Monday, July 14, 2008

महत्वपुर्ण ग्रहयोग.

या मध्ये युती योग ,एकराशांतर योग ,लाभ योग ,केंद्र योग ,नवपंचम योग ,षडाष्टक योग,प्रतियोग.
१. युती योग : जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत एकाच अंशात असल्यास त्या दोन ग्रहांचा युती योग होतो.
शुभ ग्रहा मधली युती शुभ फ़ळ देते अशुभ ग्रहामधली युती अशुभ फ़ळ देते.
२..लाभ योग : दोन ग्रहांमध्ये ६० अंशाचे अंतर असते किंवा एक ग्रह दुस-या ग्रहापासुन तिस-या स्थानात
असतो आणि दुसरा ग्रह पहिल्या ग्रहा पासुन ११ व्या स्थानात असतो म्हणून हा योग शुभ असतो.
३.एकराशांतर योग: दोन ग्रहा मध्ये तिस अंशाचे अंतर असते तेव्हा एकराशांतर योग किंवा द्विर्व्दाशक
योग म्हणतात.शुभ ग्रहा मधील एक राशांतर योग संपत्ती मिळवुन देतात.अशुभ ग्रह शुभ ग्रहाच्या बाराव्या स्थानी असता धननाश वैगरे संभवतो तसेच आर्थिक अडचणी येतात.
४.. केंद्र योग : दोन ग्रहांमध्ये नव्वद अंशाचे अंतर असते तेव्हा केंद्र योग होतो. हा योग अशुभ असतो.केंद्र
योगा मध्ये जीवनात संघर्ष निर्माण होतो.शांति समाधान मिळत नाही.
५..नवपंचम योग: या योगात दोन ग्रहात १२० अंशाचे अंतर असते याला त्रिकोण योग असेही म्हणतात .हा
योग अत्यंत शुभ मानला जातो.या योगामुळे किर्ति यश मिळते.शुभ ग्रहांच्या नवपंचम योगामुळे सुख मिळते
भाग्य मिळते. बुध गुरुच्या नवपंचम योगात बुध्दिमत्ता चांगली असते.
६.षडाष्टक योग: दोन ग्रहामधील अंतर १५० अंश असते दोन ग्रह एकमेकांपासुन ६ व्या व ८
व्या स्थानात असतात. हा योग फ़ारच अशुभ असतो.
७.प्रतियोग: या योगत दोन ग्रह एकमेकांच्या विरुध्द स्थानात असतात त्यांच्यात
१८० अंशाचे अंतर असते.अशुभ ग्रहा मधले प्रतियोग फ़ारच अशुभ असतात.
आजच्या तारखेची कुडंली दिली आहे. तिच्यात असलेले काही योग पहा आणि शिका.
दि. १४-०७-२००८ वेळ: ०६:३५ सांयकाळ

Monday, July 7, 2008

तुज आहे तुज पाशी.....!


पत्नीचा मेडीकल दुकाना वरुन अचानक फ़ोन आला ..पर्स मध्ये ठेवलेले माझे पैसे कुठेतरी हरवलेत की काय? .खरतर पैसे हरवल्यावर माणूस बैचेन होऊन जातो.मग मी त्वरीत कुंडली मांडून पाहिली वेळ होती रात्री ९:०२ दिनांक ५/०७/०८ या दिवसाची कुंडली मांडली.


त्यात मकर लग्न ऊदित होते.कँश हरवल्यामुळे धन स्थान हे रोकड रक्कम दाखवते. धनेश शनि असुन तो अष्टम स्थानात लाभेश मंगळाच्या युतीत आहे आणि त्याच्या वर व्ययेश गुरुची नवम दृष्टि आहे त्यामुळे पैसा सुरक्षित आहे असे दाखवत होते आणि लग्नेश शनि हा लाभेश मंगळाच्या युती मध्ये अष्टम स्थाना त असल्यामुळे पत्नीला तिचा पैसा ताब्यात मिळेल असे एकंदर दिसले व हा शोध मकर लग्न पुर्ण होण्याच्या आतच पाहीले पाहीजे त्या नुसार पत्नीला मी सांगितले की आपला पैसा हा घरातच कुठेतरी पहावा ....! पैसे कुठे असतील म्हणुन मग घरातच शोधाशोध सुरु झाली....अन पैसे घरातच सापडले...!कारण प्रश्न वेळी मकर हे चर राशीचे लग्न असल्यामुळे पैशाचा शोध लवकर लागेल असे सांगितले होते आणि त्याच प्रमाणे पैसे लगेचच मिळाल्याने त्यांना आनंद झाला.

Friday, July 4, 2008

राहू (अशुभ ) काल.



वर दिलेला रकाना मोठा करुन पहाण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
वर दिल्या प्रमाणे राहूचा अशुभ काळ दिला आहे त्या वारी दिलेल्या वेळेत आपण महत्वाची कामे करु नयेत तसेच या काळात बाहेरचा प्रवास टाळावा. एखाद्या माणसाच्या भेटीस जातांना ही वेळ शक्यतो टाळावी.आपण सोबत दिलेला चार्ट प्रिंट करुन तो खिशात ठेवावा म्हणजे आपणाला हा वर्ज्यकाळ पटकन लक्षात येईल.

Thursday, July 3, 2008

ग्रहांना कसे कराल प्रसन्न....!

वेगवेगळ्या ग्रहांचे वेगवेगळे मंत्र आहेत ते मंत्र व्यवस्थीत ,बरोबर उच्च्यारल्याने आपल्या सर्व शरीरात कंपन निर्माण होतात आणि शरीरा मध्ये आणि सर्व जगात एकोपा निर्माण होतो.वैदिक शास्त्रा नुसार एखाद्या देवतेचा मंत्र बरोबर उच्च्यारला असता ती देवता मत्रोंपच्चार करणा-याला प्रसन्न होऊन मदत करते.वेगवेगळ्या ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे ऊपाय आणि मंत्र आहेत.
आम्ही खाली दररोज लागणारे सशक्त मंत्र ,दान धर्म, पुजली जाणारी देवता,रुद्राक्ष यांच्या बद्दल माहिती देत आहोत.

१) रवि : रवि संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा रवि ग्रहा संबधी त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*शिव ऊपासना करावी
* दररोज गायत्री मंत्र म्हणावा.
*गव्हाचे आणि खडी साखर यांचे दान रविवारी करावे व रविवारी उपास करावा.
*रुद्राभिषेक करावा.
*एक मुखी किंवा बारा मुखी रुद्राक्ष परिधान करावा.
*दररोज सुर्याला लाल फ़ुल व रक्त चंदन वहावे.
२)चंद्र: संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा चंद्र ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*गौरीची ऊपासना करावी.
* अन्नपुर्णा स्तोत्र म्हणावे .
*चंद्र स्तोत्र म्हणावे .
*दान धर्म: गाईचे दुध किंवा तांदूळ अर्पण करावा.
*दर सोमवारी उपास करावा.
*देवीची पुजा करावी.
*द्वी-मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*पांढरे फ़ुल किंवा पांढरे चंदन वहावे.
३) मंगळ:संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा मंगळ ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*कार्तिकेय आणि शिवाची ऊपासना करावी. ॐ नमः शिवाय मंत्र म्हणावा.
*मंगळ स्तोत्र म्हणावे.
*मसूर डाळ मंगळवारी दान करावी.मंगळ वारी उपास करावा.
*कार्तिकेयाची पुजा किंवा रुद्राभिषेक करावा.
*तीन मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
* लाल फ़ुल आणि रक्त चंदन वहावे.
४) बुध:संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा बुध ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


* विष्णूची ऊपासना करावी किंवा विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र म्हणावे.
*बुध स्तोत्र म्हणावे.
*हिरवे चणे बुधवारी दान करावे. बुधवारी उपास करावा.
*चार मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*वेगवेगळ्या रंगाची फ़ुल जमवुन एकत्रित करुन पुजा करावी.
५)गुरु:.संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा गुरु ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*शिव किंवा आपण केलेल्या गुरुंची पुजा करावी.
*गुरु स्तोत्र म्हणावे.
*केशर ,हळद,किंवा साखर यांचे दान करावे. गुरुवारी ऊपास करावा.
*रुद्राभिषेक करावा.
*पंचमुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*पुजेत केशर,चंदन आणि पिवळे फ़ुले वाहावीत.
६) शुक्र: संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा शुक्र ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*शक्ती देवीची उपासना करावी.
*स्त्री-सूक्त,देवी स्तुती किंवा दुर्गा चालिसा म्हणावा.
*शुक्र स्तोत्र म्हणावे.
*कपडे,दुध किंवा दही एखाद्या स्त्रीला दान करावे.शुक्रवारी ऊपास करावा.दुर्गा देवीची पुजा करावी.
*सहामुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*पुजेत पांढरी फ़ुले किंवा पांढरे चंदन यांनी पुजा करावी.
७) शनि: संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा शनि ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


*हनुमान या देवतेची ऊपासना करावी.
*हनुमानाचे कुठलेही स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हणावे.
*शनि स्तोत्र म्हणावे.
*शनिवारी काळ तिळ किंवा म्हैस दान करावे.
*शनिवारी उपास करावा.
*सात मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*निळ्या गोकुर्णाची फ़ुल वाहावीत.
*पुजा करतांना मोहरीच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवावा.
*सात मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
८)राहू:संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा राहू ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.



* भैरव किंवा शिव देवतेची ऊपासना करावी.काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे.
*राहू स्तोत्र म्हणावे.
*ऊडीदाची डाळ आणि नारळ शनिवारी दान करावे.शनिवारी ऊपास करावा.
*आठ मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
* दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय म्हणावा.
*रात्री राहूची पुजा निळ्या फ़ुलांनी व चंदनाने करावी.
९)केतू:संबधी जीवना मध्ये महादशा किंवा अंतर्दशा आली असेल किंवा केतू ग्रहा संबधी
त्रास असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.


* गणपतीची ऊपासना करावी किंवा दररोज ११ वेळेस गणंपती अर्थवशीर्ष म्हणावे.
*केतूचे स्तोत्र म्हणावे.
*गुरवारी मोहरीच बी किंवा काळी गाय दान करावे.
*गुरुवारी उपास करावा.
*नव मुखी रुद्राक्ष परीधान करावा.
*शिव पंचाक्षरी स्तोत्र म्हणावे.
*पुजेत राखी रंगाचे फ़ुले व चंदन वाहावे.
वरील ऊपासनेत सांगितेले मंत्र किमान ११ वेळेस रोज म्हणावे.