१कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट म्हणजे त्यावेळी त्याठीकाणी उदित असलेला लग्नाचा स्वामी.
२.चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचा अधिपति.
३.चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी.
४.जो वार असेल त्या वाराचा मालक.अशा प्रकारे हे चार ग्रह त्या विशिष्ट वेळेचे रुलिंग प्लँनेट असतात.वरील चार ग्रहा पैकी जे ग्रह वक्री ग्रहाच्या नक्षत्रात किंवा उप-नक्षत्रात असतात ते सोडुन द्यावे कारण ते परिणाम देत नसतात .वरील ग्रहांच्या अंशात्मक युती मधील ग्रह रुलिंग प्लँनेट म्हणुन स्विकारता येतात.वरील ग्रहांच्या राशी मध्ये जर राहू-केतू असतील तर त्यांना रुलिंग प्लँनेट म्हणुन घ्यावे.रुलिंग प्लँनेट मध्ये लग्न स्वामी अत्यंत महत्वाचा असतो नंतर त्याच्या खालोखाल नक्षत्र स्वामीचे महत्व असते. नंतर पुढच्यांचा क्रमांक लागतो.वरील चार ग्रहांपैकी वक्री असलेल्या ग्रहाला रुलिंग मध्ये घ्यावे.तो मार्गी झाल्यावर फ़ळ देतो.परंतु दिवसात घडणा-या घटनांचा विचार केल्यास असा ग्रह सोडुन देणे योग्य होते.या कॄष्णमुर्ती पध्दतिच्या रुलिंग प्लँनेट नुसार कुठली घटना केव्हा घडेल याचा कालावधी सांगता येतो.या कॄष्णमुर्ती पध्दतिच्या रुलिंग प्लँनेट च्या अभ्यास करतांना मला याचा आँफ़िसात प्रत्यय आला होता. एकदा बाँसला त्याची आई सिरियस असल्याचा फ़ोन आला परंतु आई त्या ठिकाणाहुन लांब दुस-या गावाला त्यांच्या भावा कडे रहात होती त्यात आँफ़िसात मार्च एंडिग असल्यामुळे त्यांनी मला बोलावले व विचारले की माझ्या आईची तब्येत कशी असेल ...मला तिला भेटायला जायचे आहे.आपण मला कुडंली मांडून सांगावे ..मी पंचाग पाहुन कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट म्हणजे LSRD पाहीले.रुलिंग प्लँनेट मध्ये शनि हा रुलिंग मध्ये आलेला होता त्यामुळे त्यांना मी सांगितले की आपण आत्ताच्या आत्ताच निघायला हवे कारण शनि हा आजारी माणसाला जिंवत राहु देत नाही.त्यानुसार मी म्हटले की आपल्याला आईंची भेट होणे फ़ार अशक्य आहे त्यांनी मलाही सोबत नेले. आम्ही दारात येऊन पाहिले तर काय त्यांच्या आई तर निर्वतल्या होत्या.तसेच एकदा पिकनिकला असतांना माझ्या आँफ़िसातले मित्र हे अचानक पाण्याच्या तलावात पाय घसरुन पडले होते. त्यांचा पाय प्रचंड प्रमाणात सुजलेला होता त्या निसर्ग रम्य स्थळी ऎन रान कोकण ठाणात कुठलीही वैद्यकिय मदत मिळणे दुरापास्त होते .मला ही घटना जेव्हा कळली तेव्हा माझ्या हातात पंचाग होते त्यामुळे मला त्यावेळेचे रुलिंग प्लँनेट माहित होते.मी सहजच पाहिले तर रुलिंग मध्ये शनि-मंगळ होते म्हणजे त्या व्यक्तिला फ़ँक्चर झाले असावे असे स्पष्ट दिसत होते .मी त्यांच्या मुला बरोबर धावत जाऊन म्हटले आपण कृपया आपल्या पायावर ऊठून ऊभे राहू नका आपल्या पायाचे हाड मोडले गेले असावे. त्यां वर ते म्हटले छे..छे..मी तर साध सरकुन पडलो..थोडीफ़ार सुज आहे ..बाकी काही नाही...पण ते शनि-मंगळ का असे पटकन सोडणार? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी जवळच असलेली खाट घेऊन त्याचा वापर स्ट्रेचर सारखा करण्यास सांगितला त्यांना त्यांच्या पुत्राच्या व पत्नी व काही जणांच्या मदतीने कार मध्ये सिटावर बसवले जसे अंतर गेले तसा त्यांचा त्रास वाढु लागला होता ..बस्स आता काही अंतरावर दवाखाना होता. डाँक्टरांनी टेबलावर घेतले पटकन पायाचा एक्स रे काढला ...१५ मिनिटांत तो वाळलेला एक्स-रे डाँक्टरांनी पाहीला तसेच ते गृहस्त जे अगोदर मला म्हटले होते छे हो मला काही झाले नाही त्यांचा चेहरा मात्र बघण्या सारखा झाला होता.केवळ योग्य प्रथमोपचार मिळाल्याने ते लवकरात लवकर बरे झाले..ते माझ्या कडे काही दिवसांनी आले ..स्वतःच्या पायाने चालत..आभार मानायला...तेव्हा मी माझ्या कॄष्णमुर्ती गुरुजींकडे पाहुन नमस्कार केला.त्यांनी जे ४० वर्ष अथक परिश्रम घेऊन ज्योतिष्याशात्रातली कॄष्णमुर्ती पध्दत उदयाला आणली ती किती तंतोतंत आहे याची पावती मला या ऊदाहरणा मधुनच मिळाली होती असे म्हणायला हरकत नाही.
कॄष्णमुर्ती पध्दतिचा अभ्यास असणा-या ज्योतिष मंडळीना कॄष्णमुर्ती पध्दतिचे महत्व पटवून देण्याची गरज नसते पण ज्योतिष्याशास्त्राच्या अभ्यासू वाचकांसांठी कॄष्णमुर्ती पध्दतित रुलिंगचे प्लँनेट महत्व कसे? किती आहे ? हे समजवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भविष्याची गुरुकिल्ली ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे. माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Friday, June 27, 2008
कॄष्णमुर्ती पध्दति नुसार रुलिंग प्लँनेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment