Wednesday, January 14, 2009

अर्ध्यावरती डाव मोडला....?(Break in marriage proposal)

ग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन ....असे म्हणतात की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात..परंतु आजच्या कलियुगात मानवी स्वभाव पारखणे हे अशक्य आहे. मन हे जसे उत्तम गुलाम आहे तितकेच भयंकर मालक आहे हे लक्षात घ्यावे. लग्नामुळे दोन जीव एकत्र येतात तसेच मानवी संबधांचे नाती-गोती ही त्याबरोबर वृध्दिंगत होतात.दोन व्याही..मुलाची आई..भावी वधूची सासू होते तर मुलीचे वडील हे मुलाचे सासरे होतात..असे अजून आणिक नाते याबरोबर बहरतात.. त्यामुळे लग्न सोहळा एक सामाजिक संस्कार म्हणुनच ओळखला जातो. राष्ट्र कल्याणाबरोबर एक राष्ट्राची प्रगती आणि कल्याण हे तेथील नागरिकांच्या रुढी -पंरपरा यांच्यांतील परस्पर नाते संबधातून दृढ होऊन सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमाला बळकटी येते एका अर्थी लग्नामुळे अनेक सामाजिक संदर्भ आणि साखळ्या एकत्र येतात हे लक्षात घ्या पण मानवी मन हे जर संकुचित प्रवृत्तींच्या चौकटीत अडकल्यास व्यक्तिगत दुराव्यांनी सांधलेली मन ही पुन्हा दुभंगली जाऊन परस्पर भांडण होऊन माणस दुरावतात एका अर्थी राष्ट्राचे किती नुकसान होते ? कोर्ट कचे-या ,वेळ,श्रम,पैसा ह्या गोष्टीं आल्याच...ना...!
थोडक्यात पंरपरेतुन संस्कृति निर्माण होऊन केवळ दोन मन एकत्र येणे व लग्न म्हणजे मुलबाळ एवढेच विश्व मर्यादित न राहता आपल्या ऋषी-मुनींनी या मागे किती गहन विचार केलेला आहे .
कुणाच्याही भावनांचा आदर करणे ही आपली संस्कृति आहे तसेच त्या भावना टिकविणे ही प्रकृति आहे.मानवी मुल्ये ही समाज व्यवस्थेच्या कल्याणासाठीच निर्माण झाली आहेत ते जर रुजलीच नाहीत तर मानवी समाजाचा चेहरा विदृप होईल. समाज मुल्ये मातीमोल होतील.हे सांगण्या मागचा हेतू हाच की मनुष्य जगतो ते केवळ हवा, अन्न, पाणी आणि पैसा इतक्याच गोंष्टींवर नव्हे तर त्याला संस्कृतिने घालुन दिलेल्या सामाजिक जीवनाच्या विविध पैलूंवर त्याचे बौध्दिक पुष्टीकरण होणे तेवढे गरजेचे ठरेल नाही तर एखादा व्यसनाधीन माणुस आणि संस्कारक्षम व्यक्ति जर एकत्र आले तर त्याच्यांतल्या नैसर्गिक गुणांचे मुल्यमापन अगदी कुणीही सहज करु लागते. प्राणी पण या पृथ्वीवर सहजीवनाने जगतात पण मानव आणि प्राणी यातला फ़रक हा केवळ त्याच्यांतल्या बौध्दिकतेच्या कसोटीवरला आहे. तरी सुध्दा आपण पेपरात वाचतो की एखाद्या माणसाने क्रॄर व हिस्त्रं पशूंपणे एखाद्याचा खून केला असे का होते? याचे उत्तर मानवी स्वभावातले कंगोंरे कुणीच ओळखू शकत नाही म्हणुनच प्राचीन सांकृतिक म्हण आपल्या येथे बहुश्रुत आहे दुर्जंनम प्रथमम वंदे..सज्जनम तदनंतरम...!
खरा विषय येथे हाच की आज बरेच जण कुडंल्या बघतात ...तर काही जण कुडंल्या का बघ्याव्यात? ...चक्क असे म्हणतात ..कुडंल्या जुळवणे हा शुध्द अडाणीपणा आहे असे ही काही जण म्हणतात. विरोध करणारे आज बरेच आहेत ..शिवाय राहू-केतू या छाया ग्रहांना कुडंलीतुन हद्दपार करा असे ही काही जण म्हणतात..या मंडळीनां राहू-केतूच्या तीव्र शक्तीच्या चुंबकिय क्षेत्रातून फ़िरवून आणावे हे काल्पनिक बिंदू आहेत पण त्यांचे अदृश्य चुंबकिय क्षेत्र तीव्र आहेत .थोडक्यात त्याचे दृश्य परीणाम आपल्या ऋषीमूनीनीं अनुभवलेले आहेत.
आमच्या कडे एक जातक आला होता त्याने मला प्रश्न केला की आमच्या घरात लग्न ठरलेले आहे पण...???हा पण ऎकल्यावर मला अधिक जाणून घ्यावेसे वाटले, की पण मध्ये बरेच काही प्रश्न आहेत..असो..!तो जातक मला म्हणाला की आमच्या येथे माझ्या स्नेह्याचे नारळपान(हा एक लग्न ठरविण्याचा विधी असतो ) होऊन काही दिवस झाले आहेत पण ते लग्न यशस्वीरित्या पार पडेल का ? याविषयी आम्हाला शांशकता आहे ..शिवाय त्या भावी वराच्या मनात आमच्या (म्हणजे जातकाच्या) बद्दल काही शंका आहेत आणि त्या कुणी तरी मनात भरवल्या प्रमाणे आहेत त्यामुळे भावी वर(मुलगा) हा लग्नास तयार होत नव्हता तसेच तो अनेक खुसपट काढून त्रास देत होता लग्न होण्याआधीच जर मानसिक गैर समजुती निर्माण होत असतील तर भविष्यात वधूचे भावी वैवाहिक जीवन हे सूखी तरी होईल का?
थोडक्यात आम्ही लग्नाचे पुढील सोपस्कार आटोपावे का? असा प्रश्न त्या जातकाने फ़ार गोंधळ पुर्व परीस्थितीतुन माझ्या पुढे मांडला.. ती तारीख होती १२/०१/२००९ प्रश्नवेळ :११:४१:१५(सकाळी) व त्या भावी वधूने सांगितलेला के.पी.नंबर होता ११५त्याप्रमाणे मी प्रश्न कुंडली माडंली .




प्रश्न कुंडलीत चंद्र हा जातकाने प्रश्न मनापासुन विचारला आहे की नाही ते दर्शवितो येथे चंद्र हा लाभेश आहे त्यामुळे जातकाने प्रश्न मनापासुन व वैवाहिक जीवना विषयीच विचारला आहे असे दर्शवितो .
आता पुजनीय गुरुवर्य प्रो.कृष्णमुर्तीजींच्या सिध्दांता नुसार जर सप्तमाचा उप -नक्षत्र स्वामी हा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात किंवा उप -नक्षत्रात असेल तर नियोजित विवाह हा होत नाही.या ठीकाणी सप्तमाचा उप -नक्षत्र स्वामी हा राहू असून तो शनिच्या उपनक्षत्रात आहे आणि सध्या शनि महाराज वक्री आहेत!तेव्हा मी स्पष्ट पणे सांगितले की हा विवाह होणार नाही त्याच प्रमाणे लाभाचा उप -नक्षत्र स्वामी हा राहू आहे म्हणुन आमच्या म्हणण्याला बळाकटीच आली. तृतीयाचा उप -नक्षत्र स्वामी राहू हा सप्तमाशी कनेक्टेड आहे त्यामुळे आम्ही सांगितलेले भविष्य खरे आहे याची खात्री पटली. सप्तमाचा उप -नक्षत्र स्वामी हा जर नेपच्य़ूनशी संबधीत असेल तर अशा लग्नात प्रश्नकर्त्या जातकाची फ़सवणूक होते याची सुध्दा आमच्या अभ्यासू व्यासंगी वाचकांनी अनुभुती घ्यावी.सप्तमाचा उप -नक्षत्र स्वामी हा जर तृतीयाचा कार्येश असेल तर गुप्तशत्रु लग्नात बाधा आणतात(They stop the marriage) या कुंडलीत सप्तमाचा उप -नक्षत्र स्वामी हा राहू असुन तो चंद्राच्या नक्षत्रात आहे व तृतीयेश मंगळाच्या दॄष्टीत आहे यामुळे वरील नियमांची पुर्तता झालेली आहे.
थोडक्यात पुजनीय गुरुवर्य प्रो.कृष्णमुर्तीजींनीं ज्योतिष्यांच्या हातात केवढा मोठा निर्णयाचा हा विनामुल्य सुकाणूच दिला आहे.आज जर पुजनीय गुरुवर्य प्रो.कृष्णमुर्तीजींनीं ज्योतिषांना हे ज्ञान जर दिले नसते तर बरचशे ज्योतिषी ह्या ज्ञानाला मुकले असते परंतु गुरुजींना हे ज्ञान कडी-कुलुपात ठेवायचे नव्हते..या मागे त्यांनी स्वतःचा फ़ायदा न पाहता अखिल मानवीसमाज कल्याणाचे केवळ हितच जोपासले.