Tuesday, June 24, 2008

चंद्र ग्रहण योगात असलेल्या कुंडल्या


माझ्या कडे आलेल्या एका जातकाचा अनुभव असा होता की त्याला सतत काहीतरी भास व्हायचे.त्याच्या सोबत आलेल्या पालकाने सांगितले की ही व्यक्ति काही वर्ष आधी खूप चांगली वागायची पण तो आता ४-५ वर्षा पासुन वेगळाच वागु लागला आहे.तो एकाकी विचार करायचा...मध्येच कुणाशीही बोलत नसे.काम तर मूळीच करीत नव्हता.शिक्षणातही खंड पडला होता.त्याच्या मनावर परिणाम झाला की काय ? किंवा त्याच्या आयूष्यात अशी कुठली एखादी घटना घडली होती ? याचे उत्तर त्या व्यक्ति कडुन मिळत नव्हते..शेवटी त्या जातकाच्या नातेवाईकाला मी त्याची कुंडली मागितली...!
मला जी ऊत्सुकत्ता होती ती खरी ठरली.त्या जातकाची कुंडली अशी होती . त्याच्या कुंडलीत अष्ट्मस्थाना मध्ये चंद्र केतू यांची युती कन्या राशीत होती. चंद्र केतू ग्रहण युतीचे परिणाम वरील प्रमाणे दिसतात.त्यामुळे बुध हा उच्चिचा असुन सुध्दा हा जातक कुठल्याही परिक्षेत पास होऊ शकत नव्हता.कारण चंद्र हा कुडंलीत अत्यंत महत्वाचा ग्रह आहे.अनेक पूर्व जन्मांच्या कर्माचे गाठोडे व अनेक जन्मांचे संस्कार घेऊन हा जातक आलेला असतो.त्यामुळे ही व्यक्ति अशी अचानक वागत असते. तसेच चंद्र ग्रहणात अशा व्यक्तिंची सहन शक्ति कमी असते.बुध ,शुक्र हे ग्रह शनि,मंगळ हर्षल ,नेपचून या पैकी कुणाच्या युति किंवा केंद्र प्रतियोगात असता काही मनोविकृति येऊ शकतात.ज्यावेळा अशुभ ग्रहांची महादशा जर चालू असेल तर कुठल्याही शांती,ऊपासना,अंगठ्या यांचा परिणाम होत नसतो.शेवटी अशा व्यक्तिंना राहू-केतू संबधी महादशा आल्यास जास्तीत जास्त त्रास होतो.त्यामुळे ह्या व्यक्तिंना कौंटूबिंक प्रेम ,जिव्हाळा याची आवश्यकता जास्त असते.संत पुरुषच अशा व्यक्तिंना अध्यात्मिक शक्तिने बरे करु शकतात.पण तसे महात्मे आजच्या कलियुगात मिळणे कठीण आहे.असे योग कुडंलीत असलेल्या व्यक्तिंना अमावस्या तसेच पौरर्णिमेला वेडाचे झटके जास्त येतात .

No comments: