Saturday, May 28, 2011

पत्रिका जुळवतांना मंगळाचा विचार ...!


आजकाल लग्न सराई जोरात सुरु आहे.त्यामुळे पत्रिका जुळवतांना अनेक मुला मुलींचे पालक पहिल्यांदा मंगळावर भर देऊन विचारतात
अन काही पत्रिका पहाणारे मंडळी मंगळाच्या नावाने धाकवतात. अमुक मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे...!
बहुदा अनेक जण कुंडल्या घेऊन आमच्या कडे येतात अन सांगतात अमुक अमुक व्यक्तीने अमुक/मुला/मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे असे सांगितले आहे...कडक मंगळाचा जास्तीच ते धाक दाखवतात.
आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. लग्न कुंडली मध्ये जर मंगळ पहिल्या, चौथ्या,सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानामध्ये असला म्हणजे त्या कुंडलीला मंगळाची कुंडली म्हणतात.
सोबत दाखवलेली कुंडली मध्ये मंगळाची स्थीती दाखवलेली आहे.
परंतु वरील पाच स्थानांमध्ये मंगळ जर स्वराशीचा म्हणजे मेष,वॄश्चिक,
राशीचा आणि उच्च राशीचा म्हणजे मकर राशीचा असेल तर मंगळ दोष मानण्याची काही एक गरज नाही.कारण असा मंगळ नुकसान करणार नाही.परंतु वरील स्थाना मध्ये मंगळ असुन त्यावर जर अशुभ ग्रहाची दॄष्टी असेल तर मंगळदोष मानण्यास काही हरकत नसावी.
उदा. वरील स्थानातील मंगळावर शनिची दॄष्टी असेल तर ...!
तसेच वरील पाच स्थानात जल राशीत म्हणजे कर्क,वॄश्चिक,मीन, या राशीत असेल तर मंगळ दोष मानु नये.कारण मंगळ अग्नी तत्वाचा
ग्रह आहे.तो जल तत्वाच्या वरील राशीमध्ये सौम्य होतो.
तसेच वरील पाच स्थानात मंगळ असुन तो जर ६,८,१२ या अशुभ स्थानाचा मालक असेल तर मंगळ दोष मानणे योग्य होईल.
तसेच कॄष्णमुर्ती पद्धती प्रमाणे मुलीच्या लग्नाचा उपनक्षत्रस्वामी मंगळ असुन तो जर मीन राशीत असेल व हर्षलच्या युतीत तर अशा मुलीशी विवाह करणे योग्य नसते.आमच्या अनुभवा प्रमाणे ७ आणि ८ स्थानातील दुषित मंगळ जास्त धोकादायक असतो.