एखाद्या संबधी जर वैर भाव निर्माण झाल्यास कायम टिकु शकतो.

धनु राशीत ग्रह असल्यास माणसाचा स्वभाव म्हणजे हे माणस आपला मुद्दा हे सोडत नाही .थोडाक्यात ते हेकेखोर असतात self assertive उदा.मेरी मुर्गीकी एक ही टांग असा हट्टी स्वभाव त्यांचा असतो.

मकर राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव ब-याचशा गोष्टी हसण्यावारी नेणारा असतो(laughing instinct).एखाद्या गोष्टींच्या किंवा माणसांच्या मागे लागल्यास त्याचा पिच्छा ते लवकर सोडत नाही.

कुंभ राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव रचनात्मक (constructive nature) असतो.

मीन राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव पळकपुटेपणा कडे नेणारा असतो .
वरील राशी मधील ग्रहाचा अनुभव केव्हा येतो? ज्यावेळी हे ग्रह जन्म लग्न घरात असतात किंवा लग्नेश हा ग्रह त्या त्या राशीत असतो.
उदा पहा.

Saturday, May 17, 2008

सर्व नक्षत्र

आज आपल्याला सर्व नक्षत्र तोंडी पाठ करावयाचे आहे हे लक्षात असु द्या.

एकुण नक्षत्र 27 आहेत पण ऊत्तराषाढा नक्षत्राचा काही भाग व श्रवण नक्षत्राचा काही भाग मिळुन‘अभिजित’ हे 28 वे नक्षत्र मानले जाते.परतुं काल निर्णय करतांना या नक्षत्रांचा विचार केलेला नाही.प्रत्येक नक्षत्र हे क्रांतीवॄत्तावर चंद्राला 13 डीग्री 20 मिनिटं जावयास जेवढा कालावधी लागतो तेवढा वेळ ते असते हे लक्षात ठेवा.

क्र. नक्षत्र नक्षत्राधिपती
1 अश्विनी केतू
2 भरणी शुक्र
3 कृतिका रवि
4 रोहिणी चंद्र
5 मृग मंगळ
6 आर्द्रा राहू
7 पुनर्वसू गुरु
8 पुष्य शनि
9 आश्लेषा बुध
10 मघा केतू
11 पुर्वा (पुर्वा फ़ाल्गुनी) शुक्र
12 उत्तरा ( उत्तरा फ़ाल्गुनी) रवि
13 हस्त चंद्र
नक्षत्रांचा अभ्यास करु पुढील भागात.
14 चित्रा मंगळ
15 स्वाती राहू
16 विशाखा गुरु
17 अनुराधा शनि
18 जेष्ठा बुध
19 मूळ केतू
20 पूर्वाषाढा शुक्र
21उत्तराषाढा रवि
22 श्रवण चंद्र
23 धनिष्ठा मंगळ
24 शततारका राहू
25 पूर्वा भाद्रपदा गुरु
26 उत्तरा भाद्रपदा शनि
27 रेवती बुध

Bookmark and Share

कुंडलीतील कुठले स्थान काय दर्शविते

ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी कुंडलीतील कुठले स्थान काय दर्शविते हे महत्वाचे आहे .त्याप्रमाणे या स्थानांचा आधार घेऊन आपल्याला भाकीत करावे लागते.




Bookmark and Share

कुंडली कशी वाचाल? कुंडलीतील स्थान...खालील प्रमाणे आहेत

कुंडलीतील स्थानांची ओळख






Bookmark and Share

Friday, May 16, 2008

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव असतो



अभ्यास करा: वरील कुडंलीतले प्रथम घराला जिथे 1आकडा आहे त्या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात हे स्थान लग्न घर म्हणुन ओळखले जाते. यात ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेच्या आकाशातल्या ग्रह गोलांच्या नकाशा नुसार लग्न घरातली राशी ह्या स्थानात येते.थोड्क्यात हे स्थान fix असते.जन्मवेळेनुसार प्रमाणे रास फ़क्त बदलत असते.वरील उदारणात मेष राशीचे
लग्न उदित आहे म्हण्जेच ज्योतिषाच्या भाषेत ही मेष लग्नाची कुडंली आहे.अशा बारा राशीच्या जन्मलग्न कुडंल्या तयार होतील कारण एका राशीचे जन्म लग्न हे जवळ्जवळ दोन तास ईदित असते म्हणजे अहोरात्री 24 तासात, 24/2 असे बारा लग्न उदित होतात.


******************************

जन्मकुंडलीच्या राशीमधील ग्रहा नुसार सामान्यतः माणसाचा स्वभाव असतो.
*मेष राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव चटबट्या (fighting nature) असतो.
*वृषभ राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव आज्ञापालन करणारा विनयशील(submissive )असतो.
*मिथुन राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव दुस-याचा तिरस्कार करणारा (hating nature)असतो.
*कर्क राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव भावनाप्रधान(emotional)असतो.
*सिंह राशीत ग्रह असल्यात माणसाचा स्वभाव कर्तबगार ,वस्तुंचा हव्यास असणारा (उदा.टीव्ही ,फ़्रिज हवेच(possessive) असतो पुढील भागात पाहुया 27 नक्षत्रांचा कुडलींतला प्रवास......त्याचे महत्व...

*कन्या राशी .....पुढील भागात पाहु...या!
त्यासाठी वाचत रहा....बना ऊत्कॄष्ट ज्योतिषी ...वाचा आणि शिका ......“भविष्याची गुरुकिल्ली”
या सर्दंभातआपले प्रश्न ,आपले अभिप्राय जरुर कळवा.


Bookmark and Share

पंचमहाभुतांवरुन माणसाचा साधारणतः स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते

आज पंचमहाभुतांवरुन माणसाचा साधारणतः स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता कशी समजते ते पाहु या
जन्मवेळेवर पुर्व दिशेला जी रास उदित असते तिला जन्मलग्न (Rising ascendentant)असे म्हणतात.
या लग्ना (Rising ascendentant )मध्ये जर अग्नितत्वाच्या या राशी उदित असल्यास त्या
माणसाने/जातकाने जगामध्ये Leadership मध्ये पुढाकार घ्यावा.Leadership करावी.
तसेच पृथ्वी तत्वाच्या 2,6,10 (वृषभ vrishbha Taures, कन्या kanny Virgo , मकर makar Capricorn पॄथ्वीराशी राशी)लग्ना उदित असल्यास त्या जातकाने व्यापार,शेती वगैरे उद्योग करावा.
तसेच या वायुराशी 3,7,11 मिथुन mithun Gemini ,तुळ tula Libra ,कुंभ kumbh Aquarius ) वायुराशी्चे लग्न उदित असल्यास त्या जातकाने नोकरी- सेवा(Job) करावी
तसेच या जलराशी 4,8,12( कर्क karkk Cancer , वॄश्चिक vrishikk Scorpio मीन meen Pisces जलराशीचे लग्न उदित असल्यास ज्ञानदानाचे कार्य करावे उदा.लेक्चरर ,टीचर ईत्यादी.
अग्निराशी 1,5,9 या राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक रोग प्रतिकार शक्ति चांगली असते.
पॄथ्वीराशी 2,6,10 या राशी लग्नात उदित असल्यास व वायुराशी 3,7,11 या राशी उदित असल्यास माणसाची रोगप्रतिकार शक्ति साधारण असते.
जलराशी 4,8,12 राशी लग्नात उदित असल्यास माणसाची शारिरीक प्रकृति कमकुवत असते व रोग प्रतिकारशक्ति कमी असुन साथीच्या रोगांना बळी पडातात.विषेशतः लहान मुलांना हा त्रास जास्त होतो.वरील तत्वांचा आपल्या जन्मकुंन्डलीत उपयोग करुन अभिप्राय जरुर कळवा.



************************************

Bookmark and Share

Thursday, May 15, 2008


WEL -COME TO BHAVISHYCHI GURUKILLI


॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥


प्रथम आपण राशी किती ते पाठ करा: 12 राशी क्रमानुसार पाठ करा:

राशी Rashi इंग्रजी नावे तत्व लक्षात ठेवा

1 मेष mesh Aries अग्निराशी 1

2 वृषभ vrishbh Taures पॄथ्वीराशी 2

3 मिथुन mithun Gemini वायुराशी 3

4 कर्क karkk Cancer जलराशी 4

5 सिंह shimh Leo अग्निराशी 5

6 कन्या kanny Virgo पॄथ्वीराशी 6

7 तुळ tula Libra वायुराशी 7

8 वॄश्चिक vrishikk Scorpio जलराशी 8

9 धनु dhanu Sagitrious अग्निराशी 9

10 मकर makar Capricorn पॄथ्वीराशी 10

11 कुंभ kumbh Aquarius वायुराशी 11

12 मीन meen Pisces जलराशी 12

अग्निराशी 1,5,9 पॄथ्वीराशी 2,6,10 वायुराशी 3,7,11 जलराशी 4,8,12
वरील पंचमहाभुतांवरुन माणसाचा साधारणतः स्वभाव ,शरीर प्रकृती,बुध्दीमत्ता समजते ते पाहु पुढील भागात




Bookmark and Share