भविष्याची गुरुकिल्ली ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे. माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Saturday, June 7, 2008
कालसर्प योग
सुर्य आणि चंन्द्र भ्रमणाच्या कक्षावृत्ताच्या अवती भवती जे दोन संपात बिंन्दू होतात त्या दोन्ही बिदूंना ज्योतिष्यशास्त्रात ग्रहांचे स्थान देण्यात आले आहे उर्ध्वबिदूंला राहू आणि अधःबिदूंला केतू अशी संज्ञा देण्यात आली आहे.
मेदनिय ज्योतिष्यशास्त्रा प्रमाणे कालसर्प योगामुळे जगामध्ये भुंकप,बाँम्ब स्फ़ोट, राजकिय उलथापालथ होत असते.
कालसर्प योग हा राहू केतू च्या मध्ये एकाच बाजुला सर्व ग्रह असता त्यास कालसर्प योग म्हणतात.
कालसर्प योगाची कुंडली धारकाला जीवनात अनेक चढऊतार संभवतात,भाग्योदयात अडथळे येतात आयूष्यभर त्या व्यक्तिला संघर्ष करावे लागतात.
कालसर्प योगाचे दोन प्रकार आहेत १) कालसर्प योग म्हणतात २) अर्धचंन्द्र योग.
कालसर्प योगामुळे प्रगतित अडथळे येतात परंतु अर्धचंन्द्र योगामुळे सुखात व समृध्दित वाढ होते.
कुडंलीत २,६,८,१२ स्थाना मध्ये राहू किवां केतू असतील त्याच्या एकाच बाजुला व एकाच गोलार्धात जर सर्व ग्रह असतील (अपवाद हर्षल नेपच्यून सोडुन) आणि जन्मतः राहू वक्र गतिने सर्व ग्रहांना गिळंकॄत करीत असेल
तरच कालसर्प योग होतो. आणि याच्या उलट अशी परीस्थीती असेल तर कालसर्प योग न होता अर्धचंन्द्र होतो व हा शुभ फ़ले देतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment