Wednesday, June 11, 2008

वाचकांच्या काही महत्वाच्या प्रश्नांना दिलेली ही उत्तर






वाचता येत नसल्यास वरील कुडंली वर क्लिक करा व मोठी करुन पहा.


भविष्याचि गुरुकिल्ली या मराठी भविष्याच्या ब्लाँगला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे .माझ्या भविष्याच्या ब्लाँगला वाचकांनी काही प्रश्न विचारले आहेत.वाचकांच्या काही महत्वाच्या प्रश्नांना दिलेली ही ऊत्तर

वाचकांचे प्रश्न :
धन्यवाद अभिजीत ! आपण विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देत आहोत.
आपण विचारले आहे.
मृत्यूषडाष्टक म्हणजे नक्की काय असतं? जन्मलग्न कुडंलीत चंद्र व जन्मलग्न यांच्या परस्पर कुडंल्या मध्ये वरील आकृतित दाखविल्या प्रमाणे षडाष्टक
योग झाले असल्यास अशा योगांना मृत्यूषडाष्टक योग म्हणतात.

या योगात लग्न केले असता नेमका काय दुष्परिणाम होतो.?
पति -पत्नी यांच्यांत आपसात भाडंण होतात,एकमेकांना पटत नाही.भाडंण होतात .जीवन सुसह्य होत नाही. आयूष्यभर भाडंण होतात.

या योगा मुळे कोणाचा मृत्य़ू संभवतो की काय?या योगा मुळे कोणाचाही मृत्य़ू होत नाही.कुडंलीत केवळ या योगा मुळे कोणाचा तरी मृत्य़ू होतो ही एक भ्रामक कल्पना आहे.
फ़ार तर पति -पत्नी यांच्यांत आपसात बेबनाम होते.पति -पत्नी यांच्यात दुरावा निर्माण होऊन याची परीणति म्हणजे शेवटी घटस्फ़ोट होतो.

1 comment:

निल्या said...

धन्यवाद!
विचारलेल्या प्रश्नाची समाधान कारक उत्तरे दिल्याबद्दल आभारी आहे.
पण मग अजून एक प्रश्न उद्भवतो. गुणमेलन कोष्टकावरुन मृत्यूषडाष्टक योग कसा काय समजतो? त्या साठी कुंडली पहायला हवी ना?
म्हणजे उदा. मुलाचे नक्षत्र चरण आणि वधुचे नक्षत्र चरण इतक्याच माहीती वरुन हा योग आहे की नाही हे कसे समजते?
उत्तरा बद्दल आभारी आहे.- अभिजित