

कुडंली मोठी करण्यासाठी त्यावर टीचकी मारा:
असे म्हणतात लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात.इंग्रजीत एक म्हण यावरुन पडली आहे.Marriages are Made in Heaven And Celebrated on Earth....!एका जातकाची ही कुडंली आहे, लग्न खुप छान झाले पण काही दिवसात असे लक्षात आले की आपली चक्क फ़सवणूक झालेली आहे. ह्या जातकाची कुडंली जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की सदर जातकाच्या कुडंलीत सप्तमाचा सब-लाँर्ड बुध असुन तो केतूच्या उप-नक्षत्रात आहे व केतू नेपच्यूनच्या युतीत असुन राहूच्या नक्षत्रात आहे.राहूची दृष्टि नेपच्यूनवर आहे.
नेपच्यून हा फ़सवणूक करणारा ग्रह आहे. त्यामुळे या जातकाची फ़सवणूक झालेली आहे असे दिसून आले तसेच सप्तमाचा सब-लाँर्ड बुध असल्याने कृष्णमुर्तिंच्या नियमा नुसार पहिल्या पत्नीला घटस्फ़ॊट देऊन दुसरा विवाह झालेला आहे.या व्यक्तिने असे सांगितले की त्याच्या पहिल्या पत्नीला कोड असुन लग्नाच्या वेळेला चक्क कोडाच्या डागांवर रंग दिलेला होता. खर तर कोड हा आजार नाही पण केवळ या गोष्टींचे निमित्त झाले अन भांडणामुळे पती-पत्नीतील संबध दुरावले अन त्याचे पर्यवसान घटस्फ़ॊटात झाले.
No comments:
Post a Comment