Friday, June 13, 2008

प्रश्न वाचकांचे-उत्तर आमची.

अभिजित
धन्यवाद .
आपल्या विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे देत आहोत.
प्रश्न १)गुणमेलन कोष्टकावरुन मृत्यूषडाष्टक योग कसा काय समजतो?
अभिजित आपण दाते (मोठे चालू वर्षाचे) पंचागांत पान नं. १० वर सद्सत्कूटकोष्टकानि या कोष्टकात अथ प्रितिषडष्टकं व अथ मॄत्युषडष्टकं ह्या उप-मथळ्या खाली ही सर्व माहिती दिलेली आहे तत्पर्वी आम्हीही pictorial graphicalव कुडंली काढुन ही माहिती अगोदर सोदाहरणासह स्पष्ट केलीली आहे.दाते (मोठे चालू वर्षाचे) पंचागांत पान नं. १० वर एकुण आठ कुटे दिलेली आहेत आणि प्रत्येक कुटानुसार त्याच्यात गुण दिलेले आहेत.वधु-वरांच्या जन्म राशी नक्षत्रानुसार किती गुण जमतात याचे घटीत गुण-मेलन कोष्टक प्रत्येक पंचांगात दिलेलेच असते कॄपया त्याचे अवलोकन व्हावे.त्या साठी कुंडली पहायलाच हवी पण कुडंली नसल्यास वधु-वरांचे जन्म राशी नक्षत्र माहिती असावे लागते त्यासाठी स्पष्ट चंद्र किती अंशा मध्ये आहे याची माहिती लागते आणि पंचांगाच्या अवकहडा चक्रा मध्ये स्पष्ट चंद्रावरुन ह्या गोष्टी कळतात त्यामुळे आम्ही या प्राथमिक गोष्टी लिहीणे अगत्याचे समजले नाही.परंतु नुसत्या गुणमेलन कोष्टकावरुन विवाह जुळविणे धोक्याचे आहे असे आमचे मत आहे. यासाठी आणखीन कृष्णमुर्ति पध्दति प्रमाणे सुक्ष्म नियम लावुन योग्य निर्णय देता येतो. तसेच ग्रह मेलनही तितकेच महत्वाचे आहे त्यासाठी आपण कुणाचे वैयक्तिक प्रश्न असल्यास तसा ई-मेल करावा या संदर्भात आपणास हवे असल्यास सशुल्क मार्गदर्शन ऊपलब्ध होईल.
प्रश्न २ मुलाचे नक्षत्र चरण आणि वधुचे नक्षत्र चरण इतक्याच माहीती वरुन हा योग आहे की नाही हे कसे समजते? आपणास नक्षत्र चरणावरुन वधु वरांच्या चंद्र राशी समजतील आणि चंद्र राशी वरुन आपणास आम्ही आमच्या ब्लाँगवर explain केलेल्या प्रमाणे मृत्यूषडाष्टक योग कसा होतो ते सोप्या पध्द्तीने जास्त कळेल.
तज्ञ,अनुभवी ज्योतिष्यांना ही बाब तात्काळ समजुन येते.ऊदा. मघा नक्षत्र दिले असेल तर त्याची सिंह राशी असेल असे समजु शकेल.

No comments: