*कुंडलीतील मंगळ हर्षल युती मुळातच अपघात दर्शक आहे.असा योग २,३,४,७,८,१२ स्थानी असेल तर वैवाहिक जीवनात मोठे संकटे येतात.
* चंद्र शनि अंशात्मक प्रतियोग वैवाहिक सौख्य लाभु देत नाही.
*मंगळ नेपच्यून प्रतियोग ,केंद्रयोग ,षडाष्टक योग वैवाहिक जीवनात गंभीर व्यथा दर्शवितो.
*गुरु हर्षल हा योग संततीसुख देत नाही वा त्याबद्दल दुःख देतो.
*शनि हर्षल युति सप्तमेशाच्या अष्टमस्थानी असेल तर पतिचा तडकाफ़डकी मृत्यु होतो.
*रवि-हर्षल अशुभ योग वैवाहिक जीवनात नाट्यमय घटना घडवितात. घटस्फ़ोट,वैधव्य यांची शक्यता असते.
*सप्तमात(विशेषता: ‘मुळ’ नक्षत्राचा) आणि धनु राशीचा जर मंगळ असेल व त्याची हर्षलशी युती असेल तर विवाह वेगळ्या प्रकारे होतो.(भांडण होतात , घटस्फ़ोट ,वैद्यव्य वगैरे असे प्रकार घडतात.
भविष्याची गुरुकिल्ली ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे. माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Tuesday, December 30, 2008
Friday, December 26, 2008
सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते



सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते
१९९३ ला आमचा हृषीकेश येथे जाण्याचा योग आला . गंगेकाठी वसलेले हृषीकेश म्हणजे पृथ्वी वरचा स्वर्ग जणूच...!आम्ही म्हणजे मी व माझा मुलगा तसेच आम्ही सहकुटूंब आणि १०० जणांचा आमचा साधक परिवार प.पू.ॐ मालती देवीं अर्थात आमच्या गुरुमाऊली यांच्या सोबत हृषीकेशला गेला होता.हृषीकेश येथे अनेक ठिकाण आम्ही पाहिलीत.लक्ष्मण झूला,शिवानंद झूला ,तसेच गंगे काठी ‘जंगली’ सिनेमाचे शूटिंग झाले तो स्पाँट पण गंगेच्या बाजूला पाहिला.
आश्रमात आम्ही ७ ते ८ दिवस होतो. प.पू. ॐ मालती देवीं ह्या हृषीकेशच्या स्वामी शिवानंदाच्या शिष्या आहेत.या गुरुभूमित पावित्र्य आहे .प.पू.ॐ मालती देवीं म्हणायच्या ही सदगुरुंची भूमि म्हणजे आम्हाला माहेरी आल्या सारखे वाटते.
प.पू.ॐ मालती देवीं यांची साधना कशी झाली? याबद्दल खूप सूदंर अनुभव आहे. १९५६ साली स्वामी शिवानंदाच्या
आश्रमात त्या दिल्लीच्या ऊन्हाळ्या पासुन लांब, निसर्गरम्य ठिकाणी सुट्या घालवण्यासाठी त्या आल्या होत्या तेव्हा स्वामी
शिवानंदाच्या आश्रमात प.पुजनीय स्वामी शिवानंदानी प.पु.ॐ मालती आईंना ‘शिवानंद योगत्रयी’हे पुस्तक दिले आणि
वाचायला सांगितले पुढे प.पु.ॐ मालती आईंनी यापुस्तकाच्या शेवटच्या पानापासुन वाचायला सुरुवात केली आणि प.पु.ॐ
मालती आईं ध्यानमार्गातल्या निर्वीकल्प समाधीत पोहोचल्यात. प.पु ॐ मालती आईंनी आपल्या साधन मार्गातल्या दिव्य अनुभवांना ‘कोणा एकाची साधन गाथा ’ यापुस्तकाच्या माध्यामातुन साधकां पर्यंत पोहोचवलेत ‘कोणा एकाची साधन गाथा ’ यापुस्तकात प.पु.ॐ मालती आईंनी एक उल्लेख केला तो म्हणजे मी ध्यानाच्या उच्च अवस्थे पर्यंत कशी पोहोचली ते केवळ माझ्या सदगुरुंनी दिलेल्या ‘शिवानंद योगत्रयी’ या पुस्तकाच्या माध्यमातून....! तेव्हा प.पु.ॐ मालतीआईं कडे येणारा प्रत्येक साधक स्वामी शिवानंद लिखित ‘शिवानंद योगत्रयी’ या पुस्तकाची मागणी करु लागला परंतु ह्या पुस्तकाच्या प्रति नंतर मात्र ऊपलब्ध होऊ शकल्या नाहीत. प्रत्येक येणारा याबाबत हे पु्स्तक कुठे मिळेल का हे पाहु लागला. मात्र असे पुस्तक आता ऊपलब्ध होऊ शकणार नाही असे ऊत्तर अनेकांना मिळाले होते.योगायोगाने आम्ही साधक स्वामी शिवानंदाच्या आश्रमाच्या पुस्तक विक्रिच्या ग्रथांलयात गेलो तेव्हा केवळ एकच प्रत इंग्रजीतली `TRIPLE YOGA' By Swami Shivananda.समोर दिसली आणि ती वाचण्याच्या ऊद्देशाने घेतली.हे पुस्तक वाचतांना पुढे तर मला असे वाटू लागले की इतक्या सुंदर इंग्रजी पुस्तकाचे मराठीत जर भाषांतर केले तर..माझे आँफ़िसचे डेली रुटीन आणि त्यानंतर सायंकाळी मी हे पुस्तक आणि नोटबुक पेन घेऊन बसु लागलो.भराभर मराठीतून भाषांतर करु लागलो किंबहुना हे पुस्तक पुर्णतः मराठीतून माझ्या कडुन भाषांतरीत झाले.आता प्रश्न होता तो प्रकाशनाचा.मग हृषीकेशच्या स्वामी चिदानंदाना पत्र लिहिले की `TRIPLE YOGA' By Swami Shivanandaया पुस्तकाच्या मराठी आवृत्तीला म्हणजे ‘शिवानंद योगत्रयी’ला परवानगी द्यावी हे पुस्तक छापायची परवानगी मिळाली.
पहाता पहाता या माझ्या भाषांतरीत पुस्तकाच्या प्रथमावृत्तीनंतर अनेक आवृत्या निघत गेल्या.ही केवळ सदगुरु कृपाच म्हणावी.
स्वामी शिवानंद यांचे नाव कुप्पूस्वामी ते मुळचे आध्रंच्या पट्टामलाई गावाचे त्यांचा जन्म १८८७ ला झाला बालवयात कुप्पूस्वामीच्या बुध्दिमत्तेची चमक दिसू लागली पुढे त्यांना वैद्दकिय शिक्षण घेतले.डाँक्टर म्हणून ते सेवेसाठी मलाया गावी
आले तेथे त्यांनी हाँस्पिस्टल मध्ये तन मन धन वाहुन सेवा केली.मुळतः विरागी वृत्ती असलेल्या स्वामीजीनां रुग्णांची सेवा
करतांना जाणवले की मानवी जीवन हे दुखाःनी भरलेले आहे .स्वामीजींचे मन शास्वत सुखाच्या शोधा साठी धडपडु लागले
त्यावेळी त्यांना एका योग्याने ‘जीव ब्रम्ह ऎक्य’ हे पुस्तक दिले.ते वाचून त्यांचे वैराग्य जागृत झाले. स्वामीजी भारतात परतले .पुढे ते यात्रा करत असतांना पंढरपुरला एका पोस्टमास्तरांकडे घरचे काम करुन राहु लागले.त्यांची सेवा स्वामी इतके करीत की पायही दाबीत.पुढे त्या पोस्टमास्तरांना विचारले आत्मसाक्षात्कार करुन घ्यायला कोणती जागा योग्य आहे तेव्हा त्या पोस्टमास्तरांनी स्वामीजींना हृषीकेशचे टिकिट काढुन दिले.स्वामीजीं त्या पोस्टमास्तरांकडे पुर्ण अज्ञानाचा बुरखा घेऊन राहिलेत.पोस्टमास्तरांनाही अज्ञानात ठेवले.त्या बिच्या-यास काय माहित की एक विद्वान डाँक्टर आपल्या घरी काम करतोय. पुढे थोड्याच दिवसात स्वामीजींनी संन्यास दिक्षा घेतली आणि ते स्वामी शिवानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. सेवा .प्रेम,दान,चित्त शुध्दी ,ध्यान या पंचसूत्रीचा जगभर प्रचार केला. स्वामी शिवानंद हे हृषीकेश मध्ये साधना करत असतांना हिमालयातील साधू-संताना औषध देऊन सेवा करत. दिव्य जीवन संघाची स्थापना करुन त्यांनी ३०० च्या वर पुस्तक लिहिलेत. अशा या दिव्य जीवन जगलेल्या संत सतपुरुषाच्या कार्याला प्रणाम. त्यांनीच माझ्या सारख्याचे निमित्तमात्र माध्यम
म्हणुन(TRIPAL YOGA' By Swami Shivananda ) ‘शिवानंद योगत्रयी’च्या रुपाने एका अर्थाने मराठीतुन भाषांतर करुन घेतले असावे.सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते याचे हे ज्वलंत ऊदाहरण आहे.मराठमोळ्या वाचकांना हे पुस्तक वाचतांना खूप आनंद होतोय हेच माझे सेवाधन आहे.
विषेश गोष्ट म्हणजे पोस्टखात्याने प.पु स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या नावाचे अन छायाचित्र असलेले टिकिट काढले.
प.पु.स्वामी शिवानंदा( हृषीकेश) यांची कुडंली.
जन्म तारीख: ०८ सप्टेंबर १८८७ वेळ: सकाळी ०४:१६:०० LMT.

ज्योतिष्यशास्त्रातील सारासार विचारAstrological Thinking based on actual experience

(पुजनीय प्रो.श्री कृष्णमुर्तीं गुरुजीं )
कुठल्याही शास्त्राला नियमांच्या मर्यादा ह्या ठरलेल्या असतात. याचा सारासार विचार ज्योतिष्य शास्त्रातही दिसुन येतो.
जन्मकुडंली नुसार भविष्य वर्तवतांना काही प्रश्नांची उत्तर देता येत नाही उदा. लाईट केव्हा येतील? कामवाली बाई आज कामाला येईल का? एखादा मित्र आपल्या घरी केव्हा येईल या सारख्या वगैरे प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रोफ़ेसर कृष्णमुर्तींनी होरारी अँस्ट्रालाँजी (Krishnamurti padhdhati advanced steller system) हे पुस्तक अस्खलित ईग्रजी भाषेतुन लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रश्न कुडंली विषयी काही मार्गदर्शन केलेले आहे.आमच्या ज्योतिष्य मंडळातील अभ्यासू आणि नवोदित अभ्यासकांनी तसेच जुन्या जाणकारांनी एक शंका उपस्थित केली होती त्यात प्रश्नकर्त्याने जर १ ते २४९ अंका नंतर मोठे अंक सांगितले असतील उदा.३११ वगैरे वगैरे...असे प्रश्नांची उकल कशी करावी याविषयी काही दैवी मार्गदर्शन(Divine guidance) कृष्णमुर्तींनी काही केले आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर एक सांगावेसे वाटते की अनुभव सिध्द कृष्णमुर्तींनी अगदी शांतपणे आणि विद्ववत्तापूर्ण असे संशोधन केलेले आहे.भारतातच नव्हे तर जगात श्रीलंका ,मलेशीया अन्य परकिय देशांमध्ये त्यांनी भाषण देउन आपली अख्खी हयात ही ज्योतिषशास्त्रासाठी तसेच संशोधनात घालवली आहे याबद्दल त्यांना आदरपुर्वक नमस्कार करतो म्हणून जगातील अनेक कृष्णमुर्तीं अनुयायी गुरुजींना अर्थात गुरुला केवळ आपण एक त्यांच्या पुढे शिष्य आहोत या नात्याने आदर पुर्वक वंदन करत आलेले आहेत याबद्दल वादच नाही.
त्यामुळे आमच्या मंडळातील या ज्ञानपिपासु ,अभ्यासू प्रश्न कर्त्याची तहान, मी नाही तर फ़क्त कृष्णमुर्तीं गुरुजींच भागवू शकतात हे यावरुन दिसून येईल.ते वाचून आपली मति खरचं गुंग होते त्याचे पारायण करावे असे ते अमृताचे अनुभवसिध्द असे ते बोल आहेत. ते खास
त्याच्यांच भाषेत (प्रोफ़ेसर कृष्णमुर्तींनी होरारी अँस्ट्रालाँजी ,पान क्र.१०५ व १०६ , fourth edition 1986 sixth reader ) ते काय म्हणत आहेत ते पहा....
दिसत नसल्यास यावर टिचकी मारावी.

दिसत नसल्यास यावर टिचकी मारावी.

Sunday, December 21, 2008
वैवाहिक जीवनात सुख मिळणार का?





जीवन हे गाणे आहे, कधी ते संसाराच्या दोन रथांच्या चाकां प्रमाणे असते आणि त्या चाकांना नवरा आणि बायको याची उपमा दिली जाते.एक चाक निखळले तरी तो संसार रथ तिथेच गडबडतो.माझ्या कडे एक जातक अर्थात एका तरुणाचा फ़ोन आला त्याने कुठलाही प्रश्न न विचारता सरळ माझ्या हातात कुडंली दिली.ती कुडंली मी पाहिली आणि त्वरीत म्ह्टले आपल्याला सांसारिक समस्या दिसते....!आपले आणि आपल्या पत्नीचे एकमेकांशी काही तरी मतभेद असावेत ...?
असे बोलल्यावर तो पटापट बोलू लागला...! होय माझी पत्नी ही साधारणतः ३-४ महिन्यापासून माहेरी गेली आहे ...
मग मला ह्या गोष्टी अगोदर कशा समजल्या होत्या? हे तुम्हाला जाणुन घ्याव्याशा वाटतील...कुंडलीत वैवाहिक जीवना बद्दल सप्तमाचा सब-लार्ड सर्व सांगतो.ह्या कुडंलीत सप्तमाचा सब-लार्ड मंगळ होता व तो षष्टेश असुन तो व्ययात होता त्यामुळे सहा व बारावे स्थान ही वैवाहिक जीवना मध्ये तीव्र मतभेद दाखवतात.त्याच प्रमाणे मंगळ हा रविच्या नक्षत्रात आहे व रवि हा
तीन आणि पहिल्या स्थानाचा कार्येश आहे तसेच तो शनिच्या उप-नक्षत्रात आहे व शनि हा ८,९ व २ स्थानांचा कार्येश आहे आणि अष्टमस्थान हे मतभेद दाखवते आणि शनि हा शेवटी बुधाच्या नक्षत्रात असल्यामुळे व राहू हा बुधाच्या राशीत असल्याने चतुर्थाची प्रामुख्याने फ़ळे मिळतील.तसेच नवमांश कुडंली प्रमाणे सप्तमेश हा शुक्र आहे व तो व्ययात आहे व तो चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र व्ययात आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद दिसुन येतात.
प्रामुख्याने वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र असल्यामुळे आणि तो ६ आणि १२या वैवाहिक जीवनाचा विसंवादी स्थानाचा कार्येश असल्यामुळे याला वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही असे दिसते.शेवटी घटस्फ़ोटा पर्यंत प्रकरण जाऊ शकते हे यावरुन स्पष्ट होते.सप्तमाचा सब लार्ड हा मंगळ हा तॄतीयाचा कार्येश असल्यामुळे कोर्टामार्फ़त हे प्रकरण मिटेल.याला गुरुची महादशा व शुक्राची अंतर दशा चालू आहे आणि गुरु हा मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा ६ व १२ या विरोधी भावाचा कार्येश आहे.त्यामुळे महादशा ही वैवाहिक जीवनाला अनुकुल दिसत नाही. त्याला मी १ ते २४९ मधील कृष्णमुर्ती पध्दती प्रमाणे दैवी नंबर विचारला तर त्याने २५६ हा आकडा पुस्तकाच्या पानावरुन सांगितला! त्यावरुन आम्हास असे समजले की याच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे म्हणाजे वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही असे दिसते.कृष्णमुर्तीचे अनुभवाचे बोल हेच सांगतात.पण काही जण १ ते २४९ ह्या कृष्णमुर्ती पध्दतीच्या नंबराच्या बाहेरील नंबरावर (वर उदाहरणात आमच्या येथे जातकाने असाच बाहेरील नंबर सागितला २५६ होता )नवमांश कुडंलिचा वापर करतात(जे आम्हाला व गुरुजींना म्हणजे कृष्णमुर्तीनां अभिप्रेतच नाही)अर्थाअर्थी काहीतरी चुकीचा संबध जोडुन काही तरी भविष्य कथन करतात.शेवटी जातक जो १ते २४९ मधील नंबर सागंतो त्या नंबराला महत्व द्यावे असे आमचे प्रामाणिक म्हणणे आहे. बाकी या बाहेरील नंबरांना कुठलाही उदा .२५० ते अनंता पर्यंत नंबर कृष्णमुर्तीनां अभिप्रेतच नाही हे लक्षात ठेवा.
Sunday, December 14, 2008
३१ डिसेंबरच्या २००८ च्या (रात्री २३:५९:५९)वेळेबाबत समायोजन...

३१ डिसेंबरच्या २००८ च्या (रात्री २३:५९:५९)वेळेबाबत समायोजन...
पृथ्वीवर सुर्य आणि चंद्र याच्या गुरुत्वाकर्षणाचा परीणाम झाल्यामुळे पृथ्वीची स्वत: च्या आसाभोवती फ़िरण्याची गति मध्ये प्रति दिन .००२ सेकंदांचा फ़रक पडत जातो म्हणजेच पाचशे दिवसांनी १ सेकंदाचा फ़रक पडतो. त्याच्या मुळे वर्षाच्या जून महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात एक सेकंदची वेळ अँडजेस्ट करावी लागते.
Friday, December 12, 2008
आजचा चंद्र आकाशात जाऊन पहा....!





Tuesday, December 9, 2008
आगामी ग्रहणे.


( फ़ोटो सौजन्य : नासा )
आगामी ग्रहणे
२६जानेवारी २००९ सुर्य ग्रहण आणि ९ फ़ेब्रुवारीला छायाकल्प(मांद्य)ग्रहण आहेत.या ग्रहणांचे परिणाम जगावर अतिशय भीषण व गंभीर होतील कारण ही ग्रहणे लागोपाठ १५ दिवसांच्या आत होत असल्याने मोठमोठे भुकंप, हल्ले,युध्द ,रेल्वे,विमान व मोठ मोठे वाहनांचे अपघात होतील.म्हणून प्रत्येक मानवाने या दृष्टिने स्वतः साठी संरंक्षण म्हणून"ॐ त्र्यंबंकम यजामहे सुगंधीम पुष्टि वर्धनम उर्वारुकमिव बंधंनान मृर्त्यारमोक्षीय मामृतात"हा जप सतत म्हणत रहावा.ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज अग्निहोत्र करावा.जागतिक शांततेसाठी आपण रोज हाही मंत्र म्हणावा. "ॐ विश्वंम शांति मस्तु"
१२ वेळेस सकाळी व सायंकाळी म्हणावा ;तेव्हा ज्ञानेश्वर माऊलि प्रमाणे विश्वात्मक देवाजवळ वैश्विक शांतिसाठी प्रार्थना करावी ही विनंती.
Sunday, September 14, 2008
गणपती बाप्पा मोरया...!
आज अनंत चतुर्दशी...
गणपती बाप्पा निघाले आता पुढील प्रवासाला...
उपत्ती...स्थिती ....आणि लय...हे परमेश्वरी कार्याचे चक्र आहे..हे अनंत चतुर्दशी दर्शविते..खरतर आपण गणेशाची प्राण प्रतिष्ठा करतो...पण पुढील ११ व्या दिवशी त्याचे आपण विर्सजन करतो..पण आपण या घटनेतुन हा बोध घ्यायचा आहे की मानवी जीवन हे सुध्दा क्षणभंगुर आहे..आपण या सृष्टीत जन्म घेतो आणि एके दिवशी आपणही पुढच्या प्रवासाला निघतो ..म्हणुन माणसाने आपल्या आयूष्यात सदैव सत्कार्य करत रहावे ...ते सुध्दा परमेश्वरी नाम घेऊन...!
कुडंलीत पहिले स्थान हे उप्पत्ती दाखवते म्हणजे जीवनाचे स्विच आँन होते....तसेच १२ वे स्थान हे जीवनाचा लय दाखवते म्हणजेच जीवनाचे स्विच आँफ़ होते...
गणपती बाप्पा निघाले आता पुढील प्रवासाला...
उपत्ती...स्थिती ....आणि लय...हे परमेश्वरी कार्याचे चक्र आहे..हे अनंत चतुर्दशी दर्शविते..खरतर आपण गणेशाची प्राण प्रतिष्ठा करतो...पण पुढील ११ व्या दिवशी त्याचे आपण विर्सजन करतो..पण आपण या घटनेतुन हा बोध घ्यायचा आहे की मानवी जीवन हे सुध्दा क्षणभंगुर आहे..आपण या सृष्टीत जन्म घेतो आणि एके दिवशी आपणही पुढच्या प्रवासाला निघतो ..म्हणुन माणसाने आपल्या आयूष्यात सदैव सत्कार्य करत रहावे ...ते सुध्दा परमेश्वरी नाम घेऊन...!
कुडंलीत पहिले स्थान हे उप्पत्ती दाखवते म्हणजे जीवनाचे स्विच आँन होते....तसेच १२ वे स्थान हे जीवनाचा लय दाखवते म्हणजेच जीवनाचे स्विच आँफ़ होते...

हायर एज्यूकेशन इन फ़ाँरेन कन्ट्रीज.....! Higher Education In Foreign Countries.....



प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे येतच असते. शिक्षणामुळे माणुस शिक्षित होतो. ४-आणि११ स्थानांमुळे शालेय व काँलेज शिक्षण दाखवले जाते.नवम स्थान हे उच्च शिक्षण दाखवते.नवम स्थानाच्या कार्येशाच्या दशेमध्ये किंवा अंतर दशेमध्ये जातक उच्च शिक्षण घेत असतो.परदेशा मध्ये निवास हा १२ व्या स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी दाखवितो.१२ व्या स्थानाचा उप-नक्षत्र स्वामी हा जर ३किंवा ९ स्थानाचा कार्येश असतो तेव्हाच परदेश गमनाचा योग येतो.स्काँलरशिप साठी ६ व ११ स्थानांच्या कार्येशाचा विचार करावा. नोकरीसाठी ६ आणि १० स्थानाचा विचार करावा. वरील कुडंलित नवव्या स्थानाचा नक्षत्र स्वामी चंद्र असुन उप-नक्षत्र स्वामी शुक्र आहे. चंद्र हा तॄतियेश असुन स्वतःच्या नक्षत्रा मध्ये आणि उप-नक्षत्रा मध्ये आहे.तो मनाचा कल दाखवतो.नवमाचा उप-नक्षत्र स्वामी शुक्र असुन तो ११ व्या स्थानात स्थित असुन स्वतःच्या नक्षत्रा मध्ये आहे त्यामुळे तो ईच्छा पुर्ति व प्रयत्नां मध्ये यश दाखवितो त्याप्रमाणे जातकाला उच्च शिक्षण मिळाले आहे.शनि आणि मंगळ हे नवम स्थानाचे कार्येश आहेत त्यामुळे परदेश गमन व उच्च शिक्षण होते तसेच त्यांच्या अर्तंदशेत झालेले आहे.गुरु १२ व्या स्थानामध्ये असुन त्याच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो १२ व्या स्थानाचा स्ट्राँग कार्येश झाला आहे त्यामुळे गुरु परेशात वास्तव्य दाखवितो त्यामुळे गुरु महादशा, शनि अंतरदशा व राहू विदशेत जातक परदेशात उच्च शिक्षणा साठी गेलेला आहे. हा कालावधी २४-०५-१९६९ साली होता.ज्योतिष अभ्यासू,व्यासंगी ,सूज्ञ वाचकांनी वरील अनुभव घ्यावा.
Wednesday, September 3, 2008
गणपती बाप्पा मोरया ...!






S
आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..........!
धन्यवाद वाचक वर्ग हो ...! अबब आमच्या वाचक वर्गाची संख्या अगदी अल्पावधीत (५८९५)पाच हजार आठशे पंच्यांण्णव झाली आणि ती वाढतच आहे...
प्रत्येकाने आपल्या घरात श्रीगणेश अर्थात गणपतीची मुर्ती आणुन प्रतिष्ठापना केली असेलच.श्रीगणेश ही बुध्दिची देवता आहे म्हणुन आपण गणेश उत्सव साजरा करातांना या दहा दिवसात रोज सकाळ व सायंकाळ आरती नंतर गणपती अर्थवशीर्ष म्हणावे.अध्यात्माने हे सिध्द केले की अर्थवशीर्षाच्या स्पंदनाने ब्लड प्रेशर नाँर्मल स्थितीला आणता येते.
यज्ञ,विवाह,इत्यादी धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटणे सहाजिकच होते.गणेशाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्या ऎवजी आपल्या मात्या-पित्याला सात प्रदक्षिणा घातल्या व ब्रम्हदेवाने म्हटले की माता ही पृथ्वी समान आहे म्हणुन गणेशाला हा मान बुध्दिच्या बळावर मिळाला आहे.
गणपतीची विशेष कृपा लवकर प्राप्त करण्यासाठी श्वेत अर्काला पुष्य-नक्षत्रयुक्त रविवारच्या दिवशी आणुन पंचामृताने अभिषेक करा. गणपतीची लाकडाची मूर्ती बनवून तिला घराच्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवल्यास घर मंगलमय लहरींनी पवित्र होते.
गणेश चतुर्थी - दिवसभर मुहूर्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (बुधवारी, ता. ३ सप्टेंबर) गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी सूर्योदयापासून सायंकाळी सातपर्यंत मुहूर्त आहेत. सूर्यास्तानंतर गणपतीची स्थापना शक्यतो करु नये.
शनिवारी (ता. ६) गौरी आवाहन (महालक्ष्मी) मुहूर्त सकाळी ७.२० ते ९.०० व दुपारी १ ते ३ या वेळेत करावे.
लक्षात ठेवा:
गणपती उत्सवात आपण रात्री १० वाजेनंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावे कारण छोटे मुले, जेष्ठनागारिक ,दवाखान्यातले रुग्ण यांना केवळ हिंदी कर्कश गाण्यांपासुन त्रास होण्याचा संभव आहे.
शक्यतो LED ची लायटींग करावी वीजेची बचत होईल..!
आपण गणेश आराधनेत त्याच्या दहा दिवसात त्याच्या बुध्दिरुपी स्वरुपात एकरुप व्हायचे आहे तेव्हा कृत्रिम ,अनावश्यक खर्च टाळा.
वर्गणीतले उरलेले पैसे एखाद्या गरीब किंवा आजा-याला दान करा. त्याचे आशीर्वाद घ्या ही परमेश्वराची भक्ति आहे हे लक्षात घ्या.
या सणाचा आनंद मनापासुन लुटा...अन म्हणा ...एक लाडू फ़ुटला...गणपती बाप्पा घरी विराजला..... !
Subscribe to:
Posts (Atom)