आधुरी एक प्रेम कहाणी....!
एका सिनेमाच्या स्टोरी सारखी ही प्रेम कहाणी आहे ...एक होता राजा..देखणा ...सुंदर..रुबाबदार माणूस...त्याच प्रेम बसते एका सुंदर तरुणी वर...अबोल नाते पुढे प्रेमातुन बहरत जाते मग ह्ळुच लग्नगाठीही बांधल्या जातात..सुखी संसार गुण्या गोंविदांने बहरलेला असतो...दोघे ही कलेचे उपासक..मग काय नाटकाच्या रंगमचांवर सुध्दा यांची वर्णी लागते...
कुणीही रत्यावरचे या जोडीला पाहुन दृष्ट लावतील...इतकी छान जोडी...बस्स..ती आणि तो गोव्याला हनिमुनला जातात...व्वा काय आहे तो फ़ोटो अल्बम... कुणी ही पाहिल्या बरोबर म्हणेल सुंदर ह...! पुढे कहाणी सरकते...जीवनाच्या ख-या रंगमंचावर प्रवेश होतो...राणी आनंदी असते..राजा ही बुध्दिवान...उमदा ..देखणा...! राणीला दिवस जातात..एक छोट मुल या गोजिरवाण्या घरात येत...काही वर्ष आनंदात निघुन जातात ......राजाला याच रंगमंचावर दारुच व्यसन लागत...!कहाणीला इथे कलाटणी मिळते....राणी राजाच्या या व्यसनाला कंटाळुन जाते....अन राजाच्या
रोजच्या मारण्याला कंटाळुन राणी एकदाची घरा बाहेर पडते ...ती कायमची....परत न येण्यासाठी....बरेच दिवस निघुन जातात...इकडे राजा राणीच्या या आधु-या प्रेम कहाणीत राजा तिच्या साठी खुप झुरतो...अगदी वेडा होतो...पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरतात....राजा दारुच्याच नव्हे...तर पारुच्या म्हणजे राणीच्या वेडात आपले अस्तित्वच घालावुन बसतो...राजा बँकेतले
काम सोडतो....राजा तर नेहमीच तर्र असल्याने तो कुठे असतो याचा पत्ता कुणालाच माहित नसतो ..एखादा अनोळखी दयाळु राजाला दारुत तर्र असतांना रिक्षात टाकुन घेउन येतो ..असे नेहमीच होऊ लागले....बस्स राजाची ही प्रेमाची कहाणीतले प्रेम-धागे तुटून जातात... राजाची पहिली राणी एका अपत्या सह त्याला घटस्फ़ोट देते.!पुन्हा ...राजा एकाकी पडतो...राजाला
सावरण्यासाठी राजाचे पुन्हा दुसरे लग्न होते...सनई-चौघडे..वांजत्री वाजते...घरच्यानां तसेच जवळच्याला वाटते की आता तर पुन्हा एकदा राजाचे जीवन बहरले...जीवनात ही घडी अशीच राहु दे....पण राजाच्या दुस-या संसाराला आग लागते...ईथेही अल्प विराम मिळतो....ही जोडी तुटुन जाते... राजा मात्र आता तर पुर्ण पणे खचुन जातो.अन व्यसनाच्या आहारी जाऊन तो एक दिवस आयूष्याचाच पुर्ण रंगमंच सोडुन निघुन जातो....कहाणीला आता पुर्ण विराम मिळतो.राजाची आई माझ्या कडे येते आणि विचारते की राजा तर सोडुन गेला पण राजाच आयुष्यात अस का व्हाव..माझ्या लाडक्या राजाच सार आयुष्य प्रेमात ऊधळुन गेल? मग मी पाहिले राजाचा प्रेम विवाह होण्याचा योग असा की ज्यावेळला सप्तमाचा उप-नक्षत्र स्वामी हा पंचमाचा कार्येश असतो आणि पंचमाचा उप-नक्षत्र स्वामी हा सप्तमाचा कार्येश असतो तरच प्रेम विवाह होतो त्याच प्रमाणे महादशा स्वामी पंचमाचा कार्येश असतो.वरील राजाच्या कुडंलीत सप्तमाचा उप-नक्षत्र स्वामी बुध असुन तो पंचमात आहे व सप्तमेष मंगळाच्या युती मध्ये आहे त्यामुळे पाचव्या व सातव्या स्थानाचा संबध प्रस्थापित झाला आहे तसेच पंचमाचा सबलाँर्ड गुरु असुन तो सप्तमेष मंगळाच्या युती मध्ये आहे अशा प्रकारे पाच व सात स्थानाचा एकाच वेळेस कार्येश झालेला आहे त्यामुळे प्रेम प्रकरण होऊन त्याच रुपांतर विवाहात झालेले आहे.तसेच सप्तमाचा सबलाँर्ड जर ६-८-१२ स्थानाचा कार्येश असला तर वैवाहिक जीवनात भांडण,ताटातुट होत असते.या कुंडलीत सप्तमाचा सबलाँर्ड बुध असुन तो व्ययेश आहे.त्यामुळे ताटातुट होऊन त्याच रुपांतर घटस्फ़ोटात झाले आहे.आता दुसरा विवाहाचा योग हा द्वितीय स्थाना वरुन पहातात कारण द्वितीय स्थान हे सप्तमा पासून आठवे स्थान आहे म्हणजे पहिल्या विवाहाच मृत्यू स्थान आहे.दुस-या विवाहाच्या वेळेस ते माझ्या कडे आले होते .मी त्यांना सांगितले होते की दुसरा विवाह करु नये अयशस्वी होऊन त्यात भानगडी होतील त्यांनी माझे ऎकण्या पेक्षा मुलाच्या परिस्थिला अधिन राहुन दुसरे लग्न केलेच होते पण शेवटी तसेच झाले दुसरा विवाह अयशस्वी होऊन त्यांचा घटस्फ़ोट झाला.
एका जातकाची कुंडली -
भाव राशी अंश नक्षत्र स्वामी. उप-नक्षत्र स्वामी.
लग्न तुळ २५-४०-२८ गुरु बुध.
५वे स्थान कुंभ २९-५५-०२ गुरु चंद्र
७वे स्थान मेष २५-४०-२८ शुक्र बुध.
No comments:
Post a Comment