Saturday, January 17, 2009

राहू-केतू मधील बाधीत कुंडली.

जातकाचा जन्म आराखडा.


निरयन स्पष्ट ग्रह.



चंद्र कुंडली आणि स्पष्ट निरयन भावचलित कुंडली



महादशा कोष्टक: चालू महादशा राहूची आहे.



.................
राहू-केतू मधील बाधीत कुंडली. Horoscopes Affected by Rahu and ketu(Dragon`s
Head and Dragon`s tail)
काही दिवसांपूर्वी माझ्या कडे एक जातक कुंडली घेऊन आले होते त्यावेळी त्यांनी मोघमपणे मला म्हटले की माझ्या नातवाची कुंडली पहा. तेव्हा मला त्याच्या स्पष्ट लग्नकुंडलीत चंद्र हा केतूने बाधीत झालेला दिसला.धनु लग्नाची कुंडली होती.त्याचप्रमाणे रवी-केतूची युती जन्मकुंडलीत दिसुन आली. वरील असे योग जर जन्मकुंडलीत दिसुन आले तर ती व्यक्ती बाधीत आहे असे समजावे तसेच त्या जातकाच्या जन्मकुंडलीत राहूची महादशा चालू आहे.अशा परिस्थितीत डाँक्टरी ऊपाय ,मनोवैज्ञानिक ऊपाय लागू पडत नाही असे त्यांना सांगितले.ती व्यक्ती नंतर मला सांगू लागली की माझा नातू हा कधी कधी विचित्र वागतो त्यावेळी आम्ही सुध्दा त्याच्याकडे पाहुन घाबरतो.तो सध्याला शिकत नाही तसेच त्यांनी एका अध्यात्मिक गुरुंना ह्या नातवा बद्दल सांगितले असता त्यांनी फ़क्त एवढेच उदगार काढले की तुमच्या नातूची बाब ही गुढ आणि गंभीर आहे.अभ्यासू वाचकांना आम्ही त्या जातकाची जन्मकुंडली देत आहोत.