Sunday, January 11, 2009

माझ्या लेखाला ऊद्याला प्रसिद्धि मिळेल काय?



परवा सायंकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आले त्यांनी जणू भविष्याची परीक्षाच घेण्याचे ठरवले , त्या उद्देशाने त्यांनी प्रश्न केला की ...पाटील साहेब
आपण मला एक सांगाल का?
मी त्यांना म्हटले जरुर...!
आपण मला प्रश्न करा ....!
ते गृहस्थ मला ‘म्हटले मी कालच एका वृत्त पत्राच्या कार्यालयात एक लेख देउन आलोय..’
तर मग ...? मी म्हटले...हं
त्यावर ते गृहस्थ म्हटले हो ..मला एक विचारायचे आहे की माझ्या या लेखाला ऊद्याला प्रसिद्धि मिळेल काय? कारण वृत्तपत्र हल्ली तर ब-याच लिखाणाला कचरा पेटी दाखवतात..माझे लिखाण हे ज्ञान देणारे आहे, त्यामुळे माझी आतुन ही धडपड आहे की, तो लेख ऊद्याला जर प्रसिध्द झाला तर फ़ारच बरे होईल..पण एक असेही वाटते की निदान दिलेले लेखन म्हणजे ...माझा लेख वृत्तपत्रात छापून तरी येईल का ?
मी त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली (त्यादिवशी तारीख होती ३१/१२/२००८ रात्री ०८:०१:२८ )तर त्याच्या मध्ये असे आढळुन आले की तृतीयाचा सब-लार्ड गुरु असुन तो रविच्या नक्षत्रात आहे आणि रवी लाभ स्थानात आहे त्यामुळे मी त्यांना सांगितले की ऊद्या तुमचे लिखाण नक्कीच प्रसिद्ध होईल..! तसेच लाभाचा उ-नक्षत्रस्वामी बुध असुन तो सुध्दा रवीच्या नक्षत्रात आहे व रवी हा ईच्छापूर्ती करणा-या लाभ स्थानाचा कार्येश आहे. तृतीय स्थाना वरुन लिखाण पाहतात.नियम असा आहे की तृतीयाचा उप-नक्षत्र स्वामी ही लाभाचा कार्येश असावा लागतो व तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा म्हणजे लिखाण प्रसिध्द होते. कुठल्याही ईच्छापूर्ती साठी लाभस्थानाचा उप-नक्षत्र स्वामी पाहतात व तो लाभाचा किंवा प्रथम स्थानाचा कार्येश असावा लागतो व तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा या नियमांची पूर्तता वरील प्रश्न कुंडली दर्शवीत आहे.त्यामुळे त्यांच्या लिखाणाला जरुर प्रसिध्दि मिळेल असे मी सांगताच त्यांना फ़ार आनंद युक्त आश्चर्याचा धक्काच बसला..दुस-या दिवशी अगदी पहाटेच त्यांनी मला फ़ोन वर कळवले आपण जे सांगितले ते अगदी तंतोतंत बरोबर निघाले त्याबद्दल आपल्या ज्योतिषशास्त्राचा व आपला शतशः आभारी आहे.. ज्योतिष्य एक शास्त्र आहे हे मला अगदी कळून चुकले.
हा संवाद ईथेच संपला पण ...!
ज्योतिषशास्त्राच्या अनुभव सिध्द नियमा नुसार तृतीयाचा उप-नक्षत्र स्वामी जर सप्तमाशी संबधीत असेल तर ज्योतिषाने वर्तवलेले भविष्य बरोबर ठरते.