Sunday, June 22, 2008

एका स्नेहयाच्या जीवनातली एक सत्य घटना...!







१२ जुलै २००६ सांयकाळची वेळ होती....सर्वे जण टीव्ही वर न्युज चँनल वर ताज्या घडामोडी पहात होते...
घटना तशी भंयकरच होती? टी.व्ही वर मुंबई बाँम्ब स्फ़ोटाची न्युज झळकली...मुबंई तशी शांत होती पण आज काय झाले??
मुंबईच्या लोकल मध्ये बाँम्ब स्फ़ोट झाल्याची न्युज झळकली ...माझे स्नेही तसे ताडकन जागे झाले..करण त्यांचा मुलगा व सूनबाई ह्या मुंबईला राहणारे...शिवाय बाँम्ब स्फ़ोटाची घटना घडली ती वेळ त्या स्नेहयांच्या मुलाची आँफ़िस डयूटी वरुन घरी परतण्याची होती...सारे प्रश्न चिन्ह...सा-यांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला होता.मोबाईलने संपर्क करण्याचा प्रयत्न केला...फ़ोन तर खणखणत होता पण ऊत्तर कुणी देत नव्हते...पुन्हा इकडून १५-२० वेळा वेड्या सारखा प्रयत्न वडीलांनी केला ...झाल कुणी तरी अज्ञात व्यक्तिने फ़ोन ऊचलला...
हँलो हँलो...कोण बोलतंय...???
हं बोला ना !!!
तिकडुन आवाज आला... अन तिथे मुंबईला काय झाले आहे याच वर्णन त्या व्यक्तिने फ़ोनवर केले..
हो...इथे एक माणूस बेशुध्द पडला आहे...फ़ेकला जाऊन...! हा मोबाईल त्याचा तर नाही ना...मी जमा करतो आहे..
फ़ोन कट झाला ..या सा-या गोधंळात सर्वांचे होश उडाले होते..काहीच सुचत नव्हते...त्यानंतर तर मोबाईलचे नेटवर्क एखाद्या ट्रँफ़िक प्रमाणे जाम झाले होते...??
दैवाचा खेळ काहीसा निराळाच होता..!
स्नेहयाने प्राव्हेट गाडीने पटकन मुंबई गाठली... सर्व ठीकाणी आक्रोश ..दुःखाने वातावरण सारे थिजलेले होते..क्षण ही मुलाच्या आठवणींनी गोठून गेले होते....आता काय होईल?...स्नेहयांच्या पायाचा थरकाप ऊडाला...तपास चालू होता..नाव दिले गेले ..फ़क्त मॄतांची ओळख पटवायची ..बस्स...ह्रद्य पिळवटुन टाकणारी घटना घडली...व्हायचे तेच झाले...समोर चित्र विचित्र विखुरलेली बाँडी आली...ही बाँडी आपल्या नातेवाईकाची आहे का ? समोरुन विचारणा झाली..
पण तो मृतदेह ओळखीचा वाटला नाही...??
पुन्हा एक बाँडी आली...पायात घातलेल्या बुटावरुन ती व्यक्ति लांबुनच ओळ्खु आली...!
हो..हाच माझा मुलगा आहे डाँक्टर हा जिवंत आहेना..?..याला वाचवा ना?? ..गयावया करत आमच्या स्नेह्यांच्या अश्रुंचा बांध फ़ुटला......
सार संपल होत ..एक संसार आता उध्वस्त झाला होता...त्यानंतर घरी आणुन मृतदेहावर सर्व सोपस्कार आटोपले गेले..

एक महिन्या नंतर मी त्या स्नेह्यांच्या घरी गेलो...खरतर ते त्या दुखाःतुन कसेबसे सावरले असावे...त्यांचे सात्वंन केले..
त्यानंतर ते म्हटले आपण एक अभ्यासू ज्योतिषी आहात ..मला एक विचारावेसे वाटते की..माझ्या मुलाच्या कुडंलीत असे कोणते योग होते की त्याला असा अपघाती मृत्यू यावा ?खरतर मी त्या मुड मध्ये नव्हतो पण मला एक जाणीव झाली की अशा अपघाती मृत्यूच्या कुडंलींचा अभ्यास करुन पुढे जर आपण त्या व्यक्तिला अगोदर थोडीफ़ार काळजी घ्यायला सांगितल्यास ती व्यक्ति अपघातातुन वाचू शकते काय..तसेच यामुळे आपल्याला पुढे खबरदारीचे ऊपाय मिळू शकतील...कारण ज्योतिष्यशात्र एक मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे ...!माझ्या समोर त्या बाँम्ब स्फ़ोट अपघातात ठार झालेल्या स्नेह्याच्या मुलाची कुंडली आली.
जन्म तारीख होती ..०४-०५-१९६८ जन्म वेळ रात्री ०९:०५लग्नेश आणि अष्टमेश यांची युती सप्तमात असल्यामुळे प्रथम दर्शनी पारंपारिक ज्योतिष पध्दति प्रमाणे यांच्या मृत्यूला कारण कोणीतरी दुसरे दिसत होते. कारण लग्नेश आणि अष्टमेश यांची (exact conjuction ) युती प्रथम दर्शनी काहीतरी वाईट घडणार असे दर्शविते.
कृष्णमुर्ती पध्दती नुसार माझा अभ्यास.

[[ निरयन स्पष्ट ग्रह ]]

ग्रह राशी अंश नक्षत्र राशीश नक्षत्र स्वामी उप-नक्षत्र स्वामी
लग्न वॄश्चिक २०-३१-२५ जेष्टा मंगळ बुध शुक्र
रवि मेष २०-५४-४३ भरणी मंगळ शुक्र गुरु
चंद्र कर्क ०८-०५-४४ पुष्य चंद्र शनि केतू
मंगळ वृषभ ०३-५३-५९ कृतिका शुक्र रवि शनि
बुध वृषभ ०२-०५-१५ कृतिका शुक्र रवि गुरु
गुरु सिंह ०२-४६-०८ मघा रवि केतू शुक्र
शुक्र मेष ०८-२१-४८ अश्विनी मंगळ केतू गुरु
शनि मीन २५-४१-४९ रेवती गुरु बुध राहू
राहू मीन २४-०५-०७ रेवती गुरु बुध मंगळ
केतू कन्या २४-०५-०७ चित्रा बुध मंगळ मंगळ
हर्षल कन्या ०२-०३-१३ उत्तरा बुध रवि गुरु
नेपचून वॄश्चिक ०२-०९-१४ विशाखा मंगळ गुरु राहू
प्लूटो सिंह २७-०२-३८ उत्तरा रवि रवि रवि
....................................................................................

कॄष्णमुर्ती स्पष्टभाव पध्दति


भाव राशी अंश नक्षत्र नक्षत्र स्वामी उप-नक्षत्र स्वामी

१ वॄश्चिक २०-३१-२५ जेष्टा बुध शुक्र
२ धनू २०-५४-२९ पुर्वाषाढा शुक्र गुरु
३ मकर २३-४६-०९ धनिष्ठा मंगळ मंगळ
४ कुंभ २७-३२-४४ पुर्व भाद्रपदा गुरु शुक्र
५ मीन २८-५०-४७ रेवती बुध शनि
६ मेष २६-०४-५१ भरणी शुक्र केतू
७ वृषभ २०-३१-२५ रोहिणी चंद्र शुक्र
८ मिथुन २०-५४-२९ पुर्नवसु गुरु गुरु

९ कर्क २३-४६-०९ आष्लेषा बुध मंगळ
१० सिंह २७-३२-४४ उत्तरा रवि चंद्र
११ कन्या २८-५०-४७ चित्रा मंगळ शनि
१२ तूळ २६-०४-५१ विशाखा गुरु केतू

कृष्णमुर्ती पध्दती नुसार ८ व्या स्थानाच्या(अष्ट्म)उप-नक्षत्र स्वामीची परिपुर्ण अभ्यास केल्या नंतर मृत्यू हा शांततेत किंवा अपघाती (voilent death) होईल वगैरे इत्यादी समजते परंतु कृष्णमुर्ती पध्दती नुसार अष्ट्म स्थान हे मृत्यू क्लेशामुळे किंवा voilence मुळे होतो असे दर्शविते . म्हणून कृष्णमुर्तींच्या नियमानुसार मृत्यू हा जर आत्महत्येनुसार किवां दुस-याने केलेल्या विश्वासघाताने(assassination) जर घडणार असेल तर..! अष्टमस्थानाचा उप-नक्षत्र स्वामी हा मारक स्थान किंवा बाधक स्थान या दोघा पैकी एकाच्या कार्येशाच्या नक्षत्रामध्ये असला पाहिजे आणि अष्टमस्थानाच्या कार्येशाच्या नक्षत्रा मध्ये सुध्दा असला पाहिजे व उपनक्षत्र स्वामी किंवा उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी यांचा संबध मंगळाशी असला पाहिजे.कारण मंगळ हा मृत्यूचा(voilent death) कारक आहे.आमच्या प्रत्यक्ष अनुभवा नुसार मंगळा ऎवजी हर्षल चा सुध्दा तोच परिणाम होतो.वरील नियंमाची मिमांसा केल्यावर मला असे लक्षात आले की ही कुंडली तर अगदी स्पष्ट पणे (voilent death) दिसत होती.
voilent death च्या प्रकारात सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीने वरील k.p (कृष्णमुर्ती) नियमांची परीपुर्ती केली पाहीजे कारण सप्तम स्थान हे आपल्या प्रतिस्पर्ध्याचे स्थान आहे.
अशा प्रकारात विश्वासघाताने मारणा-याचे रुलिंग प्लँनेट हे सप्तम स्थानाचे व त्याचे स्वतःचे रुलिंग प्लँनेट मधले सामाईक असतात.वरील हे नियम त्या जातकाच्या कुंडलीली लावले तर असे दिसून येते की अष्टम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा गुरु असुन तो केतूच्या नक्षत्रात आहे.हा केतू हर्षल बरोबर असुन तो बुधाच्या राशी मध्ये असल्यामुळे तो अष्टमेषाचे काम करतो. उपनक्षत्र स्वामी गुरु हा भावचलित कुंडलीत नवम या बाधक स्थाना मध्ये आहे आणि बुध मंगळाची युती असल्यामुळे मंगळाशी
संबधीत आहे (voilent death कारकाशी) त्यानुसार आठव्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा८ आणि ९(बाधक स्थान) या स्थानाशी व हर्षल ,मंगळाशी संबधीत असल्याने voilent death झालेला आहे.सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी हा सुध्दा केतू च्याच नक्षत्रात असल्याने ह्या कुडंलीत वरील सर्व नियम सप्तम स्थानाला लागु होत असल्यामुळे वरील जातकाचा रेल्वेच्या फ़र्स्टक्लास बोगीतुन बाहेर पडल्याने मृत्यू झाला आहे.ही घटना शुक्र महादशा आणि शुक्र अंतर्दशे झाली आहे कारण महादशा स्वामी हे मारक स्थान,बाधक स्थान व मंगळ ,हर्षलशी संबधीत आहे कारण शुक्र हा केतू च्या नक्षत्रात व गुरुच्या उपनक्षत्रात असल्यामुळे ही घटना घडलेली आहे.मी सर्व चर्चा त्या स्नेह्याशी केली. त्यांनी मला एक विचारले की पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये
ही व्यक्ति बाँम्ब स्फ़ोटाच्या तीव्रतेने फ़ेकली गेल्याने प्रथम दर्शनी मृत्यू झाल्याचे दाखवले आहे.पण त्यांना या बाबतीत शंका होती की अगांवर लागल्याच्या कुठल्याही खूणा नसतांना व अंगाला रक्ताचा एक टीपूस डाग नसतांना या व्यक्तिचा मृत्यू कसा व्हावा यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी मला विचारले की याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला असावा?
मी कुडंली परत पाहिली कुडंलीत अष्टमाचा उपनक्षत्र स्वामी हा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला असावा हे दर्शवितो .
अष्टमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु हा सिहं राशीत असल्यामुळे व मंगळाची गुरु वर दृष्टि असल्याने गुरु(रेल्वेच्या ड्ब्यातून बाहेर फ़ेकल्या गेल्याने ) तसेच हा गुरु सिंह राशीत असल्यामुळे ह्रद्य क्रिया बंद पडणे दाखवत होता त्यामुळे कारण सरळपणे हेच होते ही ह्रद्य क्रिया(मंगळामूळे चोकअप) बंद पडल्याने मृत्यू झाला असावा असे मी सांगितले .तसेच गुरु हा केतूच्या नक्षत्रात असल्यामुळे व केतू हा हर्षल बरोबर असल्याने मृत्यू हा अकस्मात आणि modern equipementमुळे झालेला आहे.मृत्यू नंतर देहाची विल्हेवाट ही गुरु हा सिहं या अग्निराशीत असल्याने प्रेताचा अंतिम संस्कार हा अग्निडाग देउनच होतो आणि तसेच झाले आहे .गुरु हा नवम स्थानात असल्याने dead body ही लांब ठिकाणाहुन आणली गेली असे कृष्णमुर्ती नियमां प्रमाणे मी स्पष्टपणे त्यांना हे सर्व सांगु शकलो.माझे ज्योतिषशात्रातले गुरु श्री कृष्णमुर्तीजी असल्यामुळे त्यांच्या मुळेच एवढे स्पष्ट पणे मी हे सांगु शकलो त्यांचा मी सदैव ऋणी आणि आभारी आहे.

No comments: