Saturday, August 30, 2008

माझे सदगुरु प.पुज्य मालतीदेवी यांची कुंडली.





नोव्हेंबर १९८९ चा काळ असेल त्यावेळेस आमच्या शहरात एका साधन मार्गावर प्रवास केलेल्या दिव्य महात्म्याचे आगमन झाले आहे तरी आपण दर्शनाला त्वरीत यावे ही बातमी आमच्या ओळखीच्या व्यक्तिने आम्हास दिली तत्काळ आम्ही दोघं प.पु.माऊलींच्या दर्शनाला गेलो होतो. सदगुरु मुर्ति पाहिल्यावर असे वाटले हेच माझे सदगुरु आहेत.काही दिवसांनी त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला.खरतर नुसतेच पुस्तक वाचून गुरु समजत नाही. गुरुचे अगाध ज्ञान जाणायला शेवटी गुरु कृपाच लागते.गुरु हा मायेचा कृपा सागर आहे.सदगुरुं जवळ सर्व ज्ञान आहे पण ते ज्ञान शिष्यात उतरायला शिष्याला गुरु प्रमाणे साधना करावी लागते. अहंभाव ,मी पणा सोडुन चरणी लीन व्हावे लागते......!
त्याकाळी गुरु बद्दल श्रध्दा भाव होता आजही आहे आणि जन्मोजन्मी असे सदगुरु लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थंना आहे. साधन मार्गावर अतिशय उग्र तपश्चर्या करुन एक संसारी गृहिणीने घरदार न सोडता सर्व जबाबदारी लिलयापार पाडुन ...कर्म करुन उच्च टोकाला जाणे ही फ़ार मोठी गोष्ट आहे. प.पुज्य माऊली ह्या उच्चत्वाला जाऊनही त्यांनी स्वतः साठी कुठलीही सिद्धिचा वापर केला नाही आज वयाला ८५ वर्षी झालेली आहेत त्यांना दिर्घायूष्य लाभो ही प्रभु चरणी प्रार्थना .प.पु आई आजही तपोवनात विशिष्ट दिवशी त्या अनुग्रह देतात अन त्यांच्यात तेव्हढाच ऊत्साह ,चैतन्य आहे. प.पु .माऊलींना मी सांगितले की माझा १९८७ साला पासुन ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. आपण आपल्या कृपेचा आशिर्वाद द्यावा.त्यांनी सांगितले की ज्योतिषशास्त्र हा शापित व्यवसाय आहे तेव्हा मी त्यांना सांगितले की मी भाकीत predictionsकरतांना लोकांकरवी पैसे घेत नाही पण काँम्प्यूटर कुडंली काढतांना साँफ़्टवेअरचा खर्च व स्टेशनरी खर्च इत्यादी साठी मात्र अल्प चार्ज घेतो. ही सुध्दा एक सेवा आहे.प.पुज्य माऊलींचे आशीर्वाद मिळाले पण सदगुरु ही परिक्षा पहात असतो त्यांनी मला एकदा अण्णा साहेब (त्यांच्या मिस्टरांची) कुडंली पहायला सांगितली होती खर तर प.पु. माऊली ह्या फ़ार दिव्यत्वाला पोहचलेल्या आहेत. परंतु गुरु आज्ञा झाल्यावर नाही कसं म्हणायचे म्हणून मी कुडंली बघितली. त्या म्हणाल्या मी सिध्दींचा वापर करत नाही...
याच अनुषंगाने मी प.पु. माऊलींची कुडंली पाहीली तेव्हा अभ्यासू ज्योतिषांसाठी देत आहे.
प.पु माऊलींची जन्मतारीख २०-०९-१९२३ आहे कन्या लग्न असुन लग्नेश बुध आहे तसेच या बुधाचा व कन्या लग्नाचा मंगळाचा कुठलाही संबध येत नसल्याने प.पु.सदगुरु माऊली ह्या अहंकारी नाहीत त्याच प्रमाणे चतुर्थ स्थानावरुन कुठलाही जातक प्रामाणिक आहे की नाही हे समजते.प.पु.माऊलींच्या चतुर्थ स्थाना मध्ये शुभ ग्रह चंद्र येतो तसेच चतुर्थेश गुरु हा शुभ ग्रह येतो तसेच चंद्र हा बुध ह्या शुभ ग्रहाच्या उप-नक्षत्रात येतो त्यामुळे सदगुरु माऊली ह्या अत्यंत प्रामाणिक आहेत,नितीमान आहेत.सदगुरुची कृपा किंवा सदगुरु लाभ हा केव्हा होतो ? ज्यावेळेला लाभाचा उप-नक्षत्र स्वामी हा ५-९ किंवा ११ या स्थानाचा स्ट्राँग कार्येश असतो. प.पु.माऊलींच्या कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामी शनि असुन तो मंगळाच्या नक्षत्रात आहे व त्याची दृष्टि पंचम स्थानातील केतू वर आहे त्या मुळे प.पु.माऊलीनां सदगुरु कॄपा लाभली व स्वामी शिवानंद ॠषीकेश यांची कृपा झाली.प.पु माऊलींच्या तपोवना विषयी व कार्याविषयी जाणुन घ्यायचे असल्यास यावर क्लिक करा.
तसेच ज्या महादशेचा संबध पंचमस्थानाशी येतो त्यादशेमध्ये सदगुरु कडुन औपचारीक पणे गुरुदिक्षा दिली जाते.प.पु.आईंना गुरु महादशा १९६० पासुन सुरु झालेली होती तसेच या गुरुची दृष्टि केतु वर असल्या मुळे व केतू पंचमस्थानात असल्यामुळे प.पु.आईंना १९६२ साली स्वामी शिवानंद ॠषीकेश याच्यांकडुन गुरु दिक्षा प्राप्त झाली. ज्यावेळेला कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामीचा संबध ११ व्या स्थानाशी असतो त्यावेळेला अशा महात्म्यांना ऋध्दि-सिध्दि प्राप्त होते. प.पु.आईंच्या कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामी शनि असुन तो मंगळाच्या नक्षत्रात
असुन मंगळ हा लाभ स्थानात आहे त्यामुळे प.पु.माऊली ह्या ऋध्दि-सिध्दि प्राप्त संत-महात्मे आहेत.प.पु.माऊलींची कुडंली ही उच्च पदाला पोहोचणा-या संत-महात्म्याची कुडंली आहे तसेच ही अत्यंत अशी दुर्मिळ कुडंली आहे.प.पु माऊलीनां जगत गुरु शंकराचार्य ही बहुमानाची योग मार्गातली अति -उच्च पदवी प्राप्त झाली आहे.एका योगमार्गावरच्या स्त्री संत महात्म्याला असा बहुमान भारतात पहिल्यांदाच प्राप्त झाला आहे.

No comments: