भविष्याची गुरुकिल्ली ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे. माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Friday, December 26, 2008
सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते
सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते
१९९३ ला आमचा हृषीकेश येथे जाण्याचा योग आला . गंगेकाठी वसलेले हृषीकेश म्हणजे पृथ्वी वरचा स्वर्ग जणूच...!आम्ही म्हणजे मी व माझा मुलगा तसेच आम्ही सहकुटूंब आणि १०० जणांचा आमचा साधक परिवार प.पू.ॐ मालती देवीं अर्थात आमच्या गुरुमाऊली यांच्या सोबत हृषीकेशला गेला होता.हृषीकेश येथे अनेक ठिकाण आम्ही पाहिलीत.लक्ष्मण झूला,शिवानंद झूला ,तसेच गंगे काठी ‘जंगली’ सिनेमाचे शूटिंग झाले तो स्पाँट पण गंगेच्या बाजूला पाहिला.
आश्रमात आम्ही ७ ते ८ दिवस होतो. प.पू. ॐ मालती देवीं ह्या हृषीकेशच्या स्वामी शिवानंदाच्या शिष्या आहेत.या गुरुभूमित पावित्र्य आहे .प.पू.ॐ मालती देवीं म्हणायच्या ही सदगुरुंची भूमि म्हणजे आम्हाला माहेरी आल्या सारखे वाटते.
प.पू.ॐ मालती देवीं यांची साधना कशी झाली? याबद्दल खूप सूदंर अनुभव आहे. १९५६ साली स्वामी शिवानंदाच्या
आश्रमात त्या दिल्लीच्या ऊन्हाळ्या पासुन लांब, निसर्गरम्य ठिकाणी सुट्या घालवण्यासाठी त्या आल्या होत्या तेव्हा स्वामी
शिवानंदाच्या आश्रमात प.पुजनीय स्वामी शिवानंदानी प.पु.ॐ मालती आईंना ‘शिवानंद योगत्रयी’हे पुस्तक दिले आणि
वाचायला सांगितले पुढे प.पु.ॐ मालती आईंनी यापुस्तकाच्या शेवटच्या पानापासुन वाचायला सुरुवात केली आणि प.पु.ॐ
मालती आईं ध्यानमार्गातल्या निर्वीकल्प समाधीत पोहोचल्यात. प.पु ॐ मालती आईंनी आपल्या साधन मार्गातल्या दिव्य अनुभवांना ‘कोणा एकाची साधन गाथा ’ यापुस्तकाच्या माध्यामातुन साधकां पर्यंत पोहोचवलेत ‘कोणा एकाची साधन गाथा ’ यापुस्तकात प.पु.ॐ मालती आईंनी एक उल्लेख केला तो म्हणजे मी ध्यानाच्या उच्च अवस्थे पर्यंत कशी पोहोचली ते केवळ माझ्या सदगुरुंनी दिलेल्या ‘शिवानंद योगत्रयी’ या पुस्तकाच्या माध्यमातून....! तेव्हा प.पु.ॐ मालतीआईं कडे येणारा प्रत्येक साधक स्वामी शिवानंद लिखित ‘शिवानंद योगत्रयी’ या पुस्तकाची मागणी करु लागला परंतु ह्या पुस्तकाच्या प्रति नंतर मात्र ऊपलब्ध होऊ शकल्या नाहीत. प्रत्येक येणारा याबाबत हे पु्स्तक कुठे मिळेल का हे पाहु लागला. मात्र असे पुस्तक आता ऊपलब्ध होऊ शकणार नाही असे ऊत्तर अनेकांना मिळाले होते.योगायोगाने आम्ही साधक स्वामी शिवानंदाच्या आश्रमाच्या पुस्तक विक्रिच्या ग्रथांलयात गेलो तेव्हा केवळ एकच प्रत इंग्रजीतली `TRIPLE YOGA' By Swami Shivananda.समोर दिसली आणि ती वाचण्याच्या ऊद्देशाने घेतली.हे पुस्तक वाचतांना पुढे तर मला असे वाटू लागले की इतक्या सुंदर इंग्रजी पुस्तकाचे मराठीत जर भाषांतर केले तर..माझे आँफ़िसचे डेली रुटीन आणि त्यानंतर सायंकाळी मी हे पुस्तक आणि नोटबुक पेन घेऊन बसु लागलो.भराभर मराठीतून भाषांतर करु लागलो किंबहुना हे पुस्तक पुर्णतः मराठीतून माझ्या कडुन भाषांतरीत झाले.आता प्रश्न होता तो प्रकाशनाचा.मग हृषीकेशच्या स्वामी चिदानंदाना पत्र लिहिले की `TRIPLE YOGA' By Swami Shivanandaया पुस्तकाच्या मराठी आवृत्तीला म्हणजे ‘शिवानंद योगत्रयी’ला परवानगी द्यावी हे पुस्तक छापायची परवानगी मिळाली.
पहाता पहाता या माझ्या भाषांतरीत पुस्तकाच्या प्रथमावृत्तीनंतर अनेक आवृत्या निघत गेल्या.ही केवळ सदगुरु कृपाच म्हणावी.
स्वामी शिवानंद यांचे नाव कुप्पूस्वामी ते मुळचे आध्रंच्या पट्टामलाई गावाचे त्यांचा जन्म १८८७ ला झाला बालवयात कुप्पूस्वामीच्या बुध्दिमत्तेची चमक दिसू लागली पुढे त्यांना वैद्दकिय शिक्षण घेतले.डाँक्टर म्हणून ते सेवेसाठी मलाया गावी
आले तेथे त्यांनी हाँस्पिस्टल मध्ये तन मन धन वाहुन सेवा केली.मुळतः विरागी वृत्ती असलेल्या स्वामीजीनां रुग्णांची सेवा
करतांना जाणवले की मानवी जीवन हे दुखाःनी भरलेले आहे .स्वामीजींचे मन शास्वत सुखाच्या शोधा साठी धडपडु लागले
त्यावेळी त्यांना एका योग्याने ‘जीव ब्रम्ह ऎक्य’ हे पुस्तक दिले.ते वाचून त्यांचे वैराग्य जागृत झाले. स्वामीजी भारतात परतले .पुढे ते यात्रा करत असतांना पंढरपुरला एका पोस्टमास्तरांकडे घरचे काम करुन राहु लागले.त्यांची सेवा स्वामी इतके करीत की पायही दाबीत.पुढे त्या पोस्टमास्तरांना विचारले आत्मसाक्षात्कार करुन घ्यायला कोणती जागा योग्य आहे तेव्हा त्या पोस्टमास्तरांनी स्वामीजींना हृषीकेशचे टिकिट काढुन दिले.स्वामीजीं त्या पोस्टमास्तरांकडे पुर्ण अज्ञानाचा बुरखा घेऊन राहिलेत.पोस्टमास्तरांनाही अज्ञानात ठेवले.त्या बिच्या-यास काय माहित की एक विद्वान डाँक्टर आपल्या घरी काम करतोय. पुढे थोड्याच दिवसात स्वामीजींनी संन्यास दिक्षा घेतली आणि ते स्वामी शिवानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. सेवा .प्रेम,दान,चित्त शुध्दी ,ध्यान या पंचसूत्रीचा जगभर प्रचार केला. स्वामी शिवानंद हे हृषीकेश मध्ये साधना करत असतांना हिमालयातील साधू-संताना औषध देऊन सेवा करत. दिव्य जीवन संघाची स्थापना करुन त्यांनी ३०० च्या वर पुस्तक लिहिलेत. अशा या दिव्य जीवन जगलेल्या संत सतपुरुषाच्या कार्याला प्रणाम. त्यांनीच माझ्या सारख्याचे निमित्तमात्र माध्यम
म्हणुन(TRIPAL YOGA' By Swami Shivananda ) ‘शिवानंद योगत्रयी’च्या रुपाने एका अर्थाने मराठीतुन भाषांतर करुन घेतले असावे.सदगुरु कृपा ही किती दिव्य आणि भव्य असते याचे हे ज्वलंत ऊदाहरण आहे.मराठमोळ्या वाचकांना हे पुस्तक वाचतांना खूप आनंद होतोय हेच माझे सेवाधन आहे.
विषेश गोष्ट म्हणजे पोस्टखात्याने प.पु स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या नावाचे अन छायाचित्र असलेले टिकिट काढले.
प.पु.स्वामी शिवानंदा( हृषीकेश) यांची कुडंली.
जन्म तारीख: ०८ सप्टेंबर १८८७ वेळ: सकाळी ०४:१६:०० LMT.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment