वरील कुडलीं मोठी करुन पहाण्यासाठी तिच्यावर क्लिक करावे
साडेसाती म्हणजे काय?
कुंडलीत साडेसाती किती वर्ष असते?
२००८ मध्ये कोण-कोणत्या राशींना साडेसाती आहे?
साडेसातीत काय वर्ज करायला सांगीतले जाते?
साडेसातीत कोणत्या देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे?
कुंडलीत साडेसाती असतांना आपण कसे रहावे?
चंन्द्र हा मनाचा कारक असल्यामुळे शनि या पापग्रहामुळे साडेसाती असलेल्या जातकाची मानसिक स्थिती खराब होते.मनावर नियंत्रण राहत नाही.
चंन्द्राच्या ४ थ्या आणि ८ व्या स्थानामध्ये शनि असल्यास त्याला अर्ध साडेसाती किंवा पणौति असे म्हणतात.
या कालात जातकाला आर्थिक ,मानसिक आणि अपघात होणे अशा स्वरुपाचा खुप त्रास होतो.
कोणत्या राशींना साडेसातीचा त्रास जास्त होतो?
सर्व साधारणपणे मेष,सिह,धनु या अग्निराशींना व कर्क,वॄश्चिक,मीन या जलराशीं मध्ये चंन्द्र असलेल्या जातकांना जास्त त्रास होतो.
साडेसातीत काय वर्ज करायला सांगीतले जाते?
साडेसातीत शनि या देवतेचे दर्शन घेऊ नये. कारण पौराणिक वाल्मिकी रामायणात केलेल्या ऊल्लेखा प्रमाणे रावणाच्या पायाखाली असलेल्या नऊ ग्रहां पैकी शनि या ग्रहाची दॄष्टी रावणावर पडल्याने बलाढ्य रावणावर अनेक संकटे येऊन त्याचा सर्वनाश झाला.
शनि साडेसाती मध्ये माणसाचे गर्वहरण,अहंकार नष्ट करुन त्याला वठणीवर आणायचे काम करतो.म्हणुन शनिला फ़ौजदार म्हटले जाते.
साडेसातीत कोणत्या देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे?
साडेसातीत हनुमान या वायु देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे. कारण हनुमान हा शनिच्या
डोक्यावर बसला होता अशी कथा आहे म्हणुन हनुमानाची भक्ति ,ऊपासना साडेसातीत केली जाते.
साडेसातीत हनुमान चालिसा वाचावी. मारुति हा रुद्राचा अवतार आहे आणि सप्तचिरंजीवां पैकी एक आहे.साडेसातीत शिव शंकर महादेवाची ऊपासनाही केलेली चालते.
कुंडलीत साडेसाती असतांना आपण कसे रहावे?
साडेसातीत सत्य बोलावे कुठलेही वाईट काम करु नये.भ्रष्टाचार करु नये नाहीतर त्रास संभवतो.
..........................................
वाचा आगामी आर्टिकल ...वैवाहिक जीवनातील गुण मेलन !
No comments:
Post a Comment