Saturday, June 28, 2008

हरवलेल्या व्यक्ति संबधी एक गोष्ट!

संध्याकाळची वेळ होती.एक साठीतले गृहस्थ माझ्या कडे आले ! तसे ते भविष्या बद्दल काही अडचणी असल्यास माझ्या कडे मधून मधून येतात पण आज ते फ़ार दम हाकत माझ्या कडे एवढ्या रात्री आले .मलाही थोडे आँड्च वाटले होते ...कारण फ़ोन न लावता ते आले होते.आल्या आल्या त्यांनी सांगितले की मला एक चिंता लागली आहे ..आत्ताच मी आणि माझी मुलगी ,नातु हे तीघेही रेल्वे स्टेशनला गेलो होतो. स्टेशन वर मुंबई कडे जाणा-या अपच्या दोन गाड्या ऊभ्या होत्या त्यानंतर त्यांची मोठी मुलगी (जी नोकरी करते व टीचर आहे) ही अचानक त्या गर्दीत गायब झाली.गाडी निघायची वेळ आली होती पण त्यांची मुलगी तर त्यांना काही दिसेना ? सर्वीकडे पाहीले पण प्रयत्न व्यर्थ गेले!शेवटी ते घरी परतले त्यानंतर परत पावली ते माझ्याकडे आले. त्यांनी वरील किस्सा सांगितला...अन मला पट्कन प्रश्न केला, की आपण मला सांगा माझी मुलगी सुखरुप असेल का नाही..? अचानक ती कोठे ?कशी ? निघुन गेली....मी पटकन त्या दिवसाची (म्हणजे तो दिवस होता १६ मार्च २००८ वेळ सांयकाळ: ०८:४६ मिनीटांची) कुंडली मांडली.
कुडंली स्पष्टपणे पाहण्यासाठी तिच्यावर क्लिक करा
हरवलेली व्यक्ति सुखरुप आहे की नाही या विषयी सुरक्षितता दर्शविणारा गुरु हा ग्रह आहे त्याच्या खालोखाल भाग्येश हा ग्रह असतो. प्रश्न कुंडलीत चंद्र हा ग्रह हरवलेल्या व्यक्तिचे प्रतिनिधीत्व करतो म्हणून गुरुची किंवा भाग्येशाची दॄष्टी चंद्रावर किंवा हरवलेल्या व्यक्तिच्या संबधीत स्थाना वर किंवा त्या स्थानाच्या अधिपती वर असेल तर हरवलेली व्यक्ति सुखरुप असते.वरील प्रश्न कुंडली मध्ये हे अपत्य तिसरे असल्यामुळे प्रश्न कुंडलीतले नवम स्थान हे हरवलेल्या व्यक्तिच्या संबधीत स्थान दाखवते आणि नवम स्थानावर तॄतीय स्थानातील धनु राशीतील गुरु ची दॄष्टी असल्यामुळे आपली मुलगी सुखरुप आहे असे सांगितले.वरील प्रमाणे गुरु चा किंवा भाग्येशाचा संबध लागत नसता आणि चंद्र जर ६-८-१२ या स्थान असता तर षष्ठ स्थानातील चंद्रा मुळे आजार किंवा दुखापत झाली असते असे सांगितले असते .तसेच अष्टमात जर चंद्र असता तर अपघात झाला असावा असे सांगितले असते.चंद्र जर १२ व्या स्थाना त असता तर मुलगी ही हाँस्पिटल किंवा लाँक-अप मध्ये असल्याचे सांगितले असते. अष्ट्मात चंद्र जर मंगळाच्या युतित किंवा दॄष्टीत अथवा पापग्रहाच्या युतीत असता तर मुलीला कुणी तरी जबरदस्तीने डांबुन ठेवलेले असते किंवा ती व्यक्ति गुंडाच्या ताब्यात असते.परंतु वरील प्रश्न कुंडलीत असे कुठलेच योग आढळुन आले नाही त्यामुळे वरील शक्यता फ़ेटाळुन लावल्या. वरील प्रश्न कुंडलीत चंद्र हा दशम या केंद्र स्थानात होता त्यामुळे ती व्यक्ति राहत्या गावात किंवा शहरात असली पाहिजे असे ठामपणे मी सांगितले म्हणजे आपली मुलगी चाळीसगावला आपल्या घरी सुखरुप पोहचलेली आहे असे सांगितले.तेव्हा आपण चिंतामुक्त रहावे असे मी त्या गृहस्थांना सांगितले.काही वेळातच त्या मुलीचा फ़ोन आला ,मी सुखरुप असुन आता मी घरी पोहोचली आहे. त्यांना मी अगोदरच सर्व सांगुन टाकले होते त्यामुळे त्याच्या नातवाच्या डोळ्यातले अश्रु ही तात्काळ बंद झाले होते.संकटाच्या वेळी ज्योतिष्यशास्त्राचा किती मार्गदर्शनपर ऊपयोग होतो हे सांगण्यासाठी त्यांच्याजवळ मात्र शब्दच नव्हते.....!



Bookmark and Share

No comments: