Showing posts with label नववांश कुडंली. Show all posts
Showing posts with label नववांश कुडंली. Show all posts

Monday, June 16, 2008

नववांश कुडंली कशी पहावी?





दिसत नसल्यास वरील कुडंलीवर क्लिक करावे

नवमांश कुडंली काढतांना राशीतत्वे विचारात घ्यावी लागतात ऊदा. १-मेष,५-सिहं-९-धनू या अग्नि राशी असून त्यांचा नवमांश मेष राशी पासून सुरु होतो.
२वृषभ-६कन्या-१०मकर या पॄथ्वीतत्वाच्या राशी असुन त्यांचा नवमांश १०-मकर राशी पासून सुरु होतो.

३मिथुन-७तुळ-११कुभं या वाय़ुराशी असुन त्यांचा नवमांश ७तुळ राशी पासून सुरु होतो.

४कर्क-८वॄश्चिक-१२मीन या जलराशी असुन त्यांचा नवमांश ४कर्क राशी पासून सुरु होतो.

वरील नियमा नुसार आपण दिलेल्या वरील जन्म कुडंलीत वॄश्चिक लग्न आहे व ते पहिल्या चरणा मध्ये असल्यामुळे ते कर्क नवामांशा पासुन सुरु होईल त्या प्रमाणे उदारहरण कुडंलीत कर्क नवामांश लग्न दाखवुन त्या नुसार नवामांश कुडंली काढली आहे .
नवामांश कुडंलीला फ़ार महत्व असते.नवामांश कुडंली वरुन ग्रहांचे बल व वैवाहिक जीवना विषयी माहिती कळते.