Monday, June 23, 2008

कर्ज मुक्तिचे काही ऊपाय !


एक अनोळखी चाळीशीत पर्दापण केलेला गृहस्त घराचा पत्ता शोधत अगदी सकाळी सकाळी माझ्या घरी येऊन बसला .त्यांचा चेहरा हा खुप चिंतातूर दिसत होता.त्याने माझ्या समोर त्याची कुंडली पुढे केली असता माझ्या अभ्यासा नुसार मला एक लक्षात
आले की त्याचे कुंडलीतील ग्रहयोग पाहीले असता तो खूप कर्जबाजारी असावा असे वाटले.मी त्याला स्पष्टपणे सांगितले की आपण खूप कर्जबाजारी आहात असे आपली ग्रहस्थिती कुंडलीत दर्शवित आहे. तो अनोळखी गृहस्थ हे ऎकून फ़ारच चकित झाला !तो म्हणाला आपणास काही सिध्दि वगैरे प्राप्त आहेत का? आपण हारोस्कोप चार्ट पाहुन इतक्या
सहज पणे बोललात!
मी म्हटले..छे हो..कुंडलीचा चांगला रिडर अशा काही गोष्टी सहज सांगु शकतो..!
त्यावर ते हळूचकन म्हटले सर ! आपण एक अभ्यासू ज्योतिषी आहात ..तर मला एक सांगा की मी या कर्जबाजाराच्या संकटातुन कसा मुक्त होईल.?
तो म्हणाला आपण मला याबद्द्ल मार्गदर्शन करा तसेच मी आपला अत्यंत आभारी असेल
त्यानंतर मी त्याला काही उपाय सांगितले..अन त्याने ते चिकाटीने केलेत ...त्यानंतर तो दिड
वर्षांनी कर्जमुक्त होऊन माझ्या कडे आला...त्यावेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले होते..
त्याला कर्जमुक्त होण्यासाठी मी गेल्या वेळी काही तारखा कर्जफ़ेडी साठी काढुन दिल्या होत्या.त्या म्हणजे ज्या वेळेला अश्विनी नक्षत्रातुन चंद्राचे भ्रमण होते व मेष लग्न उदित होते तसेच अनुराधा नक्षत्रात चंद्र होता व वृश्चिक लग्न ऊदित होते. अशा मुहुर्तावर जर कर्जफ़ेड केल्यास पैसे कुठूना कुठून ...कोणत्याही मार्गाने पैशांची जुळवा जुळव लवकर होऊन कर्ज पटकन फ़िटले जाते..मी सुध्दा कार साठी कर्ज घेतले होते आणि वरील योगांवर कर्जफ़ॆड केली तर मला सुध्दा याचा अनुभव आलेला आहे आपण ही याचा अनुभव घ्यावा.

No comments: