भविष्याची गुरुकिल्ली ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे. माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Monday, September 1, 2008
रुलिंग प्लेनेट्स एक जादूची कांडी......!
अगदी सायंकाळी मी काही कुडंल्याचा अभ्यास करत होतो. कुणी तरी दाराची कडी
वाजविली.मी दार उघडले....!कुणी तरी अनोळखी व्यक्ति घरात शिरली...? मी काही बोलायच्या आत ते म्हणाले आपण ज्योतिषी आहात अस मला माझ्या मित्राने सांगितले...तेव्हा तो सरळ मुद्यावर आला मी खुप चिंतातुर आहे वेळ न दवडता मी आपल्या कडे आलो आहे ...माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा परगावी सर्व्हीसला आहे तो रोज अप-डाऊअन करतो पण
तो आज घरी वेळेत परत आलेला नाही ...आपण माझा प्रश्न बघा....!प्रश्न पाहतांना १सप्टेंबर२००८ रोजीची ती वेळ होती रात्रीचे ०८:०४:०० pm वाजले होते मी त्यावेळेची प्रश्न कुडंली मांडली.प्रश्न कुडंलीत मीन लग्न येते त्यामुळे रुलिंग प्लँनेटस
मध्ये लग्नेश गुरु होता आणि चंद्र हा कन्या राशीत असुन उत्तरा नक्षत्रात आहे त्यामुळे रुलिंग प्लेनेट्स मध्ये रवि आणि बुध येतो.वार सोमवार असल्यामुळे रुलिंग प्लँनेट मध्ये चंद्र येतो.प्रश्न कुडंलीत चंद्र केद्रांत असल्यामुळे जातक लवकरच मीन लग्न संपण्याच्या आत पोहोचावयास पाहिजे परंतु पंचागानुसार मीन लग्न ०७:२३:०० रात्री सुरु होउन ०८:५९:०० संपते .आता रुलिंग प्लँनेट मध्ये गुरु महत्वाचा आहे त्याच प्रमाणे मीन राशी मध्ये रेवती नक्षत्र आहे त्यामुळे बुध घ्यावा लागेल तसेच वार सोमवार म्हणुन चंद्र घ्यावा लागेल परंतु चंद्राच्या रशीत केतू असल्याने रुलिंग प्लँनेट मध्ये चंद्रा ऎवजी केतूला घ्यावे लागेल
कारण कॄष्णमुर्ती म्हणतात Nodes are stronger than planets म्हणुन गुरु,बुध,केतू,रवि अशी रुलिंग प्लँनेटस ची साखळी घ्यावी लागेल.म्हणजे घटना घडतांना हे रुलिंग प्लँनेटस असावे लागतील आणि हा बिंदू १८ अंश उदीत असतांना ती व्यक्ति घरी परतावयास हवी.सदर लग्न हे ३मिनिटाला १ अंशातुन फ़िरते तर १८ अंश फ़िरायला १८x ३= ५४ मिनीटे जवळ जवळ लागतील.०७:२३:०० ला मीन लग्न सुरु झाले त्यात ००:५४:०० मिनिटे मिळविल्यास ०८:१७:०० वाजता रात्री ही घटना घडायला हवी म्हणजे ती व्यक्ति घरी यायला हवी.त्यांना म्हटले आता हे कँल्यूलेशन मी दोन मिनीटात केले आता घड्याळ लावा आणि पहा ०८:१७:०० मिनीटांनी आपला पुत्र येतो की नाही घरी ...आता चिंतेला मारा गोळी...थोडा गरम चहा घेतला ... त्यांना म्हटले आपल्या घड्याळात किती वाजले हो बघा...ते म्हटले ०८:१६:५९.....पुढच्या क्षणी त्यांचा मोबाईल खणाणला ...तो त्यांच्या सौं चा होता ...त्या म्हटल्या आपले चिरंजिव सुखरुप घरी परतले आहे म्हणून मी फ़ोन केला....!त्यांनी माझे आभार मानले !
मी मनोमन माझ्या परम श्रध्येय गुरुजी प्रोफ़ेसर कृष्णमुर्तिजींना नमस्कार केला..कारण जे पारंपारिक ज्योतिषशास्त्रात सापडले नाही अशा अनेक प्रश्नांची उकल करुन प्रोफ़ेसर कृष्णमुर्तिजींनी ते सुध्दा किती सहज सिध्दांच्या स्वरुपात लोकांपुढे माडंलेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment