नोकरी किंवा व्यवसाय ?
कुडंलीत प्रामुख्याने दशमस्थाना मध्ये असलेल्या ग्रहानुसार जातकाला संपत्तिचा लाभ होतो.दशमा मध्ये रवि असला तर त्या जातकाला पित्या कडुन संपत्ती प्राप्त होते.चंद्र असल्यास आई कडुन जातकाला लाभ होतो.
मंगळ असलातर शत्रु पासुन लाभ होतो.
बुध असला तर मित्रांकडुन .
गुरु असला तर भाऊ.शुक्र असेल बायको पासुन.
शनि असेल नोकर वर्गांकडुन लाभ होतो.इतरांच्या मतानुसार लग्न,चंद्र,रवि यांच्या पासुन जो दशमस्थानाचा जो बलवान स्वामी असेल तर तो ज्या नवमांशात असेल त्या स्वामी नुसार धंदा असतो.
१)जर नवमांशाचा स्वामी जर रवि असेल तर जातक औषधी,गवत,लोकर,पाणी,धान्य,मोती,सरकारी नोकरी किंवा सरकार मध्ये मंत्री.
२)जर नवमांशाचा स्वामी जर चंद्र असेल तर जातक पाण्यापासुन ऊपन्न होणा-या वस्तुंचा वापर करतो.शेती,कपडे वगैरे.
३)जर नवमांशाचा स्वामी जर मंगळ असेल तर जातक ओतकाम, फ़ोर्जींग,युध्द,शिपाई इत्यादी धंदा करतो.
४)जर नवमांशाचा स्वामी जर बुध असेल तर जातक कला,काव्य,जोतिष्य,वेध, दुस-यासाठी मंत्र म्हणतो तसेच पुजारी होतात.
५)जर नवमांशाचा स्वामी जर गुरु असेल तर जातक टीचर,पुरोहित,कायदेतज्ञ ,वकिल होतो.
६)जर नवमांशाचा स्वामी जर शुक्र असेल तर जातक हत्ती,पाळीव जनावरे,गुळ,इत्यादींचा धंदा करतो.
७)जर नवमांशाचा स्वामी जर शनि असेल तर जातक वखार,सुतार काम,नोकर ऊद्योग,मजुर होतो.
८)कुडंलीतील दशमास्थानातील दशमेशाचा नवमांश स्वामी जर शुभ ग्रह असेल तर तो जातक दुस-याला फ़ायदेशीर ठरतो.कुडंलीतील दशमास्थानातील दशमेशाचा नवमांश स्वामी जर अशुभ ग्रह असेल तर तो जातक दुस-याला नुकसानकारक ठरतो.आमच्या अनुभवा प्रमाणे जातकाच्या नवमांश जन्म लग्न कुडंली काढावी आणि त्या नवमांश कुडंलीचा दशमेश जन्म कुडंली(ठोकळा) मध्ये ज्या राशीचा व स्थाना मध्ये असेल त्या प्रमाणे नोकरी, व्यवसाय असतो.कृष्णमुर्ती पध्दती नुसार जन्मलग्न कुडंलीच्या दशमस्थानाच्या उप-नक्षत्र स्वामी नुसार जातक नोकरी किंवा व्यवसाय करेल हे समजते आणि दशमस्थानाचा स्वामी आणि दशम स्थानातील नक्षत्र स्वामी नुसार व त्याच्या कार्यकत्वा नुसार नोकरी किंवा व्यवसाय समजतो.
No comments:
Post a Comment