Thursday, June 26, 2008

वास्तु सुख कसे असेल?



दुपारची वेळ होती माझे कुडंल्याचे रिडींग चालु होते.त्याच वेळी एक जातक आला आणि म्हणाला की माझी कुंडली पाहुन मला भविष्य सांगा .जेव्हा प्रश्न कर्ता परिक्षा घेण्याच्या उद्देशाने आपल्याला प्रश्न विचारतो त्यावेळी अभ्यासू ज्योतिष्याला सर्व बाबी तपासुन योग्य ऊत्तर द्यावे लागते.खर तर कुडंली पाहुन मी त्याला पटकन सांगितले की आपल्या कुडंली नुसार आपल्याला वास्तू सुख मिळत नसावे?तो हे ऎकून चकित झाला...! त्याला म्ह्टले की ज्योतिष्याशास्त्र एक गहन शास्त्र आहे. त्यामुळे अभ्यासू ज्योतिष्याला रिडींग देतांना वास्तु पासुन सुख लाभेल का नाही हे सुध्दा समजू शकते..!त्याला सांगितले की आपण अनेक घर बदलवले असतील! तसेच आपणाला घर सुध्दा लाभदायक ठरत नसावेत असे वाटते.वास्तुशास्त्राचा अभ्यास असल्याने त्याने मला त्याच्या घरी येण्यास विनंति केली.त्यानंतर ठरवलेल्या दिवशी त्याच्या सोबत मी त्याच्या घरी गेलो. घरा समोर तुळशी वृदांवन होते पण त्यातली तुळशी पुर्ण वाळून गेलेली होती. आपल्या ऋषी-मुनींनी सांगितल्या प्रमाणे आपणाला हे सुक्ष्म पणे जाणवू शकते की वास्तुतले स्पंदन कशी असतात? त्या वास्तुत प्रवेश केल्या बरोबर मला अस्वस्थ वाटले.त्या जातकाची कुडंली पाहिल्यावर असे आढळून आले की त्याचा चतुर्थ स्थानातील चंद्र राहुच्या युतीत होता आणि हा चंद्र हा अष्ट्मेश होता.त्यामुळे त्याला वास्तु पासुन सुख लाभत नव्हते त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटायचे.माझ्या अभ्यासा प्रमाणे ज्या कुणी जातकाला वास्तु सुख लाभत नाही त्यांच्या कुडंलीत चतुर्थ स्थानातील चंद्र हा शनि,राहू,केतूच्या युती मध्ये असतो.कारण चतुर्थ स्थानावरुन,वास्तु सुख ,मातृसुख,वाहन सुख पाहीले जाते.या बाबतीत वास्तुशात्रा प्रमाणे वास्तुचा उतार हा पुर्वे कडे किंवा ऊत्तरे कडेच असला पाहिजे नाही तर वास्तु ज्या जागेवर बांधली असेल त्या जागेचा ऊतार तसा करुन घ्यावा.माझ्या अभ्यासा प्रमाणे ब-याच कारखान्यांचा उतार हा चुकिचा म्हणजे दक्षिण दिशेकडे असल्यामुळे ते कारखाने बंद पडलेले आढळले.त्याच प्रमाणे घराच्या वास्तु मध्ये अग्नेय दिशेकडे किचन आणि ईशान्य दिशेला पाण्याची टाकी जमिनी खाली बांधलेली नसते त्यामुळे मोठा वास्तु दोष निर्माण होतो.कारण येणारी वैश्विक शक्ति ही सुर्य किरणां मार्फ़त पुर्वे कडुन आणि ऊत्तरे कडुन चुंबकिय शक्ति मिळते त्यामुळे पुर्वे कडे आणि उत्तरे कडे घराला जास्तीत जास्त दार व खिड्क्या (दक्षिण दिशा सोडुन) ठेवाव्यात तसेच वायव्य दिशेला toilet बांधावा.वास्तुचा मध्य भागाला ब्रम्ह स्थान म्हणतात त्या जागी कुठलीही वस्तु ठेवु नये ती जागा मोकळी ठेवावी.पुर्वे कडे व उत्तरे कडे जास्तीत जास्त जागा सोडावी तसेच दक्षिण दिशा जड करावी (राँक गार्डन तयार करावे) अशी रचना असल्यास वास्तुत चैतन्य निर्माण होते.

No comments: