Wednesday, January 28, 2009

गोचर चंद्र भ्रमण व औषधोपचार Moon Transit and Medicines

१. औषध सुरु करतांना गोचर चंद्र मीन व कर्क राशीत असणे ऊत्तम.
२.शस्त्रक्रिया ह्या अमावस्या व पौर्णिमा ह्या दिवशी सहसा टाळाव्यात.
३.स्थिर राशीत चंद्र (म्हणजे २,५,८,११) ह्या राशीत गोचर चंद्र असतांना औषध घेण्यास सुरुवात करु नये कारण आजार जास्त दिवस टिकतो.
४.मेष,वृषभ,मकर या राशीत गोचर चंद्र असतांना प्रथम औषध घेण्यास सुरुवात केल्यास ते औषध पचणार नाही म्हणजे ओकणे, मळमळणे वाढेल.
५रेचक (जुलाबाचे)औषध घेतांना गोचर चंद्र व तत्काळ लग्नाचा स्वामी अनुदित गोलार्धात असावा व मळमळीचे औषध घेतांना चंद्र व लग्नेश ऊदित भागात असावेत.
६.रक्त काढणे किंवा रेचक औषध घेतांना गोचर चंद्र हा जलराशीत (कर्क,मीन) असणे ऊत्तम.
७.गोचर चंद्र पृथ्वी राशीत (२,६,१०) या राशीत असतांना डोळ्यावर ईलाज करु नये किंवा गोचर चंद्र रविच्या अशुभ योगात असतांना ईलाज करु नये. चंद्र पुर्ण बलि (पंचमी ते पौर्णिमा) शुध्द पक्षातील असावा व गोचर चंद्र रवि ,शनि,मंगळाच्या अशुभ दृष्टीत नसावा.