Sunday, December 21, 2008

वैवाहिक जीवनात सुख मिळणार का?








जीवन हे गाणे आहे, कधी ते संसाराच्या दोन रथांच्या चाकां प्रमाणे असते आणि त्या चाकांना नवरा आणि बायको याची उपमा दिली जाते.एक चाक निखळले तरी तो संसार रथ तिथेच गडबडतो.माझ्या कडे एक जातक अर्थात एका तरुणाचा फ़ोन आला त्याने कुठलाही प्रश्न न विचारता सरळ माझ्या हातात कुडंली दिली.ती कुडंली मी पाहिली आणि त्वरीत म्ह्टले आपल्याला सांसारिक समस्या दिसते....!आपले आणि आपल्या पत्नीचे एकमेकांशी काही तरी मतभेद असावेत ...?
असे बोलल्यावर तो पटापट बोलू लागला...! होय माझी पत्नी ही साधारणतः ३-४ महिन्यापासून माहेरी गेली आहे ...
मग मला ह्या गोष्टी अगोदर कशा समजल्या होत्या? हे तुम्हाला जाणुन घ्याव्याशा वाटतील...कुंडलीत वैवाहिक जीवना बद्दल सप्तमाचा सब-लार्ड सर्व सांगतो.ह्या कुडंलीत सप्तमाचा सब-लार्ड मंगळ होता व तो षष्टेश असुन तो व्ययात होता त्यामुळे सहा व बारावे स्थान ही वैवाहिक जीवना मध्ये तीव्र मतभेद दाखवतात.त्याच प्रमाणे मंगळ हा रविच्या नक्षत्रात आहे व रवि हा
तीन आणि पहिल्या स्थानाचा कार्येश आहे तसेच तो शनिच्या उप-नक्षत्रात आहे व शनि हा ८,९ व २ स्थानांचा कार्येश आहे आणि अष्टमस्थान हे मतभेद दाखवते आणि शनि हा शेवटी बुधाच्या नक्षत्रात असल्यामुळे व राहू हा बुधाच्या राशीत असल्याने चतुर्थाची प्रामुख्याने फ़ळे मिळतील.तसेच नवमांश कुडंली प्रमाणे सप्तमेश हा शुक्र आहे व तो व्ययात आहे व तो चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र व्ययात आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद दिसुन येतात.
प्रामुख्याने वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र असल्यामुळे आणि तो ६ आणि १२या वैवाहिक जीवनाचा विसंवादी स्थानाचा कार्येश असल्यामुळे याला वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही असे दिसते.शेवटी घटस्फ़ोटा पर्यंत प्रकरण जाऊ शकते हे यावरुन स्पष्ट होते.सप्तमाचा सब लार्ड हा मंगळ हा तॄतीयाचा कार्येश असल्यामुळे कोर्टामार्फ़त हे प्रकरण मिटेल.याला गुरुची महादशा व शुक्राची अंतर दशा चालू आहे आणि गुरु हा मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा ६ व १२ या विरोधी भावाचा कार्येश आहे.त्यामुळे महादशा ही वैवाहिक जीवनाला अनुकुल दिसत नाही. त्याला मी १ ते २४९ मधील कृष्णमुर्ती पध्दती प्रमाणे दैवी नंबर विचारला तर त्याने २५६ हा आकडा पुस्तकाच्या पानावरुन सांगितला! त्यावरुन आम्हास असे समजले की याच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे म्हणाजे वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही असे दिसते.कृष्णमुर्तीचे अनुभवाचे बोल हेच सांगतात.पण काही जण १ ते २४९ ह्या कृष्णमुर्ती पध्दतीच्या नंबराच्या बाहेरील नंबरावर (वर उदाहरणात आमच्या येथे जातकाने असाच बाहेरील नंबर सागितला २५६ होता )नवमांश कुडंलिचा वापर करतात(जे आम्हाला व गुरुजींना म्हणजे कृष्णमुर्तीनां अभिप्रेतच नाही)अर्थाअर्थी काहीतरी चुकीचा संबध जोडुन काही तरी भविष्य कथन करतात.शेवटी जातक जो १ते २४९ मधील नंबर सागंतो त्या नंबराला महत्व द्यावे असे आमचे प्रामाणिक म्हणणे आहे. बाकी या बाहेरील नंबरांना कुठलाही उदा .२५० ते अनंता पर्यंत नंबर कृष्णमुर्तीनां अभिप्रेतच नाही हे लक्षात ठेवा.

1 comment:

Unknown said...

मी ब्लाॅग वाचते वेळी अनेक वेळा सबलाॅर्ड हा शब्द वाचला. उपनक्षत्रस्वामी म्हणजे काय? मी ज्योतिष शास्त्राची विद्यार्थिनी आहे, म्हणून हा प्रश्न विचारते आहे. मला उत्तर मिळेल ही अपेक्षा.