Sunday, August 31, 2008

ज्योतिषी खरा आहे की खोटा आहे? हे कसे ओळखावे??How should be a real astrologer






ज्योतिषास्त्राचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत पण आजकाल या शास्त्राचा उपयोग केवळ पोटभरण्या साठीही केला जातो. रस्त्यावर पोपट घेऊन बसलेल्यां पासुन तर थेट एअर-कडींशन मध्ये बसुन या शास्त्राची थट्टा करणारे अनेक असतीलही शिवाय अशी मंडळी देव-देवता यंत्र-तंत्र-मंत्रांच्या छब्या भितींवर टांगून दुकान माडुंन बसलेले असतात. ज्योतिषास्त्राचा अभ्यास असल्याचा खोटा आव आणुन ही मंडळी इतरांना फ़सवत असतात.ज्योतिषी हा प्रामाणिक असावा त्यासाठी चतुर्थेश किंवा चर्तुर्थ स्थानातील ग्रह हा शुभ ग्रह असावा लागतो तसेच त्याचा नक्षत्र व ऊप-नक्षत्र स्वामी हा शुभ ग्रह असावा लागतो. चर्तुर्थ स्थानातील ग्रहाचा ऊप-नक्षत्र स्वामी हा शनि ,राहू, व केतू पैकी आला तर तो माणूस लबाड असतो अनेकांना तो फ़सवतो थोडक्यात तो प्रामाणिक नसतो.अभ्यासू ,प्रसिध्द, निष्णात ज्योतिषी श्री.हसबे गुरुजींनी या बाबतीत आम्हा ज्योतिषांना अनुभवाचे बोल सांगितले आहे. त्यांनी सांगितले , की असे योग असणारे अधिकारी सुध्दा अप्रामाणिक असतात.तसेच लग्न किंवा लग्नेशाचा संबध जर मंगळाशी आला तर तो माणूस फ़ार अहंकारी असतो.हुशार ज्योतिषांनी असे अनुभव आम्हाला सांगावेत. वरील नियम हे कृष्णमुर्ति पध्दतीच्या प्रश्न कुडंली असो किंवा लग्न कुडंली असो या दोघांना सारखेच लागू पडतात.मंगळ हा जर शनिच्या सब मध्ये असल्यास तो मनुष्य निगर्वी व साधा असतो अशा माणसाच्या मनात वाईट विचार येत नाहीत व दुर्गुण नसतात.तसेच चंद्र हा शनि च्या सब मध्ये असल्यास त्या व्यक्तिची एकाग्रता उत्कॄष्ट असते त्यामुळे कुठल्याही शास्त्रात तो पारंगत होऊ शकतो.
प्रोफ़ेसर.कृष्णमुर्तिंनी हे दैवी ज्ञान सर्वांसाठी खुले करुन ज्योतिषशास्त्र पारदर्शी करुन टाकले आहे.
प्रोफ़ेसर.कृष्णमुर्तिं म्हणतात "Analytical study correct intuition and good judgment is needed for successful astrologer."
..................................
हा छंद वेड लावी जीवा....!
आमच्या कडे सुरवातीला अनेक जण भविष्य बघायला यायचे सुरवातीचे ७ वर्ष आम्ही लोकांना फ़्री कन्सटेंशन दिले परंतु वाढती गर्दी पाहुन ( हाताने कँल्क्यूलेशन केलेल्या आजवर मी अभ्यास पुर्ण संशोधना साठी ५ हजाराच्या आसपास कुडंल्याचा अभ्यास केलेला आहे आणि तसेच श्री.बी.व्ही.रामन तसेच कृष्णमुर्ति रीडर्स तसेच अँस्ट्राँलाँजिकल मँग्झिन्स व इतर अस्खलित इंग्रजींतल्या (अँस्ट्राँलाँजिकल) पुस्तकांचा अभ्यास माझा सतत चालु असतो)अनेकांच्या कुडंल्या तयार करतांना येणा-या व्यक्तिला घाई असल्याने वेळेत पुर्ण होत नसायच्या म्हणुन आम्ही साँफ़्टवेअर विकत घेतले. महागड्या साँफ़्टवेअर आणि स्टेशनरीचा खर्च अल्प चार्ज म्हणुन स्विकारतो पण ते पैसे सुध्दा सदगुरुंच्या तपोवनासाठी अन्नदान किवां स्थिरनिधी,बांधकाम,गरीबांना अन्नदान,वस्त्रदान ईत्यादी कार्यात हे पैसे सत्कर्मी लागावेत म्हणुन मी हे सत्पात्री दान आतापर्यंत देत आलो आहे.

Saturday, August 30, 2008

माझे सदगुरु प.पुज्य मालतीदेवी यांची कुंडली.





नोव्हेंबर १९८९ चा काळ असेल त्यावेळेस आमच्या शहरात एका साधन मार्गावर प्रवास केलेल्या दिव्य महात्म्याचे आगमन झाले आहे तरी आपण दर्शनाला त्वरीत यावे ही बातमी आमच्या ओळखीच्या व्यक्तिने आम्हास दिली तत्काळ आम्ही दोघं प.पु.माऊलींच्या दर्शनाला गेलो होतो. सदगुरु मुर्ति पाहिल्यावर असे वाटले हेच माझे सदगुरु आहेत.काही दिवसांनी त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला.खरतर नुसतेच पुस्तक वाचून गुरु समजत नाही. गुरुचे अगाध ज्ञान जाणायला शेवटी गुरु कृपाच लागते.गुरु हा मायेचा कृपा सागर आहे.सदगुरुं जवळ सर्व ज्ञान आहे पण ते ज्ञान शिष्यात उतरायला शिष्याला गुरु प्रमाणे साधना करावी लागते. अहंभाव ,मी पणा सोडुन चरणी लीन व्हावे लागते......!
त्याकाळी गुरु बद्दल श्रध्दा भाव होता आजही आहे आणि जन्मोजन्मी असे सदगुरु लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थंना आहे. साधन मार्गावर अतिशय उग्र तपश्चर्या करुन एक संसारी गृहिणीने घरदार न सोडता सर्व जबाबदारी लिलयापार पाडुन ...कर्म करुन उच्च टोकाला जाणे ही फ़ार मोठी गोष्ट आहे. प.पुज्य माऊली ह्या उच्चत्वाला जाऊनही त्यांनी स्वतः साठी कुठलीही सिद्धिचा वापर केला नाही आज वयाला ८५ वर्षी झालेली आहेत त्यांना दिर्घायूष्य लाभो ही प्रभु चरणी प्रार्थना .प.पु आई आजही तपोवनात विशिष्ट दिवशी त्या अनुग्रह देतात अन त्यांच्यात तेव्हढाच ऊत्साह ,चैतन्य आहे. प.पु .माऊलींना मी सांगितले की माझा १९८७ साला पासुन ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. आपण आपल्या कृपेचा आशिर्वाद द्यावा.त्यांनी सांगितले की ज्योतिषशास्त्र हा शापित व्यवसाय आहे तेव्हा मी त्यांना सांगितले की मी भाकीत predictionsकरतांना लोकांकरवी पैसे घेत नाही पण काँम्प्यूटर कुडंली काढतांना साँफ़्टवेअरचा खर्च व स्टेशनरी खर्च इत्यादी साठी मात्र अल्प चार्ज घेतो. ही सुध्दा एक सेवा आहे.प.पुज्य माऊलींचे आशीर्वाद मिळाले पण सदगुरु ही परिक्षा पहात असतो त्यांनी मला एकदा अण्णा साहेब (त्यांच्या मिस्टरांची) कुडंली पहायला सांगितली होती खर तर प.पु. माऊली ह्या फ़ार दिव्यत्वाला पोहचलेल्या आहेत. परंतु गुरु आज्ञा झाल्यावर नाही कसं म्हणायचे म्हणून मी कुडंली बघितली. त्या म्हणाल्या मी सिध्दींचा वापर करत नाही...
याच अनुषंगाने मी प.पु. माऊलींची कुडंली पाहीली तेव्हा अभ्यासू ज्योतिषांसाठी देत आहे.
प.पु माऊलींची जन्मतारीख २०-०९-१९२३ आहे कन्या लग्न असुन लग्नेश बुध आहे तसेच या बुधाचा व कन्या लग्नाचा मंगळाचा कुठलाही संबध येत नसल्याने प.पु.सदगुरु माऊली ह्या अहंकारी नाहीत त्याच प्रमाणे चतुर्थ स्थानावरुन कुठलाही जातक प्रामाणिक आहे की नाही हे समजते.प.पु.माऊलींच्या चतुर्थ स्थाना मध्ये शुभ ग्रह चंद्र येतो तसेच चतुर्थेश गुरु हा शुभ ग्रह येतो तसेच चंद्र हा बुध ह्या शुभ ग्रहाच्या उप-नक्षत्रात येतो त्यामुळे सदगुरु माऊली ह्या अत्यंत प्रामाणिक आहेत,नितीमान आहेत.सदगुरुची कृपा किंवा सदगुरु लाभ हा केव्हा होतो ? ज्यावेळेला लाभाचा उप-नक्षत्र स्वामी हा ५-९ किंवा ११ या स्थानाचा स्ट्राँग कार्येश असतो. प.पु.माऊलींच्या कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामी शनि असुन तो मंगळाच्या नक्षत्रात आहे व त्याची दृष्टि पंचम स्थानातील केतू वर आहे त्या मुळे प.पु.माऊलीनां सदगुरु कॄपा लाभली व स्वामी शिवानंद ॠषीकेश यांची कृपा झाली.प.पु माऊलींच्या तपोवना विषयी व कार्याविषयी जाणुन घ्यायचे असल्यास यावर क्लिक करा.
तसेच ज्या महादशेचा संबध पंचमस्थानाशी येतो त्यादशेमध्ये सदगुरु कडुन औपचारीक पणे गुरुदिक्षा दिली जाते.प.पु.आईंना गुरु महादशा १९६० पासुन सुरु झालेली होती तसेच या गुरुची दृष्टि केतु वर असल्या मुळे व केतू पंचमस्थानात असल्यामुळे प.पु.आईंना १९६२ साली स्वामी शिवानंद ॠषीकेश याच्यांकडुन गुरु दिक्षा प्राप्त झाली. ज्यावेळेला कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामीचा संबध ११ व्या स्थानाशी असतो त्यावेळेला अशा महात्म्यांना ऋध्दि-सिध्दि प्राप्त होते. प.पु.आईंच्या कुडंलीत लाभाचा उप-नक्षत्र स्वामी शनि असुन तो मंगळाच्या नक्षत्रात
असुन मंगळ हा लाभ स्थानात आहे त्यामुळे प.पु.माऊली ह्या ऋध्दि-सिध्दि प्राप्त संत-महात्मे आहेत.प.पु.माऊलींची कुडंली ही उच्च पदाला पोहोचणा-या संत-महात्म्याची कुडंली आहे तसेच ही अत्यंत अशी दुर्मिळ कुडंली आहे.प.पु माऊलीनां जगत गुरु शंकराचार्य ही बहुमानाची योग मार्गातली अति -उच्च पदवी प्राप्त झाली आहे.एका योगमार्गावरच्या स्त्री संत महात्म्याला असा बहुमान भारतात पहिल्यांदाच प्राप्त झाला आहे.

Sunday, August 24, 2008

एका लग्नाची गोष्ट....!




कुडंली मोठी करण्यासाठी त्यावर टीचकी मारा:
से म्हणतात लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात.इंग्रजीत एक म्हण यावरुन पडली आहे.Marriages are Made in Heaven And Celebrated on Earth....!एका जातकाची ही कुडंली आहे, लग्न खुप छान झाले पण काही दिवसात असे लक्षात आले की आपली चक्क फ़सवणूक झालेली आहे. ह्या जातकाची कुडंली जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की सदर जातकाच्या कुडंलीत सप्तमाचा सब-लाँर्ड बुध असुन तो केतूच्या उप-नक्षत्रात आहे व केतू नेपच्यूनच्या युतीत असुन राहूच्या नक्षत्रात आहे.राहूची दृष्टि नेपच्यूनवर आहे.
नेपच्यून हा फ़सवणूक करणारा ग्रह आहे. त्यामुळे या जातकाची फ़सवणूक झालेली आहे असे दिसून आले तसेच सप्तमाचा सब-लाँर्ड बुध असल्याने कृष्णमुर्तिंच्या नियमा नुसार पहिल्या पत्नीला घटस्फ़ॊट देऊन दुसरा विवाह झालेला आहे.या व्यक्तिने असे सांगितले की त्याच्या पहिल्या पत्नीला कोड असुन लग्नाच्या वेळेला चक्क कोडाच्या डागांवर रंग दिलेला होता. खर तर कोड हा आजार नाही पण केवळ या गोष्टींचे निमित्त झाले अन भांडणामुळे पती-पत्नीतील संबध दुरावले अन त्याचे पर्यवसान घटस्फ़ॊटात झाले.

Saturday, August 23, 2008

कुंडलीतील जन्मवेळ बरोबर आहे की नाही ...हे कसे ओळखावे.?


ज्योतिषा कडे जेव्हा बरेच जातक जातात तेव्हा त्याच्या पुढ्यात चौकोनात मांडलेल्या सरळ साध्या कुंडल्या ठेवुन त्याला प्रश्न विचारले जातात परंतू त्या कुडंल्याची जन्मवेळ बरोबर आहे की नाही हे मात्र पाहीले जात नाही पण एखादाच निष्णात व अनुभवी ज्योतिषी जातकाची जन्म वेळ तंतोतंत बरोबर आहे की नाही हे पाहुनच भाकीत करतो. उदा. आमच्या अनुभवाप्रमाणे मिथुन आणि कन्या या बुध ग्रहाच्या राशीशी संबधीत कुडंल्या ज्यावेळेला असतात अशावेळेस हमखास एक बरोबर व एक चुकीची कुडंली ज्योतिषा पुढे जातक सादर करतो त्यावेळेस आपण या बाबतीत सावध राहुन त्यावेळेची चालुवेळेची प्रश्न कुडंली मांडुन व त्यावेळेचे रुलिंग प्लँनेटस Ruling Planets चा आधार घेऊन त्या जातकाची जन्मवेळ व जन्मकुंडली बरोबर आहे की नाही याची खात्री करुनच पुढचे भाकीत करावीत.
प्रथम सादर केलेल्या कुडंली मधील सब-लाँर्ड पहावा व तो रुलिंग प्लँनेटस मधील ग्रह असावा त्यानुसार जन्माची वेळ तंतोतंत बरोबर करुन घ्यावी व त्यानुसार जन्मकुडंली नवीन तयार करावी आणि कृष्णमुर्ती पध्दतिने भाकीत करावीत म्हणजे
ज्योतिषशास्त्र बदनाम होणार नाही. ज्योतिषशास्त्रा हे अचुक जन्मवेळेवर आधारीत असल्याने ब-याचदा जन्मवेळ ही दवाखान्यात नर्स किंवा दायी यांनी त्यांच्या हातावरील घड्याळात असलेल्या वेळेनुसार सांगितली जाते शिवाय हे टी.व्ही च्या वेळेनुसार
घड्याळे लावली जातात त्यामुळे बाळाची जन्मवेळ चुकण्याची संभावना जास्त असते.तसेच हल्ली तर काँम्प्यूटर नि इंटरनेटचा जमाना आहे तेव्हा काँम्प्यूटरचे क्लाँकही आपणाला अचुक व अपडेट करता येते ते automic watch ने , त्यासाठी आपण automic watch या साईट वर जावे व काही क्षणातच आपले काँम्प्यूटर आपोआप स्वतः हुन या automic watch च्या वेळे नुसार प्रिसेट होईल. आपल्याला अधिक तंतोतंत वेळेप्रमाणे प्रश्न कुडंल्या मांडता येतील व अचुक भविष्य कथन करता येईल.वरील साधन जर उपलब्ध नसल्यास कमीत कमी आकाशवाणी रेडीओच्या वेळे नुसार घड्याळे लावुन घ्यावीत.

Thursday, August 21, 2008

दि.१६-१७ -२००८ आँगष्टच्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे परीणाम


नुकतेच शुक्रवार दिनांक १ आँगष्ट २००८ रोजी खग्रास सूर्यग्रहण लागले त्यांनतर १६-१७ ,आँगष्ट २००८ ला चंद्रास खंडग्रास ग्रहण लागले ही दोन्ही ग्रहणे साधारणतः १६-१७ दिवसाच्या अंतराने झाल्याने याचे भीषण परीणाम जगावर घडतील.
या खंडग्रास चंद्रग्रहणाचे राशी परत्वे फ़ल:
मेष,सिंह ,वृश्चिक ,मीन या राशींना शुभ फ़ल
वृषभ ,कर्क,कन्या ,धनु या राशीनां मिश्र फ़ल.
मिथुन,तुला मकर व कुंभ या राशींना अनिष्ट फ़ल मिळेल.