Friday, June 20, 2008

गोचर भ्रमण म्हणजे काय?

गो म्हणजे ग्रह चर म्हणजे चालणे.भविष्य सांगण्यासाठी व भविष्याचा कालावधी सांगण्या साठी याचा उपयोग होतो.कृष्णमुर्ती पध्दती नुसार रविचे भ्रमण संबधीत महादशा स्वामीच्या राशीतुन व अतर्दंशा स्वामीच्या नक्षत्रातुन व विदशा स्वामीच्या उप-नक्षत्रातुन होतांना घटना होत असतात.
पारंपारिक पध्दति नुसार चंद्राचे भ्रमण कुंडलीतुन पाहिले जाते.
असे भ्रमण चंद्रा पासुन पाहिले जाते.
रविचे भ्रमण जन्म चंद्रापासुन ३-६-१० या स्थानी शुभ फ़ल मिळते चंद्र जन्म राशी पासुन १-३-६-७-१० स्थानी शुभ फ़ल देतो.
मंगळ चंद्रा पासुन३-६ स्थानी शुभ फ़ल देतो.
गुरु मुळ कुंडलीतील चंद्रा पासुन २-५-७-९ ,शुक्र १-२-३-४-५-८-९-११-१२ ह्या स्थानी , शनि ३-६ स्थानी,तसेच राहू-केतू चंद्रापासुन ३-६-१० या स्थानी असता शुभ फ़ले मिळतात.
आमच्या अनुभवा प्रमाणे कुठल्याही ग्रहाची गोचर भ्रमणे ही जन्मलग्ना पासुनच पहावी.
चंद्राचे भ्रमण महादशा स्वामीच्या राशीतुन व अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातुन किंवा अंतर्दशा स्वामीच्या राशीतुन व महादशा स्वामीच्या नक्षत्रातुन होत असल्यास शुभ फ़लदायी होते व असे दिवस लाभदायी ठरतात

No comments: