Wednesday, June 18, 2008

रत्ने gems अणि त्यांचे परिणाम...!




धन्यवाद वाचक वर्ग हो...!आपण माझ्या ब्लाँगला जो भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आपल्या मुळे या ब्लाँगची वाचकांची संख्या तर आजवर फ़क्त काही दिवसात ३००८ वर पोहोचली आहे अन ती वाढतेच आहे .पुनश्च मी आपले आभार मानतो....सादर आहे एक नवीन विषय....वाचा तर मग....>


मानवी जीवन हे अनेक दुःखाने भरलेले आहे .प्रसिध्द साहित्यिक गदिमांनी म्हटलेच आहे की पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा....दोष न कुणाचा..!
मानवाच्या पाठी तीन भव रोग लागले आहेत ते म्हणजे आधी...व्याधी...नि ऊपाधी...! आधी म्हणजे मनाचा रोग...व्याधी म्हणजे शारीरिक रोग...ऊपाधी म्हणजे धनाचा रोग त्यासाठी उपाय म्हणुन ॠषी-मुनी हे
अत्यंत दयाळू असल्याने त्यांनी ह्या परिहारा साठी मानव जातीवर अनंत उपकार करुन ठेवले आहेत.त्यांनी मणि..मंत्र..औषधी हे त्यावर तिन उपाय सुचवले आहेत. मणी म्हणजे रत्न(gems) हे आहेत.
कृष्णमुर्तीच्यां theory प्रमाणे सर्वांनांच रत्नांचा लाभ होत नाही.जातकाच्या जन्मकुंडली नुसार जी महादशा चालु असेल त्यावर गुरु चा लाभ योग किंवा नवपंचम योग असेल किंवा दॄष्टीयोग असेल तरच रत्नांचा फ़ायदा आपणास
अनुकुल होऊ शकतो.
काही ज्योतिषी अभ्यास नसल्यामुळे चुकिचे रत्ने वापरावयास सांगतात.
माझ्या कडे एक जातक घाई घाईत आला. त्याचा चेहरा भयभीत होता पण त्याचा हाताला फ़ँक्चर झाले होते. प्रथम त्याला पाणी प्यायला देउन शांत केले आणि मग त्यांना विचारले की आपण या अगोदर कुठल्या तरी ज्योतिषा कडे गेला होता का?
त्यावर ते पटकन मला म्हटले की आपण कस बरोबर ओळखल...! ते म्हटले आपण कसे काय ओळखले..?
मी म्हटलो..ते जाऊ द्या ..पण तुमच्या हातात जो निलमचा खडा(रत्न) आहे ते आपल्या कुंडली नुसार योग्य नसल्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे..तरी आपण तो आत्ताच्या आत्ता काढुन फ़ेकावा..
हे एकून तो जातक फ़ार चकित नि गंभीर झाला...त्याला मी सांगीतले की आपण या पुढे योग्य ज्योतिषा कडुनच रत्ने घ्यावीत नाही तर ‘निम हकिम खतरे जान’ या म्हणी प्रमाणे आपले आता तसेच झाले आहे..
त्यावर ते म्हटले‘ मी आपला अत्यंत आभारी आहे..तरी आता आपण मला आधी हे सांगा की मी आता रत्न वापरु की नको..?
ते म्हटले .... आणि वापरायचे असल्यास मला कोणती रत्ने लाभकारक ठरतील?
त्यावर मी त्याला सर्व कुडंली पाहुन सांगितले की आपल्या कुडंलीप्रमाणे निलम हे शनिच रत्न आपणाला सुटच होत नाही.
त्यामुळे आपण कुठलेही रत्ने तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच वापरावे; अन्यथा कुणी तरी सहज सांगितले, ‘आणि आम्ही घेतले’..! असे म्हणणारे मात्र ऊगाचच दुष्परिणांमाना सामोरे गेली्त अन आज जे घडले ते अनेक जण सांगत असतात तेव्हा ज्योतिषांने सुध्दा खडे सांगतांना या बाबतीत काळजी घेणे महत्वाचे आहे.

ग्रहांचे रत्ने आणि त्या पासुन मिळणा-या वैश्विक किरणे इत्यादी माहिती खाली दिली आहे.
ग्रह प्रमुख रत्न इंग्रजी नावे वैश्विक किरणांचा रंग
रवि माणिक Ruby तांबडा
मंगळ पोवळे Coral पिवळा
बुध पाचू Emerald हिरवा
शुक्र हिरा Diamond पारवा
चंद्र मोती Pearl नारिंगी
शनि नीलमणी Blue sapphire जाभंळा
गुरु पुष्कराज yellow sapphire निळा
राहू गोमेद agate अतिनील (Ultraviolet)
केतू लसण्या cat`s eye अतितांबडा (Infrared)

रत्ने हे किमान किती कँरेट्चे वापरणे आवश्यक आहे?
साधारणतः रत्ने ही अडीच ते तीन कँरेट असावीत .माझ्या मते आपण केवळ रत्नांच्या किमंती म्हाग आहे म्हणुन कमी वजनाची घेउन वापरु नये त्याचा फ़ायदा होत नाही.हिरा याला अपवाद आहे हे रत्न खुप महाग आहे ते

आपण १० सेंट ते ३० सेंट पर्यंत घेऊ शकतात.

किती मिली ग्रँम म्हणजे १ एक कँरेट होईल?२०० मिलीग्रँम = १ एक कँरेट हे लक्षात घ्यावे.
१ एक कँरेट = १०० सेंट.
रत्ने हे कुठल्या हातात वापरावे?
रत्न ही ऊजव्या हाताच्या बोटां मध्ये वापरावीत.

अगंठी घालण्या अगोदर काय करावे?अगंठी तयार झाल्यावर त्यात बनवणा-या कारागिराचे अशुध्द कंपन त्या अगंठीत ऊतरलेले असतात म्हणुन अगंठीला शुध्द करणे आवश्यक आहे.

अगंठीला शुध्द कसे करावे?अगंठीला शुध्द करण्यासाठी आपण त्याग्रहाचे मंत्र कमीत कमी ११ वेळेस म्हणावे तत्पुर्वी अंगठी ही शुध्द गाईच्या दुधात रात्र भर ठेवुन हा विधी करावा आणि समजा रविची अंगठी असेल तर रविवारी सुर्योदया नंतर एक तासाच्या आत ती बोटात घालावी.त्याप्रमाणे चंद्राचा मोती सोमवारी घालावा तसेच ईतर ग्रहांचे नाव व वार लक्षात ठेवा व त्यावारी्च ते हाताच्या बोटात घालावे.

10 comments:

Unknown said...

पाटील सर नमस्ते सर्वप्रथम आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
माझे नाव श्री.अमित विलास धुर्वे आहे, जन्म दि. १३ / १० / १९८४, वेळ २०:४५PM, पुणे.
माझा व्यवसाय फर्निचर बनविणे आहे तसेच मी स्वतः designer आहे.
माझ्या जन्मकुंडली प्रमाणे माझी रास वृषभ व राशीस्वामी शुक्र आहे. कृत्तिका नक्षत्र, ३ रे चरण.
मी गेले दोन वर्षांपासून ३ कॅरेट चा पुष्कराज व्यवसायाच्या दृष्टीकोनातून परिधान केला असून मला त्याचा फारसा काही लाभ जाणवला नाही, पण त्यामुळे काही नुकसान देखील जाणवले नाही.
काही दिवसांपूर्वी मी राशीप्रमाणे हिर्याची (६१ सेंट) ची अंगठी विधिवत करून परिधान केली आहे, पण मला असे वाटू लागले आहे कि माझा व्यवसाय व माझी मानसिक स्तिथी फारच डगमगू लागली आहे, तरी एकाच वेळी मी पुष्कराज (index finger) व हिरा (ring finger) परिधान करणे योग्य आहे का ??
मला आशा आहे कि आपण मला योग्य ते मार्गदर्शन कराल.
धन्यवाद

अमित वि धुर्वे
९३७१५२८७८४ / ९८८१४५९०९०

Unknown said...

सर,माझ्या गुरुजी जोतिष्यानी मला पाचू वापरण्याचा सल्ला दिला आहे साधारण किती कॅरेट चे असले पाहिजे चांगला result मिळण्यासाठी आणि कधी धारण केलं पाहिजे

Unknown said...

सर,माझ्या गुरुजी जोतिष्यानी मला पाचू वापरण्याचा सल्ला दिला आहे साधारण किती कॅरेट चे असले पाहिजे चांगला result मिळण्यासाठी आणि कधी धारण केलं पाहिजे

Unknown said...

कृपया आपला पत्ता कळवावा
मी सुध्दा एक नवशिक्षीत ज्योतिष अभ्यासक आहे
आपली भेट घेण्याची ईच्छा आहे
माझा मोबाईल नंबर 9226112234/9028792234
जर शक्य असल्यास फोन करणे
विशेष म्हणजे मीसुध्दा ''साधन गाथा''वाचले आहे

Unknown said...

कृपया आपला पत्ता कळवावा
मी सुध्दा एक नवशिक्षीत ज्योतिष अभ्यासक आहे
आपली भेट घेण्याची ईच्छा आहे
माझा मोबाईल नंबर 9226112234/9028792234
जर शक्य असल्यास फोन करणे
विशेष म्हणजे मीसुध्दा ''साधन गाथा''वाचले आहे

Unknown said...

निलम रत्न किती दिवस धारण करावे? साडेसाती संपल्यावर निलम काढावा का? निलम व माणिक एकाच वेळी वापरू नयेत का?

सारिका तुंगेनवार said...

Rahu Sathi Kay karaw

DINMAAN said...

पाटील साहेब आपला मोबाईल क्रमांक मिळेल का?

Unknown said...

मकर 15-3-1996

Unknown said...

Hi,I'm Deepak Jagtap
Mzi birth date 13/11/1993 ahe.birth time pahte 4 ahe...mza 4 wheeler spear part cha buisness ahe 3 year pasun bt mla hve tase success bhetat nhi ye..negative thinking khup yete..paise tikat nhi..khup chid chid hoti,,bhandan hote,,khi solutions ahe ka.my whatsapp no 9850761913 ..I'm wting your positive ans.thanks