+.jpeg)
(वरील कुंडली वाचता येत नसल्यास तिच्या वर क्लिक करावे.)
मंगळ प्रधान व्यक्तिची कुंडली (माझ्या ब्लाँगवर मला वाचकांनी विचारले की मंगळ प्रधान व्यक्तिविषयी आपण माहिती सांगावी त्यासाठी आपण खालील उदा.पहावे.)
जन्म कुंडलीमध्ये 1,4,7,8,12 स्थानी मंगळ असल्यास त्या कुंडलीला मंगळाची कुंडली म्हणतात.
मंगळाच्या दोषाला कुज दोष किंवा भौम दोष म्हणतात.एखाद्याच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास जोडीदाराच्या कुडंलीत सुध्दा मंगळ दोष असायला पाहिजे असा एक समज आहे अन्यथा वैवाहिक सौख्य बिघडते असा एक समज आहे त्यात फ़ारसे तथ्य नाही.तसेच 1,5,7,10 या स्थानी शनि असल्यास मंगळाचा दोष नाहीसा होतो असा गैरसमज रुढ आहे.
माझ्या मते मंगळ 1,4,7,8,12 या स्थानात स्वराशीत किंवा उच्च राशीत असल्यास मंगळाचा दोष अशुभ फ़ळे देत नाही.अन्य राशीत पाप ग्रहांनी युक्त किंवा पाप ग्रहांनी दृष्ट मंगळ असल्यास वाईट फ़ळे मिळतीलच.
तसेच मंगळ 1,4,12 या स्थानात असेल व सप्तमात देखील एखादा पाप ग्रह असेल तरच वैवाहिक सौख्य बिघडेल.
लग्न स्थानातील मंगळ व्यक्तिला तापट ,अविचारी बनवतो.अशा व्यक्तिला जोडीदार शांत व नमते घेणारा मिळाला तर लग्न स्थानातील मंगळ फ़ारसा ताप दायक होणार नाही त्यामुळे जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ नसला तरी चालेल.
चतुर्थ स्थानात मंगळ असल्यास घरात भांडण होतात. सासु-सुन ,नंणद भाउजयी यांच्यात भांडण होतात.
एकत्र कुंटुंब पध्दतीत यांचे कुणाशीही पटत नाही.दोघं पती-पत्नीने वेगळे घर थाटल्यास मंगळ दोष त्रासदायक ठरणार नाही.
व्यय स्थानातील मंगळ कामवासना प्रबळ करतो आणि खर्चीक वृत्ती दर्शवितो.मात्र व्ययात मंगळ असणारी स्त्री पतीला सुख देणार नाही तसेच तिच्या लहरी प्रमाणे ती पतीला सुख देईल.
व्यय स्थानातील शुक्र,मंगळ असलेले स्त्री-पुरुष नीतीने वागत नाही.
ज्या स्त्रींयांच्या कुंडलींत मंगळ शुक्राच्या किंवा बुधाच्या राशीत असेल आणि त्यावर बुध ,शुक्र ,शनि,राहू, नेपच्यूनचा युति योग किंवा दॄष्टीयोग असल्यास अशा स्त्रीया वाममार्गाला जाऊ शकतात.
1 comment:
plz. give more imformation about MANGAL.
Post a Comment